*पुणे विभागाच्या दौऱ्यात मान्यवर पत्रकार बांधवांशी संवाद; लोकशाही पत्रकार महासंघाच्या बळकटीसाठी सकारात्मक चर्चा!🎙️🔥*
मुंबई प्रतिनिधी
लोकशाही पत्रकार महासंघ भारताच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पुणे विभागाच्या दौऱ्यादरम्यान संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची, ज्येष्ठ पत्रकार बांधवांची व हितचिंतकांची सदिच्छा भेट घेण्याचा योग आला. यावेळी सर्वांनी केलेला मनःपूर्वक सन्मान, प्रेमपूर्वक स्वागत आणि दिलेल्या शुभेच्छा हा माझ्यासाठी अविस्मरणीय व प्रेरणादायी अनुभव ठरला.
या भेटीत *सकाळ माध्यम समूहाचे जेष्ठ पत्रकार* आमचे जिवलग मित्र संतोषजी शेंडकर, लोकशाही पत्रकार महासंघाचे राज्य कार्यकरणी सदस्य प्रमोदजी गोळे, सरचिटणीस हलिमाताई शेख, व इतर पत्रकार बांधवांनी मनापासून अभिनंदन केले. संघटनेच्या भावी वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन करत त्यांनी माझ्यावर आणि संघटनेच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.हा सन्मान केवळ एका पदाचा नसून, पत्रकारांच्या हक्कांसाठी, न्यायासाठी आणि स्वाभिमानासाठी लढण्याची मोठी जबाबदारी आहे,
आपण दाखवलेला विश्वास हीच माझी प्रेरणा आणि पत्रकारहितासाठी अविरत कार्य करण्याची ऊर्जा आहे.आपले प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्य असेच कायम राहो!
*आपलाच*
*संदिप जाधव🎙️*
*राष्ट्रीय अध्यक्ष*
*लोकशाही पत्रकार महासंघ भारत*🇮🇳

