सरकार मराठा आंदोलनाची दखल घेते... बंजारा आंदोलनाची दखल का घेत नाही?*
📚📚📚📚📚📚📚📚📚📚
*संघर्ष योद्धा विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस*
*
••••••••••••••••••••••••••••••
(जिंतूर जिल्हा प्रतिनिधी कृष्णा पवार)
1) 5 सप्टेंबर 2026 पासून विनोद आडे यांच्या आमरण उपोषणास सुरुवात.
2) आमरण उपोषणाला वाढता पाठिंबा बघून एका पोलीस अधिकाऱ्यांनी विनोद आडेची दमदाटी केली.
3) काल उपोषण स्थळी चार ते पाच हजार लोकांची उपस्थिती होती.
4) हळूहळू वाढणारी जनतेची गर्दी हीच खरी उपोषणाची ताकद.
5) बंजारा समाजाला एसटी आरक्षणाचा लाभ मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असा संघर्ष योद्धा विनोद आडेचा दावा.
जिंतूर शहरांमध्ये महानायक वसंतराव नाईक साहेब चौकामध्ये संघर्ष योद्धा विनोद आडे यांनी 5 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता आपले उपोषण सुरू केले. हळूहळू गर्दी वाढू लागली आणि संघर्ष योद्धा विनोद आडे यांच्या बंजारा एसटी आरक्षण मागणीच्या आमरण उपोषणाला जनतेचा पाठिंबा मिळू लागला. तरीही सरकार मराठा आरक्षण आंदोलनाची दखल घेत आहे. परंतु बंजारा एसटी आरक्षण आंदोलनाची दखल घेत नाही. उलट एका पोलीस अधिकाऱ्याने सर्व नियम धाब्यावर बसून संघर्ष योद्धा विनोद आडे यांचीच दमदाटी केली. ही समाजासाठी फार लाजिरवाणी गोष्ट असून त्यांनी केवळ विनोद आडे यांचा अपमान केला नाही तर तमाम महाराष्ट्रातील अडीच कोटी बंजारा समाजाचा अपमान केलेला आहे. याची गंभीर दखल सरकारने घ्यायला पाहिजे अशी मागणी आता सोशल मीडियावर जोर धरत आहे. त्या पोलीस अधिकाऱ्याला कायदा- बियदा माहित आहे की नाही?, त्यांनी संविधान वाचले आहे की नाही? अशी दमदाटी त्यांनी आंतरवाली मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी केली असती तर त्यांना फार महाग पडले असते. मराठा समाज हा जागृत आहे, त्यांच्यामध्ये एकी आहे, त्यांचे सर्वच नेते त्यांना सपोर्ट करतात एवढेच नव्हे तर अनेक राष्ट्रीय नेते आंतरवाली मध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट सुद्धा घेतली आहे हे सर्व आपण इलेक्ट्रॉनिक मीडियातून पाहिलेले आहे. म्हणूनच मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सक्सेस होताना दिसते. सरकार त्यांच्या सोबत वाटाघाटी करण्यास सदैव तत्पर आहेत. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की, सरकार मराठा आंदोलनाची दखल घेते,परंतु बंजारा एसटी आरक्षण आंदोलनाची दाखल का घेत नाही? याचे मुख्य कारण म्हणजे बंजारा समाजामध्ये एकी नाही, बंजारा समाजातील नेत्यांना आरक्षणाच्या बाबतीत काही घेणे देणे नाही. ( त्यांना घेणे देणे असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा), एवढेच कशाला बंजारा समाजातील विविध संघटनाचा एकजुटीने विनोद आडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याऐवजी वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळी आंदोलन, उपोषण करण्याचा घोषणामुळे समाज संभ्रमात पडलेला आहे. श्रेय घेण्याच्या वादामध्ये बंजारा समाजाच्या सर्वच संघटना अडकलेल्या आहे. प्रत्येकाला वाटते की मी बंजारा समाजाचा नेता झालो पाहिजे परंतु बंजारा समाजाचे प्रश्न कसे मार्गी लागतील याकडे मात्र कोणत्याही संघटनेची किंवा कोणत्याही नेत्याचे अजिबात लक्ष नाही ते केवळ तीच उत्सवामध्ये आपले सत्कार करून घेण्यामध्ये मशगुल आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार साहेब अंतरवाली मध्ये जातात, बंजारा समाजाचे नेते जिंतूरला का जात नाही? ते शरद पवार साहेबापेक्षा मोठे आहेत का? या प्रश्नाचे उत्तर ना समाजाजवळ आहे, ना समाजातील नेत्याजवळ आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे. आज संघर्ष योद्धा विनोद आडेच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. पोलीस प्रशासनाकडून त्यांची दमदाटी सुरू आहे तरीही महाराष्ट्रातील तमाम बंजारा समाज झोपला आहे. अंतरवालीमध्ये हजारो मराठा बांधव पोहोचलेले असताना आणि 12 सप्टेंबर 2026 ला मुंबईकडे प्रस्थान करण्याच्या तयारीत असताना मात्र आपला बंजारा समाज गाढ झोपेत आहे. तो जिंतूरला का जात नाही? नाही जाणार, तो नेत्याची हुजरेगिरी करण्यामध्ये दंग आहे. कोणाला रस्त्याचे काम पाहिजे , कोणाला बदलीचे काम मिळाले की आपले लोक खुश! आमचा नेता महान. अरे भामट्यांनो ठेकेदारी मिळवण्यापेक्षा संबंधित नेत्याला उपोषण स्थळी जाण्यासाठी भाग पाडा.. तुम्हा आम्हाला लाज वाटायला पाहिजे आज विनोद आडे आपला जीव धोक्यात घालून गोरगरीब लोकांच्या मुलांना नोकरीमध्ये आरक्षण मिळण्यासाठी तो जीवाची बाजी लावत आहे आणि आपण गाढ झोपेत आहो. येणारी पिढी नक्कीच आपल्याला माफ करणार नाही.
*बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण द्या, नाहीतर आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता?*
बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी संघर्ष योद्धा विनोद आडे यांनी सुरू केलेल्या आरक्षणाची धग आता महाराष्ट्रभर पाहायला मिळणार आहे. *गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांनी 13 सप्टेंबर 2026 पासून महाराष्ट्रभर तालुक्याच्या ठिकाणी साखळी उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे.*
तसेच राजेश चव्हाण सोलापूर, रमेश महाराज पोहरादेवी, देविदास राठोड छत्रपती संभाजीनगर, सुनील राठोड अहिल्यानगर, सचिन राठोड उमरगा, पंढरीनाथ चव्हाण लातूर, गोविंद चव्हाण बीड, राम पवार पुणे, संतोष आडे परभणी, रमेश जाधव हिंगोली, भारत चव्हाण नांदेड, सुधीर पवार नागपूर, सचिन जाधव जळगाव ,नामदेव राठोड मुंबई, सुरेश राठोड नांदेड या व अशा अनेक समाज बांधवांनी *12 सप्टेंबर 2026 मध्यरात्रीपासून पासून महाराष्ट्रातील 4272 तांड्यामध्ये चुलबंद आंदोलनाची घोषणा केलेली असून समाजाच्या इतिहासात प्रथमच सर्व बांधव एकवटणार आहेत.* बंजारा समाजाच्या अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील तब्बल 4,272 तांडयावर एकाच वेळी चुलबंद पोषण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. समाजाच्या हक्कासाठी होणाऱ्या या सामूहिक आंदोलनात महाराष्ट्रातील बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभाग नोंदवणार असून या आंदोलनामुळे शासनासमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. समाजाच्या विविध घटकांमध्ये असलेले मतभेद बाजूला ठेवून एसटी आरक्षणाच्या एका प्रमुख मागणी करीता संपूर्ण समाज चुलबंद आंदोलनाचा निर्धार करणार आहे. तांड्यातील घराघरातूनही आंदोलनात सहभाग नोंदवून शासनाचे लक्ष बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे आंदोलन केवळ एका व्यक्तीचे किंवा एका संघटनेचे नसून समाजाच्या सामुहिक भावना आणि हक्काच्या मागणीचे आंदोलन म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक तांड्यावरून समाज बांधवांनी एकजुटीने सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात येत आहे.
*बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी गेल्या वर्षभरात उपोषण करणारे संघर्ष योद्धे जवळपास 25 लोकांनी बंजारा समाजाच्या काशी म्हणून ओळख असलेल्या मानोरा तालुक्यातील पोहरागडदेवी येथे 12 सप्टेंबर 2026 पासून सामूहिक उपोषणाची घोषणा केलेली आहे*.
