कारवाईचा बडगा !**एफ.डी.ए.(F.D.A.) कारवाईने रंग उडाला**पिवळाधम्मक गूळ कुठे गेला ?*

*कारवाईचा बडगा !*

*एफ.डी.ए.(F.D.A.) कारवाईने रंग उडाला*

*पिवळाधम्मक गूळ कुठे गेला ?*

नाशिक मुंबई जिल्हा प्रतिनिधी 

*साखरेला नैसर्गिक पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या गुळालाच काही उत्पादकांकडून भेसळीचा विळखा पडल्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत उघडकीस आले आहेत*. 

*गुळाला आकर्षक पिवळसर किंवा पांढरट रंग आणण्यासाठी हायड्रोस*
 (सोडियम हायड्रोसल्फाइट) 
आणि 
*अन्य घातक रसायनांचा वापर होत असल्याच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफ.डी.ए.)(F.D.A.) राज्यभर कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईचा परिणाम आता नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समिती*, 
*घाऊक बाजार*
आणि 
*किरकोळ विक्रीत दिसून येत असून*, 
*पूर्वी सहज दिसणारा पिवळाधम्मक गूळ आता जवळपास गायब झाला आहे*.

*व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार*,
*एफ.डी.ए.(F.D.A.)च्या तपासणी मोहिमेनंतर उत्पादकांनी रासायनिक प्रक्रिया टाळण्यास सुरुवात केली आहे*. 

*त्यामुळे बाजारात नैसर्गिक तपकिरी किंवा गडद सोनेरी रंगाचा गूळ अधिक प्रमाणात येत आहे.*

*ग्राहकांमध्येही रसायनमुक्त गुळाबाबत जागरूकता वाढल्याने नैसर्गिक गुळाला मागणी वाढली आहे*. 

*दरम्यान*,
*कारवाईच्या धास्तीमुळे काही उत्पादकांनी मालाची आवक कमी केल्याने नाशिक बाजारात गुळाची आवक काही प्रमाणात मंदावल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले*.

*गुळाच्या गोडव्यातही भेसळीचा गैरप्रकार गूळ पौष्टिक असल्याची प्रतिमा असली*
*तरी अधिक आकर्षक दिसावा म्हणून काही ठिकाणी हायड्रोस, कृत्रिम रंग*
 आणि 
*इतर रसायनांचा वापर केला जातो*. 

*ग्राहकांची दिशाभूल करून अधिक दर मिळविण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचे एफ.डी.ए.(F.D.A.)च्या तपासणीत समोर आले आहे*.

*नाशिक बाजारात आवक थंडावली कारवाईनंतर काही उत्पादकांनी माल पाठविण्यात सावध भूमिका घेतली आहे*. 

*त्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसह घाऊक बाजारात गुळाची आवक काही प्रमाणात घटल्याचे व्यापारी सांगतात*. 

*मागणी कायम असल्याने दर्जेदार गुळाला चांगला दर मिळत आहे*.

*कारवाई आणि दंडाची तरतूद*

अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार भेसळयुक्त अन्नपदार्थ तयार करणे किया विक्री करणे हा दंडनीय गुन्हा आहे. 

*तो सिद्ध झाल्यास लाखो रुपयांचा दंड*, 
*परवाना निलंबन किंवा रद्द करणे*, 
*तसेच गंभीर प्रकरणांमध्ये कारावासाचीही तरतूद आहे*.

*एफ.डी.ए.(F.D.A.)च्या कारवाईनंतर बाजारात रंगविहीन गूळ*

एफ.डी.ए.(F.D.A.)च्या तपासण्या वाढल्यानंतर नाशिकच्या बाजारात पूर्वीप्रमाणे चमकदार पिवळा गूळ दिसत नाही.

 नैसर्गिक तपकिरी रंगाचा मूळच मोठ्या प्रमाणात विक्रीस येत असल्याचे व्यापाऱ्यांचे निरीक्षण आहे.

*नाशिक जिल्ह्यात कुठून येतो गूळ ?*

नाशिक बाजारात प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर तसेच कर्नाटकातील बेळगाव परिसरातून गुळाची आवक होते. 

काही प्रमाणात स्थानिक गुन्हाळांमधूनही गूळ विक्रीस येतो.

*भेसळीमुळे आरोग्याच्या गंभीर समस्या*

पोटाचे विकार,
 मळमळ, उलट्या, जुलाब, यकृत व मूत्रपिंडांवर परिणाम, त्वचेची अॅलर्जी व श्वसनाचा त्रास, दीर्घकाळ सेवन केल्यास गंभीर दुष्परिणाम

*गुळात कशाकशाची केली जाते भेसळ?*

हायड्रोस
 (सोडियम हायड्रोसल्फाइट)
कृत्रिम रंगद्रव्ये
साखर 
किंवा 
ग्लुकोज सिरप
स्टार्चसारखे भराव पदार्थ
निकृष्ट गुळावर रासायनिक प्रक्रिया

*गुळातील भेसळ कशी ओळखावी ?*

अतिशय पिवळा किंवा पांढरट रंग असल्यास सावध राहा.

 गुळाला अनैसर्गिक चमक असल्यास संशय घ्या. 

रासायनिक वास जाणवल्यास खरेदी टाळा. 

पाण्यात टाकल्यावर रंग वेगळा सुटल्यास भेसळीची शक्यता.

*तक्रार कुठे कराल ?*

नाशिक जिल्हा अन्न व औषध प्रशासन कार्यालय, 
एफ.डी.ए.(F.D.A.)
च्या अधिकृत तक्रार पोर्टलवर, 
ग्राहक हेल्पलाइन नंबर
१८००२२२३६५
             ***
Previous Post Next Post