संत सेना महाराजांच्या जयघोषाने भुसावळ दुमदुमलेनाभिक संघाच्या वतीने श्री संत सेना महाराज, विठ्ठल-रुक्मिणी व गणपती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य पालखी मिरवणूक

संत सेना महाराजांच्या जयघोषाने भुसावळ दुमदुमले

नाभिक संघाच्या वतीने श्री संत सेना महाराज, विठ्ठल-रुक्मिणी व गणपती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य पालखी मिरवणूक

(भुसावळ तालुका प्रतिनिधी)

भुसावळ : नाभिक संघ भुसावळ शहराच्या वतीने श्री संत सेना महाराज, विठ्ठल-रुक्मिणी व श्री गणपती मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरात जामनेर रोड भव्य पालखी व मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या याप्रसंगी प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे पुरुषोत्तम नारखेडे अनिता आंबेकर यांनी मुर्ती पूजन केले मिरवणुकीत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांसह राज्यभरातून तसेच मध्य प्रदेश व गुजरात येथून सुमारे ३ हजार समाजबांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे नाभिक संघाच्या महिला कार्यकारिणीतील सुमारे 300 महिला एकसारख्या साड्या परिधान करून व फेटा बांधून पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. तसेच पुरुष कार्यकारिणीतील सुमारे २०० पदाधिकारी व कार्यकर्ते पारंपरिक पांढऱ्या पोशाखात व भगव्या टोप्या परिधान करून दिंडीत सहभागी झाले होते.

पालखी मिरवणुकीत चार अश्व विशेष आकर्षण ठरले. तसेच शेगाव येथील तरुण मुलींच्या पथकाने धार्मिक गीतांच्या तालावर पावली सादर करत, टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि ‘विठुरायाचा जयघोष’ करत वातावरण भक्तिमय केले. संपूर्ण मिरवणुकीत भगवे ध्वज, टाळ-मृदुंगाचा निनाद, धार्मिक गीते आणि संत सेना महाराजांच्या जयघोषामुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते.

मिरवणुकीत समाजातील महिला, पुरुष, युवक-युवती व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विविध भागांतून आलेल्या समाजबांधवांनी एकजुटीचे दर्शन घडवत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह द्विगुणित केला.

या भव्य मिरवणुकीच्या आयोजनात पूर्व विभाग अध्यक्ष सचिन सोनवणे, अध्यक्ष संजय बोरसे, सचिव प्रशांत बाणाईत, उपाध्यक्ष भिका बाणाईत, कार्याध्यक्ष अनिल टोंगे, उदय सोनवणे, हेमंत सणांचे, कैलास वारुळकर, राहुल वाघ, गिरीश पगारे, विनोद आंबेकर, संजय गालफाडे,शांताराम सोनगिरे, अप्पा अहिरे,पंडित सणांचे, विजय चौधरी, सुशील शिरनामे यांच्यासह महिला अध्यक्ष चित्रा सोनवणे, सरपंच नीलम सोनवणे, शोभा निकम, सीमा चौधरी, विजय निकम, प्रमिला पवार तसेच नाभिक समाजातील महिला व पुरुष पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठिकठिकाणी समाज बांधवांनी चहा नाश्ता कॉफीचे स्टॉल देखील लावले होते.

श्री संत सेना महाराज, विठ्ठल-रुक्मिणी व श्री गणपती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित या भव्य मिरवणुकीमुळे भुसावळ शहरात नाभिक समाजाच्या एकजुटीचे आणि धार्मिक-सांस्कृतिक परंपरेचे भव्य दर्शन घडले.
Previous Post Next Post