*११ हजारांची लाच महागात ;**तत्कालीन मंडल अधिकाऱ्याला ५ वर्षांची सक्तमजुरी*

*११ हजारांची लाच महागात ;*

*तत्कालीन मंडल अधिकाऱ्याला ५ वर्षांची सक्तमजुरी* 

सोलापूर (पंढरपूर) : जिल्हा प्रतिनिधी 

*शेतीच्या व्यवहारासाठी ११ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पटवर्धन कुरोली*
 (ता. पंढरपूर) 
*येथील तत्कालीन मंडल अधिकारी जगन्नाथ मारुती कुंभार यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे*. 

*जिल्हा न्यायाधीश ओ. आर. देशमुख यांनी हा निकाल दिला*.

प्रकरणानुसार, तक्रारदाराच्या मुलाच्या नावावरील जमिनीसाठी ये-जा व मालवाहतुकीचा रस्ता उपलब्ध व्हावा यासाठी गट क्रमांक ५५६ मधील सहा गुंठे शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीचा अहवाल लवकर तहसीलदारांकडे पाठविण्याच्या मोबदल्यात मंडल अधिकारी *कुंभार* यांनी ११ हजार रुपयांची लाच मागून स्वीकारली होती.

या प्रकरणी ३१ मार्च २०१५ रोजी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०१६ मध्ये 
जिल्हा व सत्र न्यायालयात विशेष खटला दाखल केला. 

खटल्यादरम्यान चार साक्षीदारांच्या साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचे सिद्ध झाल्याने त्याला पाच वर्षांची सक्तमजुरी व १५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
             ***
Previous Post Next Post