श्री *संत पितांबर महाराज पुण्यतिथी सप्ताहाचा भक्तिमय वातावरणात समारोप*
पातूर : येथील श्री संत पितांबर महाराज संस्थान, पितांबरवाडी येथे आयोजित श्री संत पितांबर महाराज पुण्यतिथी महोत्सव व पारायण सप्ताहाची सांगता भक्तिमय वातावरणात झाली.
(पातुर अकोला तालुका प्रतिनिधी दूल्हे खान)
दि. २८ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या सप्ताहात दररोज काकडा, पारायण, हरिपाठ, हरिकीर्तन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाच्या निमित्ताने परिसरातील वारकरी, भजनी मंडळे, टाळकरी तसेच भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
सप्ताहादरम्यान विविध मान्यवर महाराजांचे कीर्तन व प्रवचनाचे कार्यक्रम पार पडले. भाविकांनी धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेत पितांबर महाराजांच्या चरणी श्रद्धा अर्पण केली.
मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आल्याने संपूर्ण परिसर आकर्षक व भक्तिमय वातावरणाने उजळून निघाला होता. संस्थान, उत्सव समिती, भक्त मंडळ व गावकऱ्यांच्या संयुक्त सहकार्याने महोत्सवाचे नियोजन करण्यात आले.
सप्ताहाच्या समारोपानिमित्त भाविकांची मोठी उपस्थिती राहिली असून, संपूर्ण सप्ताहात पितांबर महाराजांच्या नामस्मरणाने परिसर दुमदुमून गेला.
संस्थान, उत्सव समिती, भक्त मंडळ आणि गावकऱ्यांच्या संयुक्त सहकार्याने महोत्सवाचे नियोजन करण्यात आले.
शेवटच्या दिवशी केशव महाराज मोरे म्हैसपूर यांचे काल्याचे कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली.
*पालखी मिरवणुकीने भक्तिमय वातावरण*
सप्ताहाच्या सांगतेनिमित्त संत पितांबर महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत वारकरी, टाळकरी, भजनी मंडळे व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि भक्तिमय वातावरणाने परिसर दुमदुमून गेला होता.
मिरवणुकी अगोदर धार्मिक विधी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
संपूर्ण सप्ताह यशस्वी करण्यासाठी श्री संत पितांबर महाराज संस्थान, उत्सव समिती, भक्त मंडळ, वारकरी, भजनी मंडळे आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. भाविकांना धार्मिक कार्यक्रमांचा लाभ मिळावा यासाठी आयोजक दामोदर किसन राऊत यांनी योग्य नियोजन केले.

