पत्रकार संजयकुमार पोवाडे यांना महाराष्ट्रभूषण व जीवन गौरव' पुरस्कार जाहीर पत्रकारितेच्या माध्यमातून केलेल्या समाजकार्याचा सन्मान

पत्रकार संजयकुमार पोवाडे यांना महाराष्ट्रभूषण व जीवन गौरव' पुरस्कार जाहीर

 पत्रकारितेच्या माध्यमातून केलेल्या समाजकार्याचा सन्मान 

मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

नांदेड :बिलोली येथील ज्येष्ठ पत्रकार तथा महाराष्ट्र टीव्ही नाईनचे सपादक संजयकुमार निवृत्तीराव पोवाडे बिलोलीकर यांची महात्मा कबीर समता परिषद यांच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या "महाराष्ट्रभूषण व जीवन गौरव" पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, समाजहिताचे प्रश्न सातत्याने मांडणे, जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी निर्भीडपणे आवाज उठविणे आणि सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या सेवाकार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्काराबद्दल बिलोली तालुक्यासह पत्रकार, सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून संजयकुमार पोवाडे  बिलोलीकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या सन्मानामुळे बिलोली तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवा करणे हा त्यांचा उद्देश असून समाजातील व ग्रामीण भागातील कोणत्याही व्यक्तीने तालुकास्तरावरी कोणतीही अडचण असेल तो तत्पर तेथील  अधिकाऱ्यांशी व संबंधित व्यक्तीशी चर्चा करून ताबडतोब ग्रामीण भागातील नागरिकांचे अडीअडचणी सोडवणे हा त्यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान आहे यावेळी आमचे प्रतिनिधी यांनी संजय कुमार पोवाडे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवडीबद्दल अभिनंदन व त्यांना या पुरस्काराबद्दल विचारले असता 
संजयकुमार पोवाडे  बिलोलीकर यांनी हा सन्मान जनतेला, सहकारी पत्रकारांना आणि आपल्या कुटुंबीयांना समर्पित असल्याचे सांगितले.
 "पत्रकार संजयकुमार पोवाडे  बिलोलीकर यांना 'महाराष्ट्रभूषण व जीवन गौरव' पुरस्कार बिलोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे त्यांच्या या सामाजिक कार्याचा हा सन्मान आहे यामुळे सर्व स्तरातून त्यांचा अभिनंदन व कौतुक होत आहे 

चौकट - पत्रकार संजय कुमार पोवाडे यांना महाराष्ट्र भूषण व जीवनगौरव पुरस्कार हा त्यांच्या ग्रामीण भागातील नागरिकांचे  निस्वार्थपणे केलेल्या समाजकार्याचा सन्मान आहे त्यांना अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा  -पत्रकार मारोती एडकेवार
Previous Post Next Post