जवान प्रशिक्षण केंद्राचा वर्धापन दिन व सत्कार समारंभ संपन्न"
(विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा)
जवान डिफेन्स प्रशिक्षण केंद्राचा सहावा वर्धापन दिवस व संरक्षण दलामध्ये निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.तीन प्रशिक्षणार्थ्यांना घेऊन माजी सैनिक प्रवीण पेठे यांनी ह्या प्रशिक्षण केंद्राचा आरंभ केला होता.तरुण पिढीमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करून आदर्श नागरिक घडवून संरक्षण दलाच्या मार्फत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा प्रशिक्षण केंद्राचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.ह्या प्रसंगी महाराष्ट्र पोलिसांमध्ये निवड झालेल्या मीनाक्षी गिरी,पूजा लष्कर,राज्य राखीव दलामध्ये निवड झालेल्या शंतनु फुके,साहिल चहारे,शुभम घुगे,अग्निवीर मध्ये भरती झालेल्या शिवम युवनाथे व मर्चंट नेव्ही मध्ये भरती झालेल्या अंकुश मर्कंडकर,महाराष्ट्र शासनामध्ये निवड झालेल्या प्रतीक दिघाडे,स्वप्निल गेडाम, बिपाशा दारुंडे व भारतीय रेल्वेमध्ये निवड झालेल्या सुमित काळेचा सत्कार करण्यात आला. प्रशिक्षण केंद्राचे अनेक प्रशिक्षणार्थी आपली सेवा देशाच्या संरक्षण दलामध्ये देत आहे.ह्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी प्रशिक्षार्थ्यांना सध्या देशासमोर जी आव्हाने उभी आहे त्यासाठी समोर येऊन देशाचे नेतृत्व करण्याची आवश्यकता असल्याचे व माजी सैनिक प्रवीण पेठे यांच्या ह्या उपक्रमातून शिस्तप्रिय तरुण पिढी घडत असल्याबद्दल आनंद आपल्या मार्गदर्शन पर भाषणात व्यक्त केला तसेच प्रशिक्षण केंद्राला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.प्रमुख अतिथी निवृत्त वायुसेना अधिकारी यशवंत तीनगसे यांनी संरक्षण दलामध्ये असणाऱ्या रोजगाराच्या संधी बद्दल माहिती दिली.तसेच ह्या प्रसंगी विशेष अतिथी विदर्भ ग्रामीण वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंदजी जूनगडे यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीबद्दल मार्गदर्शन केले.याप्रसंगी प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण पेठे, मुख्य शारीरिक प्रशिक्षक माजी सैनिक विक्रम भांडवलकर, प्रा.हेमराज पवार,पीटीआय आकाश मांदाडे,प्रा.लोकेश कन्नके उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रा.भारत खोडे यांनी केले तर कृष्णा नांदुरकर यांनी आभार मानले.सर्व कार्यक्रमाचे आयोजन,नियोजन,प्रबंधन आर्यन पारशिवे यांनी केले.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी साक्षी जाधव तृप्ती आप्टे,वंश कांगले,चेतन कुरवाडे,अनिकेत पवार,विकास बेलसरे यांनी परिश्रम घेतले.ह्या प्रसंगी जवान प्रशिक्षण केंद्राचे आजी-माजी सर्व प्रशिक्षणार्थी,निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे पालक त्याचप्रमाणे गनमान्य नागरिक उपस्थित होते.
आपला नम्र
प्रवीण पेठे
9401413015