या सर्व घडामोडी लक्षात घेऊन काल जिंतूर मध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून जवळपास चार ते पाच हजार लोकांनी एकत्रितपणे येऊन आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने ठोस निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आलेली आहे.
बंजारा समाजाला आरक्षण देण्याचा प्रश्न केवळ न्यायालयीन प्रक्रिये पुरता मर्यादित न ठेवता सरकारने आपल्या घटनात्मक अधिकाराचा वापर करून त्यावर मार्ग काढावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर उपोषण करण्याचा विविध संघटनेने निर्णय घेतलेला आहे. ही गोर बंजारा समाजासाठी फार मोठी उपलब्ध मानावी लागेल.
*मुंबईतही आंदोलन करण्याचा निर्णय*
जर संघर्ष योद्धा विनोद आडे यांच्या उपोषणाची दखल सरकारने घेतली नाही तर मुंबईत उपोषण करण्याचा निर्णय काही लोकांनी घेतल्याचे सोशल मीडियावरून कळते. आज विनोद आडे यांच्या उपोषणाला पाच दिवस झालेले असताना आणि त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असताना सुद्धा सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीने पुरेशी चर्चा आंदोलकांशी केलेली नाही. विनोद आडेलाच दमदाटी सुरू असल्याचे सोशल मीडियावरून दिसते हे सर्व गंभीर प्रकार पाहता बंजारा समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावर चीड निर्माण झालेली आहे. सरकार समाजाच्या मागण्याबाबत वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप आंदोलन विनोद आडे यांनी केलेला असून मुंबईमध्ये जेव्हा विनोद आडे यांनी उपोषण सुरू केले होते त्यावेळेस सुद्धा आपल्याच समाजातील लोकांनी घोर फसवणूक केली होती हा इतिहास आपल्या सर्वांनाच माहित आहे. परंतु ते यावेळी फसणार नाही कारण त्यांच्या सोबत आता महाराष्ट्रातील विचारवंतांची टीम आहे.
*उपोषण योद्धा विनोद आडे यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस*
विनोद आडे यांचा जिंतूर येथील उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे तरीही शासनाचे कोणत्याही प्रतिनिधीने किंवा समाजातील धुरकरी नेत्यांनी भेटी दिलेल्या नाही. विनोद आडे यांची वैद्यकीय तपासणी सुरू जरी असली तरी त्यांची दिवसेंदिवस तब्येत खालावत असून त्यांच्या आईने मंडपात भेट देऊन चिंता व्यक्त केलेली आहे. तरीही सरकारच्या वतीने कोणत्याही प्रतिनिधी मंडळांनी बंजारा समाजाच्या आरक्षण मागण्या संदर्भात ठोस निर्णय झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे विनोद आडे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. आता सरकार परत शिष्टमंडळ पाठवणार का? विनोद आडे यांच्या उपोषणावर काही तोडगा निघणार की, मुंबई उपोषणा सारखे त्यांची घोर फसवणूक होणार का? किंवा ते उपोषण मागे घेणार का? असे विविध प्रश्न बंजारा समाजातील उपस्थित नागरिकांना भेडसावत आहेत. उपोषण मंडपाला महाराष्ट्रातील अनेक गावातील नागरिक भेटी देत असून काल चार ते पाच हजार लोकांचा मोठा जन समुदाय विनोद आडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होता असे ऐकिवात आहे.
*आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे.*
काल अचानक उपोषण योद्धा विनोद आडे यांचा फोन आला. पोलीस प्रशासनाकडून दमदाटी होत असल्याबाबतची चिंता त्यांनी व्यक्त केली आणि ते म्हणाले की, बंजारा समाजातील नेतेमंडळी आणि मुख्यमंत्री यांची मिलीभगत असून ते बंजारा समाजाची फसवणूक करत आहे. बंजारा समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी समाजातील विचारवंतांनी आणि समाजाने पुढे यावे व सरकारवर दबाव तंत्राचा वापर करावा असे आव्हान त्यांनी केले आहे. मी मेलो तरी चालेल परंतु उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतलेली आहे. गेल्या एक वर्षापासून आपण बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या न्याय मागणीसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहोत. अनेक आंदोलने केली, मोर्चे काढले, उपोषण केली, सरकारचे दरवाजे ठोठावले, मुंबई पर्यंत जाऊन आपल्या समाजाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पण आज एक वर्ष पूर्ण होत आले तरी सरकारने आपल्या समाजाच्या या ज्वलंत प्रश्नाची मनावी तशी दखल घेतली नाही. उलट प्रत्येक वेळी आश्वासनाच्या नावाखाली आपल्याला वेळ देण्यात आला मुंबईतही आपल्या समाजाला अपेक्षेप्रमाणे न्याय मिळाला नाही. माझ्याकडे रस्त्यावरची लढाई लढण्याची ताकद आहे. समाजाला एकत्र करण्याची जिद्द आहे. पण या लढ्याला योग्य दिशा देण्यासाठी तुमच्यासारख्या अभ्यासकांची, कायद्यांची आणि संविधानाची जाण असलेल्या व्यक्तीची गरज आहे. गेल्या प्रत्येक संघर्षात आपण माझ्या पाठीशी गंभीरपणे उभे राहिलात. मी जेव्हा अडचणीत होतो, जेव्हा अनेक प्रश्न निर्माण झाले तेव्हा आपण मला मार्गदर्शन केले त्याबद्दल मी आयुष्यभर आपला ऋणी राहील. आता मी 5 सप्टेंबर 2026 पासून पुन्हा आमरण उपोषणाला बसलो आहे. यावेळी मात्र मनाशी निर्णय घेतला आहे आता माघार नाही. माझा हा संघर्ष कोणत्याही व्यक्ती विरुद्ध नाही, कोणत्याही राजकीय पक्षविरोधी नाही, हा संघर्ष आपल्या समाजाच्या न्याय हक्कासाठी आहे. 5 सप्टेंबर पासून सुरू केलेल्या निर्णायक संघर्षात माझ्या पाठीशी उभे राहून बंजारा समाजाच्या मागणीच्या अभ्यासपूर्ण लढायचे नेतृत्व आपण करा एवढीच विनंती विनोद आडे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
*जिंतूर शहरात येण्याचे आव्हान*
विनोद आडे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून समाजातील महत्त्वपूर्व घटकांनी जिंतूर शहरात येऊन उपोषणाला पाठिंबा देण्याबाबतचे आव्हान विनोद आडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेले आहे. हा लढा काही एका व्यक्तीचा नाही तर संपूर्ण गोरबंजारा समाजाच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि भावी पिढ्यांच्या भविष्याचा लढा आहे. आज आपण एकजूट दाखवली नाही तर उद्या आपल्या मुलांच्या हक्कासाठी प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकारी आपल्याकडे राहणार नाही. महाराष्ट्रात ठीक ठिकाणी आरक्षणाच्या मागणी संदर्भात 55 मोर्चे झाले, 5 लोकांनी आपला जीव गमावला, 25 लोकांनी आमरण उपोषण केली तरीही सरकार वेळकाढूपणा करत असेल आणि बंजारा समाजातील काही उपोषण योद्धा स्वतःच्या जीवाची परवा न करता आमरण उपोषण करत असताना आपण केवळ बघ्याची भूमिका घेऊन योग्य ठरणार नाही. यासाठी मोठ्या संख्येने समाज बांधवांनी आपली एकजूट दाखवून विनोद आडे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला तर निश्चितच सरकारला जाग येईल आणि सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबत सकारात्मक विचार करेल ही काळया दगडावरची रेघ आहे. हे आपण सर्वांनी ध्यानात घेतले पाहिजे.
*कोणत्याही मार्गाने आरक्षणाचा प्रश्न सोडवा*
बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षापासून विविध पातळ्यावर संघर्ष सुरू आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू तथा राष्ट्रीय संत परमपूज्य डॉ. संत रामरावबापू महाराज यांनी मुंबई येथील आझाद मैदान आणि दिल्ली येथील जंतर मंतरवर प्रथमतः उपोषण केले होते. त्यामुळे ही फार जुनी मागणी असून त्यानंतर अनेक वर्षापासून विविध पातळीवर संघर्ष सुरू आहे. या संघर्षाचे स्वरूप रस्त्यावरील आंदोलन, आमरण उपोषण सरकारला माहित आहे. तरीही सरकारने वेळ काढूपणा सोडून बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाचा सकारात्मक विचार करावा एवढीच मागणी तमाम बंजारा समाजाकडून होताना आज रोजी दिसत आहे.
*जय सेवा...जय वंसत!*
*✍️कृष्णा पवार- मीडिया पोलीस टाईम्स संपादक ठाणे मुंबई 9930381999*

