*गिरड येथे विदर्भस्तरीय प्रचारक मेळावा संपन्न*
*राष्ट्रसंतांचे विचार घराघरात पोहोचवण्याचा संकल्प*
राष्ट्रसंत म्हणजे चालते-बोलते विद्यापीठ होय. ज्यांनी ग्रामगीतेतून संपूर्ण समाजाला शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि एकतेचा मंत्र दिला, अशा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारधारेचा "ज्ञान यज्ञ" घरोघरी पोहोचवण्यासाठी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने भव्य *विदर्भस्तरीय प्रचारक मेळावा* शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी गिरड, ता. समुद्रपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
श्रीक्षेत्र गुरुकुंज मोझरी, वर्धा जिल्हा शाखा अंतर्गत श्री गुरुदेव सेवा मंडळ, समुद्रपूर तालुका कार्यकारणी यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते.
*वृक्षारोपणाने झाली कार्यक्रमाची सुरुवात*
सकाळी ९.० वाजता शिवटेकडी ऑक्सिजन पार्क, गिरड येथे वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन कार्यक्रमाने मेळाव्याची सुरुवात झाली. सर्व मान्यवर आणि गुरुदेव प्रचारकांच्या हस्ते वड, पिंपळ, कडुलिंब, जांभूळ, चिंच या मातृवृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण रक्षणाचा संदेश देत सर्व झाडांना ट्री गार्ड देखील लावण्यात आले.
*उद्घाटन सोहळा*
सकाळी ११.३० वाजता श्रीराम जानकी सभागृह, गिरड येथे उद्घाटन सोहळा पार पडला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि गुरुदेव हमारा प्यारा है जीवन का उजियारा या संकल्प गीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
*अध्यक्षस्थानी* : श्री प्रभाकरजी गायकवाड, जिल्हा सेवा अधिकारी, वर्धा
*उद्घाटक* : श्री प्रकाशजी वाघ महाराज, सर्वाधिकारी, अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज मोझरी
*प्रमुख अतिथी* : श्री मनीषजी जगताप, ग्रामगीता जीवन विकास परीक्षा वर्धा जिल्हा अध्यक्ष, श्री पुरुषोत्तमजी थुटे - ज्येष्ठ गुरुदेव प्रचारक, नागपूर, श्री रामाजी देवडे - ज्येष्ठ गुरुदेव प्रचारक, सौ. अनिताताई कडू - जिल्हा महिला सेवा अधिकारी, नागपूर, विभागीय प्रचार प्रमुख श्री सावरकर गुरुजी, गिरड ठाण्याचे ठाणेदार विकास गायकवाड, सरपंच राजू नौकरकर यांच्यासह प्रभाकर निकम, अनिल सायंकाळ, विजय पोहनकर, दीपक डोंगरे, ईश्वर घानोडे, शालिक झाडे, वसंता निखाडे, श्री सुभाषजी ननावरे - तालुका संघटक उपस्थित होते.
*प्रमुख मार्गदर्शक* म्हणून श्री गोपालजी कडू - प्रचार प्रमुख, अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज मोझरी आणि श्री दादारावजी कुबडे - ज्येष्ठ गुरुदेव प्रचारक, हिंगणघाट यांनी प्रचारकांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी श्री विजयजी बारेकर - तालुका सेवा अधिकारी समुद्रपूर, श्री राजेंद्रजी जिकार - शहर तालुका सेवा अधिकारी समुद्रपूर, सौ. कलावतीताई जांभुळे - तालुका महिला सेवा अधिकारी, श्री बलवंतजी गाटे - अध्यक्ष श्री राम मंदिर देवस्थान गिरड, श्री प्रकाशजी धारणे, संदीप शिवणकर, प्रभाकर लोखंडे, मनीष जांभुळे, मारुतरावजी वरडोळे, धनराज बारेकर, गोपाल तेलरांधे आदी मान्यवर उपस्थित होते.
या विदर्भस्तरीय मेळाव्यासाठी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, भंडारा या जिल्ह्यांतील गुरुदेव प्रचारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन* जिल्हा प्रचार प्रमुख विष्णू ब्राह्मणवाडे यांनी केले, तर *प्रास्ताविक* सुभाषजी ननावरे यांनी केले.
मेळावा यशस्वी करण्यासाठी हर्षल थुटे, गौरव कावळे, वैभव अंड्रस्कर, मंथन भांदक्कर, मंगेश धोटे, किशोर तांदुरकर, रेखा डरे, पूनम ब्राह्मणवाडे, रोशनी तेलरांधे, तेजस्विनी कावळे, संगीता देवतळे, नंदिनी टिपले, अर्चना बारोकर नीलिमा भुजाडे यांच्यासह श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व प्रचारक, मंजुळा माता महिला भजन मंडळ आणि अनुसया माता महिला भजन मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले या प्रचार मेळाव्याच्या आभार प्रदर्शन विलास टोहळकर यांनी केले
राष्ट्रसंतांच्या सर्व धर्म समभाव" या विचारांना गावागावात पोहोचवण्याच्या निर्धाराने हा मेळावा संपन्न झाला.

