धर्माबाद येथे धनगर समाजाचे आंदोलन
(धर्माबाद नांदेड तालुका प्रतिनिधी सज्जन संतोष)
धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करावी, तसेच समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या अनुषंगाने धर्माबाद तालुक्यातील समाज बांधवांच्या वतीने तहसील धनगर कार्यालयात निवेदन देऊन जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करावी, यासह समाजाच्या विविध मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. धनगर समाजाच्या हक्क व न्याय्य मागण्यांसाठी शासनाने
ठोस पावले उचलावीत, अशी भावना उपस्थित समाजबांधवांनी व्यक्त केली.
या आंदोलनात धर्माबाद तालुक्यातील धनगर समाजाचे सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच असंख्य समाजबांधव सहभागी झाले होते. तहसील कार्यालय परिसरात समाजाच्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात धनगर समाज युवा मल्हार सेना नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष नागनाथ जिंकले, गोविंद सोनटक्के, शिवदर्शन दाणेकर, साईनाथ जिंकलोड, विठ्ठल ऊरेकर, मारोती भरडेकर, राजाराम दाणेकर, बिरेश्वर भंडारे, ईरेश सूर्यकर यांच्यासह धर्माबाद तालुक्यातील असंख्य धनगर समाजबांधव उपस्थित होते.

