*समाज परिवर्तनासाठी अण्णा भाऊ साठेंचे साहित्य प्रेरणादायी --प्राचार्य डॉ. अनिल पाटील*
(रावेर तालुका ग्रामीण प्रतिनिधी शेख शरीफ पटेल)
दिनांक 01ऑगस्ट 2026
रावेर – येथील श्री व्ही. एस. नाईक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. जी. आर. ढेंबरे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. आपल्या साहित्याच्या माध्यमातून अण्णा भाऊ साठे यांनी समाजातील शोषित, वंचित आणि कष्टकरी घटकांचे वास्तव प्रभावीपणे मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अनिल पाटील होते. अध्यक्षीय मनोगतात अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक व सामाजिक योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रश्नांची जाणीव ठेवून विकासासाठी योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन NSS कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर महाजन यांनी केले, तर प्रा. एल. एम. वळवी यांनी आभार मानले.
यावेळी डॉ. ए. एन. सोनार, डॉ. एस. बी. सूर्यवंशी, IQAC समन्वयक डॉ. बी. जी. मुख्यदल, विद्यार्थी विकास प्रमुख डॉ. जी. आर. ढेंबरे, प्रा. एन. जी. घुले, डॉ. एस. बी. धनले, प्रा. तेजस दसनूरकर यांच्यासह महाविद्यालयातील स्वयंसेवक उपस्थित होते.

