श्री .अभयसिंह पाटील सर यांची क्रीडा सचिव पदी निवड...

श्री .अभयसिंह पाटील सर यांची क्रीडा सचिव पदी निवड...


(राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )


अहिल्यानगर जिल्ह्यामधील राहुरी तालुक्यातील डॉ .तनपुरे सह .साखर कारखाना संचलित व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संलग्न असणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा शिक्षक श्री .अभयसिंह पाटील सर यांची नुकतीच राहुरी तालुका क्रीडा अध्यापक संघटनेच्या सचिव पदी निवड करण्यात आली .
राहुरी तालुका क्रीडा अध्यापक संघटनेची बैठक नुकतीच पार पडली यावेळी श्री .अभय सिंह पाटील सर यांची सर्वानुमती निवड करण्यात आली .
श्री .अभय सिंह पाटील सर यांची राहुरी तालुका क्रीडा अध्यापक संघटनेच्या सचिव पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे डॉ .तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री .अरुण साहेब तनपुरे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली )कोळसे मंडळाचे सेक्रेटरी श्री .हर्ष दादा तनपुरे .जॉईंट सेक्रेटरी श्रीसुनील मोरे विद्यालयाचे प्राचार्य श्री बी .एल.शिरसाट सर पर्यवेक्षक श्री .एस .व्ही .चव्हाण सर विद्यालयाचे कलाध्यापक श्री .विशाल तागड सरआदींसह विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकेतर कर्मचारी आदींनी सरांचे अभिनंदन करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या
Previous Post Next Post