भद्रावती पोलिसांची धडक कारवाई :
९०७ ग्रॅम गांजासह ₹१.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त,
दोन आरोपींवर NDPS अंतर्गत गुन्हा दाखल
(महेश निमसटकर
जिल्हा विभागीय संपादक चंद्रपूर)
भद्रावती (ता. १५ जुलै) : भद्रावती पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करत नाग मंदिर मागे, शिवाजी नगर परिसरातून ९०७ ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत एकूण ₹१,०३,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून NDPS Act कलम 8(क), 20(ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात सोनल दशरथ महाकुळकर (वय २० वर्षे, व्यवसाय – मजुरी, रा. नाग मंदिर मागे, शिवाजी नगर, भद्रावती, जि. चंद्रपूर) व आणखी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त मुद्देमाल :
९०७ ग्रॅम गांजा – किंमत ₹१३,०००
सॅमसंग कंपनीचा जुना मोबाईल – किंमत ₹३०,०००
हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी (एमएच-३१-डीएस-९०६३) – किंमत ₹६०,०००
अशा प्रकारे एकूण ₹१,०३,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस स्टेशन भद्रावती येथे दाखल गुन्हा क्र. ६५४/२०२६ अंतर्गत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
कारवाई करणारे अधिकारी व कर्मचारी (पूर्ण नावे)
आयुष नोपाणी – पोलीस अधीक्षक, चंद्रपूर
ईश्वर काटकाडे – अपर पोलीस अधीक्षक
संतोष बावकल – उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा
योगेश्वर पारधी – पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन भद्रावती
विरेंद्र केदारे – सहाय्यक पोलीस निरीक्षक
संजय मिश्रा – सहाय्यक पोलीस निरीक्षक (फिर्यादी)
संतोष केदारे – पोलीस उपनिरीक्षक
गजानन तुपकर – पोलीस उपनिरीक्षक
महेंद्र बेसरकर – सहाय्यक पोलीस फौजदार
अनुप आरडूनकर – पोलीस हवालदार
गोपाल आत्तुकलवार
लेकेश नायडू
खुशाल कावळे
योगेश घाटोळे
संतोष राठोड
रागिनी रायपुरे (महिला पोलीस अंमलदार)

