असमाधानकारक कामकाजामुळे यावल तालुक्यातील नियुक्त कंत्राटी ग्रामसेवकाची सेवा समाप्त तथा नियुक्ती रद्द .
मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा महत्त्वपूर्ण लक्षवेधी निर्णय.
(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)
यावल दि.२ जुलै
तालुक्यातील मालोद ग्रा.पंचायत मध्ये कंत्राटी ग्रामसेवक म्हणून विजय गंगाराम बारेला याची नियुक्ती करण्यात आली होती परंतु बारेला याच्या असमाधान कारक कामकाजामुळे ग्रा.पं.
सरपंच,उपसरपंच,सदस्य यांनी तक्रार केल्याने जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी कंत्राटी ग्रामसेवक बारेला याची सेवा समाप्ती केली यामुळे जिल्ह्यातील ग्रा.पं.क्षेत्रात तथा ग्रामीण भागात मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी दि.२९ जून २०२६ रोजी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे की,
ग्रामपंचायत विभाग,जि.प. जळगांव कार्यालयाकडील आदेशान्वये विजय गंगाराम वारेला यांना पेसा अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक पदावर नियुक्ती देण्यात आलेली असून ग्रा.पं. मालोद येथे पदस्थापना देण्यात आलेली आहे.सरपंच,उपसरपंच,
ग्रापं सदस्य ग्रुप ग्रामपंचायत
मालोद, ता. यावल यांनी बारेला यांचे असमाधानकारक कामकाजाबाबत ग्रा.पं.विभाग, जि.प.जळगांव कार्यालयाकडे तक्रार केलेली आहे.सदर तक्रारींच्या अनुषंगाने बारेला यांना दि.२३/०१/२०२६ रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं),जि.प.जळगांव यांचे कार्यालयात सुनावणीस
उपस्थित राहणेबाबत कळविणेत आलेले होते.त्यानुसार दि. २३/०१/२०२६ रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं ),
जि.प.जळगांव यांचे दालनात सुनावणी घेण्यात आलेली असून दि. २३/०१/२०२६ रोजी निकाल पारीत करण्यात
आलेला आहे.
गट विकास अधिकारी, पं.स.यावल यांनी बारेला यांचे कामकाजाबाबत अहवाल सादर केलेला आहे.बारेला यांची सुनावणी होऊनही त्यांचे कामकाजामध्ये सुधारणा होत नसल्याचे दिसून आले आहे. सरपंच,उपसरपंच,ग्रा.पं.सदस्य ग्रुप ग्रापं मालोद यांनी पुनःश्च बारेला यांचे असमाधानकारक कामकाज व गैरवर्तणुकीबाबत तक्रार अर्ज या कार्यालयाकडेस सादर केलेले आहेत.तसेच गट विकास अधिकारी,पं.स.यावल यांनी बारेला यांचे असमाधान कारक कामकाजाबाबतचा अहवाल या कार्यालयाकडे सादर केलेला आहे.सदर सर्व कागदपत्रांची पडताळणी केली असता बारेला हे त्यांच्या कामकाजामध्ये अक्षम्य असे दुर्लक्ष,टाळाटाळ,हलगर्जीपणा करीत असून एक प्रकारे शासकिय कामामध्ये गैरवर्तणुक करीत असल्याचे दिसून आलेले आहे.सदरची बाब अतिशय गंभीर असून कार्यालयीन शिस्तीचा भंग करणारी आहे.
बारेला यांचे नियुक्ती आदेशातील अट क्र.१४ नुसार नियुक्तीच्या
कालावधीमध्ये उमेदवाराने कोणत्याही स्वरूपाची गैरवर्तणुक केल्यास सदर उमेदवाराची नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येईल असे नमूद आहे.उक्त वाचा क्र. ११ अन्वये बारेला यांना त्यांचे असमाधान
कारक कामकाज व गैरवर्तणुकी बाबत सेवा समाप्ती नोटीस बजावून त्यांना सात दिवसांचे आंत खुलासा सादर करणेबाबत गट विकास अधिकारी, पं.स.
यावल यांचेमार्फत नोटीस बजाविणेत आलेली होती.गट विकास अधिकारी,पं.स.यावल यांनी बारेला यांना दि.२ जून २०२६ रोजी सेवा समाप्तीची नोटीस बजाविलेली असून बारेला यांनी विहित मुदतीत त्यांचा खुलासा सादर केलेला नाही. उक्त परिस्थितीचे अवलोकन करता विजय गंगाराम बारेला, कंत्राटी ग्रामसेवक, ग्रामपंचायत मालोद,हे त्यांचे कामकाजात टाळाटाळ, हलगर्जीपणा,बेजबाबदारपणा व गैरवर्तणुक करीत असलेचे सिध्द
होत असल्याने त्यांचे नियुक्ती आदेशातील अट क्र. १४ नुसार विजय गंगाराम बारेला,कंत्राटी ग्रामसेवक,ग्रा.पं.मालोद,यांची कंत्राटी ग्रामसेवक या पदावरील नियुक्ती या आदेशान्वये रद्द करण्यात येत आहे.
सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी. असे आदेश संबंधित सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात तथा ग्रामीण भागात मोठी खळबळ उडाली.

