*फुले -शाहू -आंबेडकर विचारधारा शोधची प्रेरणा*डॉ.डी.एन.जाधव यांच्या " शोध"कादंबरीचे प्रकाशन ..

*फुले -शाहू -आंबेडकर विचारधारा शोधची प्रेरणा*
डॉ.डी.एन.जाधव यांच्या " शोध"कादंबरीचे प्रकाशन ..


(छत्रपती संभाजीनगर: जिल्हा प्रतिनिधी)

ग्रामीण जीवनातील अज्ञान,अंध:कार व अंधश्रद्धा दूर सारून एक संघ समाज उभा करण्यासाठी, समाजातील अनिष्ट चाली रितींना पायबंद घालणे विशेष: हुंडाबळी, बालविवाह, व्यसनाधिनता, जातीयता व जातीयतेच्या नावाखाली होणारा अन्याय, अत्याचार, उपेक्षा यासारख्या विषमता मुलक रुढी -परंपरांना तिलांजली देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली सामाजिक समता प्रस्थापित करणे हा शोध कादंबरीचा उद्देश असून फुले -शाहू -आंबेडकर विचारधारा ही या कादंबरीची खरी प्रेरणा आहे, असे भावोदगार लेखक डॉ. डी.एन.जाधव यांनी काढले. गणेशनगर,एन. १३ मधील झेप सभागृहात डॉ.डी.एन.जाधव यांच्या " शोध" या कादंबरीचे प्रकाशन शनिवारी झाले.
      अध्यक्षस्थानी भारतीय घटनेचे अभ्यासक तथा प्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजेंद्र शेजूळ होते.झेप पुरस्कार निवड समिती अध्यक्ष श्रीमती एस.बी. साळवे यांच्या हस्ते कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले.तर उदघाटन झेपच्या विश्वस्त सुमनताई साळवे यांनी केले.याप्रसंगी सुभेदार भीमराव साळवे,मुख्याध्यापिका सुनिता गवई,आदर्श शिक्षिका अनिता रणक्षेत्रे, प्रसिद्ध कवयित्री सुनंदा पगारे,आशा पल्हाळ, सविता साळवे,सुखदेव पल्हाळ,जगदीश राकडे, सुदाम मगर,प्रशांत राणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.राजेंद्र शेजूळ म्हणाले, साहित्य हे मानवी मनाचे भरणपोषण करीत असल्याने जीवन समृध्द करीत असते. साहित्य हे एकप्रकारचे बौद्धिक वंगण आहे.कारण त्यामुळे भावनिक व बौद्धिक ओलावा निर्माण होत असतो. भारतात प्रेमचंद यांच्या कादंबऱ्यांणी वाचकांना वेड लावले आहे.साहित्य क्षेत्रात प्रत्येक कादंबरीकारांचा एक वाचक वर्ग आहे. लेखक डॉ.डी.एन.जाधव यांची शोध कादंबरी वाचकांच्या पसंतीस पडेल यात तिळमात्र शंका नाही.
मुख्याध्यापिका म्हणाल्या, अगदी गरीब घराण्यात लहानची मोठी झालेली शोध उच्चशिक्षित होते पण नोकरी नाही लागली तरी खसून न जाता ताट मानाने समाजात उभे राहून मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचती, ही कादंबरी मुलांना प्रेरणा देणारी ठरेल.
अनिता रणक्षेत्रे म्हणाल्या, शोधचे आईवडील तिचं लग्न एका गरीब शेतकरी मुलाशी लावून देतात. काही कारणास्तव ते विभक्त राहतात ,नंतर ती मुख्यमंत्री पदावर पोहचती तरी पण पतीला विसरत नाही,यातुन तीचं मोठेपण दिसून येते.सुनंदा पगारे म्हणाल्या,एखादे पुस्तक लिहिने म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव करणे नव्हे, आपल्या अनुभवांना, विचारांना आणि समाजा बद्दलच्या जाणिवांना वाट देणे आहे. अंधारलेल्या वाटेवरती ,एक दिवा पेटत केला.संघर्षाच्या वादळातून ,नवा शोध उमटत गेला.
सूत्रसंचालन बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक तथा विचारवंत डॉ.पंडित आराक यांनी केले.आभार शिल्पा राणे यांनी मानले.कार्यक्रमाला झेप साहित्य चळवळीचे पदाधिकारी, साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे विशेष!
Previous Post Next Post