जायकवाडीचे 18 दरवाजे उघडले; 28 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
(अहिल्यानगर | विभागीय संपादक प्रशांत बाफना)
जायकवाडी धरणाचे 18 वक्र दरवाजे 10 फुटाने उचलून 28 हजार क्युसेक पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे कावसान पुल पाण्याखाली गेल्याने तेथील रहदारी बंद करण्यात आली आहे.
नाशिक व अहिल्यानगरच्या काही भागात जोरदार पाऊस झाल्याने गेल्याने गोदावरी तसेच मुळा नदीतून जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढत गेली. परिणामी हे धरण 93.54 टक्के भरले आहे. येणाऱ्या पाण्याची आवक पाहता मंगळवारी दि.4 रोजी धरणाचे 18 दरवाजे अर्धा फुटाने उचलण्यात आले. त्यानंतर रात्री 11 वाजता व पुन्हा बुधवारी सकाळी 9 वाजता हे 18 दरवाजे 10 फुटाने उचलण्यात येऊन 28 हजार 134 क्युसेक पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आले आहे.
धरणात भाम भावली, भोजापुर, आळंदी, नागठाम, नांदुर मध्यमेश्वर, देवगड, नेवासा अशी गोदावरी व मुळा नदी पात्रातून सध्या सुमारे 25 हजार क्युसेक पाण्याची आवक चालु आहे. गतवष प्रमाणे यंदाही जायकवाडी धरण वरील पाण्याच्या आवकने पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. मात्र पुढील होणाऱ्या पावसाचा अंदाज पाहता धरणाच्या दरवाजातून पाणी सोडण्यात आले अधरणात 2768 दलघमी म्हणजे 97.77 टीएमसी पाणी साठा झाला आहे. सध्याची पाणी पातळी 1520. 82 फुट, जिवंत पाणीसाठा 2030.702 दलघमी आहे.
धरणाच्या उजव्या कालव्यातून 1 हजार क्युसेक व डाव्या कालव्यातून 700 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी सोडल्याने धरण दरवाजा नजिक असणारा कावसान पुल पाण्याखाली गेल्याने त्यावरील रहदारी बंद करण्यात आली असुन तेथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता पाहता गोदावरी पात्राच्या तिरावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला

