जश्न-ए-ईद मिलादुन्नबी निमित्त लोटन चौकात KGN ग्रुपचा लंगर; सर्वधर्म समभावाची अनोखी परंपरा

जश्न-ए-ईद मिलादुन्नबी निमित्त लोटन चौकात KGN ग्रुपचा लंगर; सर्वधर्म समभावाची अनोखी परंपरा

(हिंगणघाट वर्धा जिल्हा विभागीय उपसंपादक मो मकसुद बावा)

हिंगणघाट : जश्न-ए-ईद मिलादुन्नबीच्या पवित्र पर्वानिमित्त हिंगणघाट शहरातील लोटन चौक येथे KGN ग्रुपच्या वतीने लंगर आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. गेल्या सात वर्षांपासून KGN ग्रुपकडून हा लंगर आयोजित केला जात असून, यंदाही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत लंगरचा प्रसाद घेतला.

विशेष म्हणजे या लंगरमध्ये धर्माची कोणतीही भिंत न ठेवता सर्व समाजातील नागरिक एकत्र येतात. हिंदू-मुस्लिमांसह विविध धर्मीय नागरिक एकाच ठिकाणी बसून लंगरचा प्रसाद घेत असल्याने सर्वधर्म समभाव आणि सामाजिक एकतेचे दर्शन या आयोजनातून घडले.

यावेळी सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मानही करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक, डॉ. निरमेश कोठारी, मो मकसूद बावा पत्रकार व इंटरनेशनल ह्यूमन राइट्स वर्धा जिला सचिव व हिंगणघाट तालुका अध्यक्ष, नगरसेवक विक्रांत भाई, नयन भाई तसेच पत्रकार अब्दुल कदीर बख्श यांचा KGN ग्रुपच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

ईद मिलादुन्नबीचा हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता प्रेम, बंधुभाव, माणुसकी आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा उपक्रम ठरला.

लोटन चौकातील या सात वर्षांच्या लंगर परंपरेतून हिंगणघाटच्या सामाजिक सलोख्याची आणि सर्वधर्मीय ऐक्याची सुंदर झलक पाहायला मिळाली.

आयोजक कमेटी, मो मुकीम शेख, अयान कुरेशी, अब्दुल साद, तालीम खान, रमजान शेख, रेहान खान

 मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक
Previous Post Next Post