सातपुड्यातील मोहमांडली येथे गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.

सातपुड्यातील मोहमांडली येथे गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.


( यावल भुसावळ विभागीय संपादक सुरेश खैरनार)

 जळगाव जिल्ह्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सातपुड्यातील मोहमांडली येथे गरजू नागरिक व कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

पाडळसे येथील देवेंद्र खैरनार, संकेत भाई, निलेश पाटील, शुभम भोई, उमेश कोळी तसेच मोहमांडलीचे पोलीस पाटील फारुख तडवी यांनी सहभाग घेत गरजू कुटुंबांना धान्य, तेल व इतर जीवनावश्यक वस्तूंची मदत केली.

दुर्गम भागातील नागरिकांना अडचणीच्या काळात आधार मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. संकटाच्या काळात गरजूंच्या मदतीला धावून जाणे हीच खरी माणुसकी असून, समाजातील नागरिकांनीही गरजूंना शक्य ते सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी देवेंद्र खैरनार यांनी केले आहे.

या मदतीमुळे गरजू आदिवासी कुटुंबांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
Previous Post Next Post