अहिल्यानगरच्या 'चांद सुलताना'चा वाद आणि वास्तव - भाग : १.....नक्की काय आणि कोणते आहेत आरोप ...?

अहिल्यानगरच्या 'चांद सुलताना'चा वाद आणि वास्तव - भाग  : १

नक्की काय आणि कोणते आहेत आरोप ...? 

(स्पेशल रिपोर्ट प्रशांत बाफना अहिल्यानगर विभागीय संपादक)


 ही वृत्तमालिका वाचण्यापूर्वी आमची भूमिका थोडक्यात जाणून घ्या. अहिल्यानगरच्या चांद सुलताना हायस्कूल या शैक्षणिक संस्थेसंदर्भात सध्या सगळीकडे उलट सुलट चर्चा सुरु आहे. ज्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत, त्यांनी ते आरोप फेटाळून लावलेले आहेत. मात्र या मागचं वास्तव नक्की काय आहे, हे तुमच्या सर्वांच्या समोर यावं, याच उद्देशानं आमचा हा लेखन प्रपंच आहे. 
-


अहिल्यानगरची चांद सुलताना ही शैक्षणिक संस्था आणि या संस्थेअंतर्गत सुरू असलेली प्राथमिक शाळा ही अनुदानित शाळा आहे. अंजुमन ए तरक्की ए उर्दू ट्रस्ट या संस्थेनं नासिर ख्वाजालाल खान यांची या शाळेमध्ये प्रथम सहशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती आणि आहे. परंतु संस्था व्यवस्थापन आणि कायद्याने सोपविलेल्या कामकाजामध्ये नासिर ख्वाजालाल खान यांनी निष्काळजीपणा करून गैरवर्तन केल्याचा संस्थेचा त्यांच्यावर आरोप आहे शासनाच्या सेवाशर्तीचं उल्लंघन केलं असल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे. नासिर ख्वाजालाल खान यांची दिनांक १ नोव्हेंबर २००२ पासून संस्थेच्या प्राथमिक शाळेचे सहशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली असून दिनांक १८ / ११ / २००२ च्या आदेशाने त्या नेमणुकीला मान्यता मिळालेली आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार तिसरं अपत्य असणे ही बाब सेवाशर्तीची भंग करणारी आहे. असं असतानासुद्धा नासिर ख्वाजालाल खान यांना चार अपत्य असून त्यापैकी दोन अपत्य हे २००८  आणि २०११ मध्ये झालेली आहेत. त्यामुळे शासकीय नियमाचा भंग केला म्हणून नासिर ख्वाजालाल खान हे सरकारी नोकरी करण्यास अपात्र आहेत, असं या संस्थेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल मतीन अब्दुल रहीम यांनी दिनांक २८ / ७ / २०२५ च्या पत्रात म्हटलं आहे. विशेष म्हणजे दिनांक ११ /८/ २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागालासुद्धा यासंदर्भात एक पत्र देण्यात आलेलं आहे.

नासिर ख्वाजालाल खान यांनी उर्दू शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा कारभार करत असताना संस्थेने नियुक्त केलेल्या शेख दानिश जब्बार आणि खान इमरान आयुब या शिक्षण सेवकाच्या नियुक्तीला मान्यता मिळवण्यासाठीचा प्रस्ताव दिनांक १७/२/२०१९ रोजी अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला सादर केला. खान यांनी सदर प्रस्तावासोबत दोन शिक्षकांच्या शिक्षण पात्रता परीक्षा २०१८ चे प्रमाणपत्र छायांकित प्रती जोडून बेकायदेशीरित्या त्या प्रस्तावाला मान्यता मिळवली होती सदर मान्यतेवरून या शिक्षकांची वेतन काढण्यासाठी शालार्थ प्रणाली मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी प्रकरण पुण्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण उपसंचालक यांच्याकडे पाठवण्यात आलं त्यावर या कार्यालयाने दोन्ही शिक्षक सेवकांच्या शिक्षण पात्रता परीक्षेच्या प्रमाणपत्राच्या मूळ प्रतीची मागणी केली होती. 

