NEET परीक्षेत यशस्वी ज्ञानेश्वर मामडे यांचा, गावकऱ्याकडून जंगी सत्कार
गावातील युवा व विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्याची जिद्द ठेवावी -सरपंच इनामदार रहेबर
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड : बिलोली तालुक्यातील हिप्परगा थडी येथे ज्ञानेश्वर मामडे,यांचा जंगी सत्कार गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला.अल्पभूधारक शेतकरी नागनाथ लक्ष्मण मामडे यांचा मुलगा ज्ञानेश्वर नागनाथ मामडे यांनी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा NEET उत्तीर्ण होऊन,720 पैकी 601 गुण मिळूवुन ऑल इंडिया रँक मध्ये 9644 व्वा,क्रमांक तर इतर मागास प्रवर्ग (OBC) मध्ये 4276 वी रँक मिळवली आहे,या त्यांच्या यशाबद्दल हिप्पारगा थडी गावातील सरपंच, व माजी सरपंच व सर्व सामाजिक कार्यकर्ते,व गावकऱ्यांनी मिळून हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला, यावेळी हिप्परगा थडी येथील सरपंच इनामदार रहेबर, उपसरपंच चंद्राबाई व्यंकट तुकडे, पोलीस पाटील शंकराप्पा मठपती,माजी सरपंच साहेबराव आंजनिकर,शिक्षक कौटकर सर,तंटामुक्ती अध्यक्ष शेषेराव मामडे, पत्रकार राजू आमेटवार, पत्रकार मारोती एडकेवार, शिक्षकवर्ग साईनाथ तुकडे,इम्रान सय्यद, व सामाजिक कार्यकर्ते सय्यद इरफान,इम्रान पटेल,दीपक एडकेवार,शिवाजी एडकेवार, माणिक तुकडे,साहेबराव एडकेवार,व ग्रामपंचायत सदस्य सय्यद इजास, व सर्व गावातील गावकरी व सामाजिक कार्यकर्ते, व सर्व ग्रामपंचायत सदस्य, युवा तरुण,मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी सरपंच माजी सरपंच व गावातील शिक्षकांनी,ज्ञानेश्वर मामडे यांचे सर्व गावातील तरुणांनी आदर्श घ्यावा,असे मनोगत व्यक्त करण्यात आले.

