काँग्रेसच्या सरचिटणीस पदी कलीम खान मणियार..
फैजपूर प्रतिनिधी
फैजपूर येथील कलीम खान हैदर खान मनियार यांची जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी पूर्वअंतर्गत जळगाव जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना काँग्रेसचे पूर्व जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी यांनी नियुक्तीपत्र दिले कलीम खान मनियार हे सामाजिक कार्यात अग्रेसर मानले जातात फैजपूर नगरपालिकेचे माजी काँग्रेसचे गटनेते म्हणून त्यांनी जबाबदारी पार पडलेली आहे तसेच फैजपुर नगरपालिकेवर तीन वेळा निवडून आलेले आहे त्यांच्या ह्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे

