* ‘ *एक विद्यार्थी – एक झाड’ उपक्रमातून ऐनपूर विद्यामंदिरात पर्यावरण जागृती*

* ‘ *एक विद्यार्थी – एक झाड’ उपक्रमातून ऐनपूर विद्यामंदिरात पर्यावरण जागृती* 

( जळगाव प्रतिनिधी जितु इंगळे ) 


ऐनपूर, ता. रावेर : ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिर, ऐनपूर येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, तसेच वृक्षांचे महत्त्व आणि त्यांचे संवर्धन याची जाणीव व्हावी, या उद्देशाने शाळेच्या परिसरात विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रोपांची नियमित निगा राखण्याचा संकल्प केला.
यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणातील महत्त्व, वृक्षसंवर्धनाची गरज तसेच स्वच्छ व निरोगी पर्यावरणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. ‘एक विद्यार्थी – एक झाड’ हा संदेश देत प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या परिसरात झाडे लावून त्यांचे संगोपन करावे आणि पर्यावरण रक्षणात योगदान द्यावे, असे आवाहन मुख्याध्यापक अक्षय पाटील यांनी केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची भावना रुजण्यास मदत झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
Previous Post Next Post