स्वातंत्र्य दिनाच्या Dry Day रोजी भद्रावती पोलिसांची मोठी कारवाई; ६.२० लाखांचा मुद्देमाल जप्त
( महेश निमसटकर
जिल्हा विभागीय संपादक भद्रावती चंद्रपुर)
भद्रावती, दि. १५ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर Dry Day असताना भद्रावती पोलीस ठाणे हद्दीत अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ‘रॉकेट संत्रा’ देशी दारूच्या ३० पेट्या व दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली डिझायर कार असा एकूण ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
भद्रावती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी DYSP सचिन खेत्रे व पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना शास्त्रीनगर परिसरात अवैध देशी दारूचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने शास्त्रीनगर, भद्रावती येथे जाऊन पांढऱ्या रंगाची डिझायर कार क्र. MH-34-CR-1706 ताब्यात घेऊन तपासणी केली.
तपासणीमध्ये सदर वाहनात ‘रॉकेट संत्रा’ देशी दारूच्या एकूण ३० पेट्या आढळून आल्या. सदर दारूची किंमत ₹१,२०,०००/- असून दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या डिझायर कारची अंदाजे किंमत ₹५,००,०००/- आहे. अशाप्रकारे एकूण ₹६,२०,०००/- किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी आदित्य धनराज कांबळे, रा. मांगली, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर याच्याविरुद्ध भद्रावती पोलीस ठाणे गुन्हा क्र. ७७६/२०२६, कलम ६५(e) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक तपासामध्ये सदर दारू आरोपीने कोणाच्या सांगण्यावरून आणली तसेच सदर दारूचा पुरवठा कोठून करण्यात आला, याबाबत माहिती मिळविण्याच्या दृष्टीने तपास सुरू असून या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास करण्यात येत आहे.
सदर कारवाई DYSP सचिन खेत्रे व पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वाखाली API संजय मिश्रा, पोलीस कॉन्स्टेबल धीरज क्र. १३०५, पोलीस कॉन्स्टेबल प्रेम/ ८१६, पोलीस कॉन्स्टेबल योगेश / १९३२ व पोलीस कॉन्स्टेबल किरण/ ८६४, नितीन आमटे १२१० यांनी केली.
जप्त मुद्देमाल :
३० पेट्या देशी दारू – ₹१,२०,०००/-
डिझायर कार क्र. MH-34-CR-1706 – ₹५,००,०००/-
एकूण – ₹६,२०,०००/-
भद्रावती पोलीस ठाणे, जि. चंद्रपूर

