*अकोला खदान पोलिसांची धडक कारवाई; गोवंश मांसासह चोरीच्या दोन दुचाकी जप्त, एकूण ३.४३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत*
( मीडिया पोलिस टाईम अकोला जिला विभागीय संपादक इमरान खान )
अकोला:खदान पोलीस स्टेशनच्या पथकाने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये अवैद्य गोवंश मांसाची वाहतूक करणाऱ्या आरोपीसह दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक केली आहे. या कारवायांमध्ये एकूण ३,४३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पहिली कारवाई: अवैध गोवंश मांस वाहतूकदिनांक १५ जुलै २०२६ रोजी खदान पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाकाबंदी करण्यात आली होती. या नाकाबंदी दरम्यान संशयित आरोपी शेख हारून शेख अब्दुल कुरेशी (वय ४८ वर्ष, रा. मुल्लानी चौक, खदान, अकोला) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ४५ किलो गोवंश मांस आणि वाहतुकीसाठी वापरलेली सुझुकी कंपनीची ॲक्सेस मोपेड गाडी (क्रमांक MH-30 BN-2287) असा एकूण २,०३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दुसरी कारवाई: दुचाकी चोऱ्यांचे गुन्हे उघडखदान पोलिसांनी मोटार सायकल चोरीच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांचा तपास करत १,४०,००० रुपये किमतीच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या:१. अपराध क्रमांक ६२०/२०२६ (कलम ३०३ (२) बी.एन.एस.): या चोरीच्या गुन्ह्यातील ८०,००० रुपये किमतीची बजाज कंपनीची पल्सर मोटारसायकल (क्रमांक MH-20 GS-3357) जप्त करण्यात आली.२. अपराध क्रमांक १२४५/२०२६ (कलम ३०३ (२) बी.एन.एस.): या गुन्ह्यात आरोपी इंद्रजित शेरसिंग अंदरेले (रा. घोडदौड रोड, खंडेलवाल लॉन जवळ, अकोला) याला अटक करून, त्याच्याकडून ६०,००० रुपये किमतीची हिरो कंपनीची आय-स्मार्ट स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक MH-30 AL-5044) जप्त करण्यात आली.पोलीस पथक:सदरची धडक कारवाई अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. अर्चित चांडक साहेब, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. रेड्डी साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर विभाग) मा. श्री. सुदर्शन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. मनोज केदारे, पोहेकॉ निलेश खंडारे, भूषण मोरे, अभिमन्यु सदांशिव, पोकॉ वैभव कस्तुरे, शिवम दुबे आणि मंगेश खेडकर यांनी केली आहे.

