तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत अँग्लो उर्दू हायस्कूल पाचोरा संघाचे घवघवीत यश..मुलींच्या १४ वर्षांखालील व १७ वर्षांखालील तसेच मुलांच्या १७ वर्षांखालील गटात उल्लेखनीय कामगिरी.

तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत अँग्लो उर्दू हायस्कूल पाचोरा संघाचे घवघवीत यश..

मुलींच्या १४ वर्षांखालील व १७ वर्षांखालील तसेच मुलांच्या १७ वर्षांखालील गटात उल्लेखनीय कामगिरी.

पाचोरा तालुका प्रतिनिधी 

पाचोरा, दि. २२ सप्टेंबर २०२६ :
एम. एम. कॉलेज, पाचोरा येथे दि. २२ सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अँग्लो उर्दू हायस्कूल, पाचोराच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उल्लेखनीय यश संपादन केले. शाळेच्या खेळाडूंनी विविध वयोगटांत आत्मविश्वासाने खेळ करत आपल्या कौशल्याची छाप उमटवली.

१४ वर्षांखालील मुलींच्या गटात
१) अकसा शेख अस्लम
२) जोया जावेद पटेल
३) अरिबा मोहम्मद अजहर खान
४) आसिया लतीफ खान

१७ वर्षांखालील मुलींच्या गटात
१) अरबीना शेख वासिम
२) तहुरा सैय्यद फिरोज मनियार
३) शिफा सैय्यद आरिफ मनियार
४) आलिया अमजद खान

१७ वर्षांखालील मुलांच्या गटात
१) राहिब राजिक बागवान
२) तमीम शाकीर अली बागवान
३) उमेर रशीद शेख
४) शेख हुजेर जावेद
५) मोहम्मद फरहान मुशर्रफ खान

या सर्व खेळाडूंनी तालुकास्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा पुढे नेली. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांसोबतच क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचेही दर्शन घडले आहे.
खेळाडूंच्या या यशामागे त्यांची मेहनत, सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि आत्मविश्वास महत्त्वाचा ठरला. तसेच शाळेचे क्रीडा शिक्षक मोहम्मद अजहर खान सर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन व प्रशिक्षण देत त्यांच्या खेळातील कौशल्यांना योग्य दिशा दिली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शोएब अहमद तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे अँग्लो उर्दू हायस्कूल, पाचोरा यांच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, भविष्यातही शाळेचे खेळाडू जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
Previous Post Next Post