मुळा धरणातून शेतीसाठीचं आवर्तन लवकरच सुटणार...!
आमदार विठ्ठलराव लंघे यांची माहिती...!
म्हणाले, 'पालकमंत्री राधाकृष्ण विखेंशी बोलून निर्णय घेऊ...!
(अहिल्यानगर। जिल्हा विभागीय संपादक प्रशांत बाफना)
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नेवासे तालुक्यात सध्या पावसाचा जो लपंडाव सुरु आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाऊस नसल्यामुळे विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याची पातळी प्रचंड खालावली आहे. शेतात उभ्या असलेल्या कपाशी, सोयाबीन, बाजरी, ऊस, मका आणि हिरव्या चाऱ्यासाठी पाणी देण्याची आवश्यकता आहे. मात्र पावसाअभावी शेतीच्या पाण्याची मोठी गंभीर समस्या नेवासे तालुक्यात निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांना सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली. या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितलं, की ही परिस्थिती मलासुद्धा माहीत आहे. शेतकरी बांधवांचे मला यासाठी फोन येत आहेत. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशीसुद्धा या विषयावर दोन-तीन दिवसांपूर्वी मी बोललेलो आहे. त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी यासंदर्भात बोलून लवकरात लवकर शेतीसाठी मुळा धरणातून आवर्तन सोडता येईल का, यादृष्टीनं माझे प्रयत्न सुरु आहेत. पालकमंत्री विखे यांच्याशी चर्चा करुन मुळा धरणातून लवकरच शेतीच्या पाण्यासाठी आवर्तन सुरु करण्यात येईल, अशी माहिती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी मीडियाशी बोलताना दिली.
दरम्यान, नेवासे तालुक्यात सकाळी पावसाची भूर भूर नंतर लगेच सोसाट्याचा वारा आणि आणि त्यानंतर पडणारं रखरखीत ऊन या अशा विचित्र वातावरणामुळे शेतकऱ्यांना हसावं की रडावं, असं झालं आहे. एकीकडे शेतमालाला हमीभाव मिळत नाही तर दुसरीकडे निसर्गाकडून शेतकऱ्यांची अशी थट्टा सुरु आहे. पाण्याअभावी शेतात उभी असलेली हिरवीगार पीकं सुकून जात आहेत. हळूहळू जमिनीला भेगा पडत आहेत. वीज प्रवाह सुरु असताना इलेक्ट्रिक मोटर सुरु केली, की लगेचच विहीर आणि बोअरवेलमधलं पाणी संपून जातं. सध्याच्या परिस्थितीत पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र पाऊस नसल्यामुळे नेवासे तालुक्यातल्या अनेक भागांत फारच भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे.
नेवासे तालुक्यातल्या अनेक गावांत सध्या ऊस, मका, सोयाबीन, तूर, कपाशी अशा पिकांसह अनेक शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्यासाठी गिन्नी गवताची लागवड केली आहे. परंतू पावसाअभावी पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरी वर्गाला फार मोठी चिंता भेडसावते आहे. अशा परिस्थितीत मुळा धरणातून शेतीच्या पाण्यासाठीचं आवर्तन लवकरात लवकर सोडण्यात यावं, अशी अपेक्षा नेवासे तालुक्यातले शेतकरी करत आहेत.
दुसरीकडे मुळा धरण 100% भरण्याची पाटबंधारे विभागाचे अधिकारी वाट पाहत आहेत. कारण या धरणावर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाण्याची परिस्थिती अवलंबून आहे. या धरणातून शेती आणि पिण्याच्या पाण्याचं वर्षभरासाठीचं नियोजन केलं जातं. वर्षभर पुरेल, असा पाणीसाठा धरणात आहे का, शेतीसाठी मुळा धरणातून पाण्याचे आवर्तन सोडलं तर वर्षाच्या शेवटी म्हणजे रखरखीत उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित होणार नाही ना, अशी या अधिकाऱ्यांना चिंता लागून राहिली आहे. मात्र मुळा धरण सध्या ८० टक्क्यांपेक्षा जास्त भरलं असून या धरणात पाण्याची आवक चांगली असल्यामुळे शेतीसाठी आवर्तन सोडणं शक्य आहे.
दरम्यान, अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यात असलेलं मुळा धरण हे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ८० टक्क्यांच्या पुढे गेले असून पाणलोट क्षेत्रातल्या पावसानुसार सध्या ते सुमारे ८० ते ९० टक्क्यांच्या दरम्यान भरलेले आहे. या धरणाची एकूण साठवण क्षमता २१,२४७ दशलक्ष घनफूट म्हणजे TMC च्या मते सुमारे २१ ते २६ टीएमसीच्या आसपास कमाल क्षमता आहे. या धरणातला सध्याचा पाणीसाठा आणि टक्केवारी जर पाहिली तर या धरणात सुमारे ८०% पेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या पावसामुळे या धरणात पाण्याची आवक सतत सुरु आहे. त्यामुळे मुळा धरणातून शेतीला पाण्याचा आवर्तन सोडायला काहीच हरकत

