जळगाव जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर; निलेश भालेराव यांची जिल्हाध्यक्षपदी निवड..
(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)
जळगाव : ग्रामीण पत्रकारांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि पत्रकारांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या ग्रामीण पत्रकार संघाची जळगाव जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या निवडीसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
जळगाव जिल्हाध्यक्षपदी जळगाव महाराष्ट्र न्यूजचे संपादक मा. श्री. निलेश अशोक भालेराव यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी इंडियन पोलीस न्यूजचे संपादक हिरालाल परदेशी तसेच मिलिंदभाऊ सपकाळे यांची निवड करण्यात आली.
जळगाव तालुकाध्यक्षपदी श्रवण सपकाळे, जळगाव महानगराध्यक्षपदी हिरालाल बिऱ्हाडे, जळगाव युवा अध्यक्षपदी प्रमोद ठोंबरे, जामनेर तालुकाध्यक्षपदी मुकेश कोळी, जळगाव तालुका उपाध्यक्षपदी हिरालाल राजपूत तर भडगाव तालुकाध्यक्षपदी असिफ पठाण यांची निवड करण्यात आली.
यावेळी संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. राजूभाई जावरे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष निलेश भालेराव यांनी प्रदेशाध्यक्ष राजूभाई जावरे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
तसेच इंडियन पोलीस न्यूजचे संपादक हिरालाल परदेशी यांनी महाराष्ट्र महासचिव यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सार्वजनिक बोंबाबोंबचे प्रतिनिधी यांनी गोकुळदास जगताप यांचे स्वागत केले. तर महा धुरंधर न्यूजचे कार्यकारी संपादक मा. श्री. हिरालाल पा. बिऱ्हाडे यांनी ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष अनिल महिराळे यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अडचणी, पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न तसेच पत्रकारिता अधिक सक्षम करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

