शासकीय तालुका क्रीडा स्पर्धा हिंगणघाट व समुद्रपूर तालुका क्रीडा संयोजक आणि क्रीडा शिक्षकांची वर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न...l

शासकीय तालुका क्रीडा स्पर्धा हिंगणघाट व समुद्रपूर तालुका क्रीडा संयोजक आणि क्रीडा शिक्षकांची  वर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न...l
 
राजु कांबळे 
मिडिया पोलीस टाईम 
वर्धा, अमरावती, नागपूर विभागीय संपादक 

समुद्रपूर:  (दि. ५ ऑगस्ट ) हिंगणघाट येथील जी.बी. एम. महाविद्यालयातील सभागृहात वर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी सन्माननीया आशा मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचे मार्फत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन व नियोजन उत्कृष्ट रित्या पार पाडण्याच्या उद्देशाने व खेळाडूंमध्ये क्रीडा कौशल्य विकसित करणे, शिस्त,संघ भावना वाढविणे निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे या दृष्टीने शासकीय शालेय क्रीडा स्पर्धा संयोजकांची  (तालुका हिंगणघाट, समुद्रपूर) व क्रीडा शिक्षकांची सभा मोठ्या उत्साहात पार पडली.
 
या सभेचे  अध्यक्षा म्हणून माननीया आशा मेश्राम (वर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी), माननीय श्री. टाकळे सर (गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती हिंगणघाट), माननीय श्री. अनिल निमगडे  सर( क्रीडा अधिकारी), माननीय श्री संदीप खोब्रागडे सर (तालुका क्रीडा अधिकारी) माननीय श्री. जमीन शेख सर (तालुका क्रीडा अधिकारी), माननीया सायली चन्नावर मॅडम ( क्रीडा अधिकारी ), माननीया वानखेडे मॅडम (क्रीडा  मार्गदर्शक) जी. बी.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री. फुटाणे सर, उपमुख्याध्यापक माननीय श्री. कुरेशी सर व्यासपीठावर उपस्थित होते.
 
वरील सर्व मान्यवरांनी हिंगणघाट व समुद्रपूर क्रीडा शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले. या सभेत राज्यस्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू हार्दिक विनोद भुते (व्हॉलीबॉल) जी.बी. एम. महा. हिंगणघाट, कु. कनक विनोद कोल्हे (ज्युडो, ब्राँझ मेडल् ),संजय गांधी विद्यालय हिंगणघाट, श्लोक पटेल (क्रिकेट) विद्या भवन स्कूल हिंगणघाट, जावरिया शेख (wushu) जे डी  चौधरी महाविद्यालय वाशी(तालुका समुद्रपूर) यांचा  माननीया आशा मेश्राम (वर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी) यांच्या हस्ते सत्कार करून खेळाडूंना गौरविण्यात आले .

या शासकीय तालुका क्रीडा स्पर्धेच्या सभेला हिंगणघाट व समुदपूर तालुक्यातील क्रीडा शिक्षक व जी. बी. एम. कॉलेजचे कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेचे सूत्रसंचालन खांडरे सर( हिंगणघाट तालुका क्रीडा संयोजक) तर आभार प्रदर्शन राजु कांबळे सर (समुद्रपूर तालुका क्रीडा संयोजक )यांनी केले.
Previous Post Next Post