या कागदपत्रांवरून असं निदर्शनात आलं, की खान यांनी प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयाकडे दिलेल्या प्रस्तावासोबत नियुक्त शिक्षण सेवकांच्या शिक्षण पात्रता परीक्षेचे बनावट प्रमाणपत्र जोडलेले दिसून आले. खान यांनी टीईटी २०१८ चे गुणपत्रक काढून त्या जागी सीटीईटी २०१९ चे गुणपत्रक आणि पात्रता गुणपत्रक लावले. अशाप्रकारे खान यांनी शासकीय कामकाजामध्ये हस्तक्षेप केला असून ही बाब सायबर क्राईम पुणे अंतर्गत चालू असताना खान यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ४०८/४२०/३४ प्रमाणे आरोपपत्र ठेवण्यात येऊन चौकशी सुरू झाली आहे. खान यांनी केलेल्या गैरवर्तनामुळे वर्तमानपत्रात बातम्या प्रसारित होऊन संस्थेची आणि शाळेची बदनामी झाली आहे त्याचा विपरीत परिणाम शाळेचे आणि संस्थेच्या नावलौकिकावर होत आहे खान यांची हे गैरवर्तन अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे, असं आईला नगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला या संस्थेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल मतीन अब्दुल रहीम यांनी दिलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे. 


मुख्याध्यापक पदावर कार्यरत असताना खान यांच्या हाताखाली शिपाई पदावर काम करणारे कर्मचारी आसिफ सुलेमान खान हे दिनांक २/१०/२०२३ ते १५/१२/२०२३ या कालावधीमध्ये भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात अटकेत होते अशीफ खान यांनी कोणताही रजेचा अर्ज दिलेला नव्हता आणि नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही रजेचा अर्ज संस्था व्यवस्थापनाकडे मंजूर केलेला नसताना देखील खान यांनी सदर कालावधीमध्ये आसिफ सुलेमान खान यांची अर्जित रजा दाखवून त्यांचे सदर कालावधीचे वेतन बेकायदेशीर रित्या काढून संस्थेची आणि शासनाची आर्थिक फसवणूक केली आहे. संस्था व्यवस्थापनाने खान यांना पत्र देऊन खुलासा मागविला असता खान यांनी  ९/१/२०२५ चा खोटा, चुकीचा आणि बेकायदेशीर खुलासा केला आहे. त्यानंतर खान यांना दिनांक २६/१२/२२४ आणि २०/१/२०२५ रोजी चे पत्र पाठवून कागदपत्रांची मागणी केली असता खान यांनी संबंधित कागदपत्र संस्था व्यवस्थापनाला दिलेली नाहीत. 

अशाप्रकारे नासिर ख्वाजालाल खान यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आसिफ सुलेमान खान यांच्याशी संगणमत करून संस्था आणि शासनाची आर्थिक फसवणूक केली आहे ही बाब उघडकीस आल्यामुळे खान यांनी दिनांक १२/३/२०२५ रोजी आसिफ सुलेमान खान यांच्या अतिप्रधान वेतनाच्या बाबत रक्कम रुपये ९१ हजार ०३९ शासन दरबारी जमा केली आहे. अशा प्रकारे खान यांनी नैतिक अध:पतनासारखं गैरवर्तन केलं असल्याचं अंजुमन ए तरक्की ए उर्दू ट्रस्ट या संस्थेचे चेअरमन सय्यद अब्दुल मतीन अब्दुल रहीम यांनी अहिल्या नगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला दिनांक ११/८/२०२५ रोजी दिलेल्या पत्रात म्हटलं आहे. तूर्तास इतकंच. पुन्हा भेटूच पुढच्या भागात. तोपर्यंत
Previous Post Next Post