काय उध्वस्त करणार आमच्याकडं काय ... आहे, आम्हाल केस कुठून उगवले याचीही चौकशी करा आम्ही चौकशीला भीत नाहीत; जरांगे पाटलांचा रामदास कदमांवर जोरदार पलटवार..
बीड/प्रशांत बाफना: महाराष्ट्र राज्य विभागीय संपादक
आम्ही चौकशाला भीत नाहीत, आमच्या काय चौकश्या करायच्या त्या करा, आम्हाला केस कुठून उगवले त्याच्याही चौकश्या करा. तुम्ही काय उध्वस्त करणार आहात् आम्हाला, आमच्या जवळ काय आहे... अशा संतापात जरांगे पाटील यांनी शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांच्यावर पलटवार केला.
मराठा आरक्षण आंदोलक जरांगे पाटील यांनी श्री क्षेत्र नारायगडावरील दसरा मेळाव्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 500 कोटी रुपयांच्या देवाण- घेवाणीचा गंभीर आरोप केला. शिंदे साहेबांनी आजच्या दसरा मेळाव्यात अथवा उद्या संध्याळपर्यंत याचं उत्तर द्यावं असा इशारही जरांगे पाटीलय दिला होता. जरांगे पाटील यांच्या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. शिंदे सेनेच्या दसरा मेळाव्यात याचे तीव्र पडसाद उमटले. शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनी जरांगे पाटील यांच्यावर शिवराळ भाषेत टिका केली होती, रामदास कदम म्हणाले होते की, हा कोण जरांगे याची लायकी आहे का एकनाथ शिंदे साहेबांवर बोलायची. तुला उध्वस्त करून टाकू. मराठ्यांना शिंदे साहेबांनी दिलं आहे, शिंदे साहेबच मराठ्यासाठी देव आहेत. हा जरांगे हारामखोर निघाला. याच्याकडे महागड्या गाड्या कोठून आल्या याची चौकशी लावाच एकदा! होऊ जाउ द्या एकदा दुध का दुध आणि पाणी का पाणी. तु कसं उपोषण करत होता, बाथरुममध्ये जाऊन खात होतास आमच्या नादाला लागू नकोस असं म्हणत रामदास कदम यांनी जरांगे पाटलांवर टिका केली होती.
जरांगे पाटलांनी रामदास कदम यांच्यावर पत्रकार परिषदेत जोरदार पलटवार केला. जरांगे पाटील म्हणाले की, मी काल दसरा मेळाव्यात काय म्हटलं होतं की, भाजपमध्ये अशी कुजबूज आहे की एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांना श्रीकांत शिंदे मार्फत 500 कोटी दिले, जरांगे आपले ‘थर्ड परसन’ आहेत. शिंदे साहेबांनी याचं उत्तर द्याव. शिंदे साहेबांनी मला 500 कोटी दिले असं ते म्हणत असतील, तर शिंदे साहेबांनी मला देण्यासाठी भाजपकडून शिंदे साहेबांनी 500 कोटी घेतले का? असं मी म्हटलो. साहेबांनी सांगितल्याशिवाय ते कुजबूज करतात कारतायत का? उद्या 11:00 च्या नंतर तुम्ही शोधा आणि उत्तर द्या. त्यात दोन उपमुख्यमंत्र्यांचे पण नावं आहेत. त्यामध्ये खूप भयानक आहे, हिंदी बोलत आहेत मराठी बोलत आहेत, उद्या कळेल. इतक्या लांब हात कसा घातला असं वाटेल, प्रमाणपत्र रद्द केल्याचे पाप झाकण्यासाठी नवीन टोळ्या तयार केल्या. या सगळ्यांच्या मागे तेच आहेत उद्या आणखी एक सांगतो त्याच्यात तर ते पायच धरणार नाहीत. माझा बोलवता धनी बिनी काही नाही बाबा. मी कोणाच्या मनावर बोलत नाही, मी काय लेचा पिचा नाही असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
जरांगे पाटील यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले जरांगे पाटील हे समाजाचं काम करत आहेत, मराठा समाजाचं काम करत असताना आत्तापर्यंत कोणताच नेता, मंत्री जे करू शकला नाही ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना करून दाखवलं आहे. पाचशे कोटी देण्याचा आणि घेण्याचा प्रश्नच नाही. जरांगे पाटील यांनी आरोप करण्यापूर्वी शहानिशा करणं अवश्यक होतं. त्यांच्याकडे जे पुरावे आहेत ते त्यांनी तपास यंत्रणेकडे द्यावेत

