राजु पाटील शिंपाळकर यांना शहीद विर भगतसिंह राष्ट्रीय पुरस्कार’ने सन्मानित..लातूर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राष्ट्रीय अधिवेशनात गौरव..

राजु पाटील शिंपाळकर यांना शहीद विर भगतसिंह राष्ट्रीय पुरस्कार’ने सन्मानित..

लातूर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राष्ट्रीय अधिवेशनात गौरव..

मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

नांदेड :बिलोलीचे जेष्ठ पञकार..सामाजिक कार्यकर्ते राजु पाटील शिंपाळकर यांच्या सामाजिक, पत्रकारिता तसेच संघटनात्मक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी १७ सप्टेंबर रोजी लातुर येथे शहिद विर चंद्रशेखर आझाद यांचे नातु मा. अमितजी आझाद यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शहीद विर भगतसिंह राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्यमन राईटस मिशन यांच्या वतिने दरवर्षी प्रमाणे यंदाही लातूर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी १७ सप्टेंबर रोजी आयोजित १६ व्या राष्ट्रीय अधिवेशनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.समितीच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य, सर्व सामान्यांच्या प्रश्नांसाठी घेतलेली संघर्षाची भूमिका तसेच पत्रकारिता क्षेत्रातून समाजहितासाठी केलेले कार्य आणि समितीने सोपविलेल्या विविध जबाबदा-या एकनिष्ठणे व कर्तव्यदक्षतेने पार पाडल्या बद्दल या राष्ट्रीय अधिवेशनाचे विशेष आकर्षक भारत मातेच्या स्वातंञ्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे शहीद विर चंद्रशेखर आझाद यांचे नातु मा.अमितजी आझाद तिवारी व त्यांच्या पत्नी सौ. नेहाजी तिवारी यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा,राष्ट्रीय सरचिटणीस अमोल नाजकर प्रदेश अध्यक्ष बाबुराव क्षेञे पाटील महीला प्रदेश अध्यक्षा ॲड. राणीताई स्वामी, प्रदेश अध्यक्ष निवड समिती अनिल देसले, झारखंड प्रदेश अध्यक्षा अरविंदर कौर, राष्ट्रीय समन्वयक हितेश दाभाडे,योगिता ठाकुर,शिवा काळे,शंकरराव मावलगे यांच्यासह आनेक प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित बिलोलीचे जेष्ठ पञकार सामाजसेवक व अ.भा.भ्र. समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस राजु पाटील शिंपाळकर यांना सदर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुर्वी देखील राजु पाटील यांच्या विविध क्षेञातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन आनेक पुरस्काराने ते सन्मानित झाले.तसेच यावेळी दर वर्षीप्रमाणे यंदाही समितीच्या वतीने देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद वीर जवानांच्या कुटुंबीयांतील वीर माता-पिता-पत्नीचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच समितीचे नांदेड जिल्हाध्यक्ष शंकर मावलगे यांच्या समितीच्या संघटनात्मक कार्याची दखल घेऊन गौरवण्यात आले.सदर पुरस्काराने सन्मानित झाल्या बद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडुन अभिनंदन होत आहे.
Previous Post Next Post