सगरोळी येथे नवरात्री विशेष भव्य मोफत,आरोग्य शिबिर संपन्न. नवरात्र दुर्गा महोत्सव मंडळाचा, उपक्रम आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा.

सगरोळी येथे नवरात्री विशेष भव्य मोफत,आरोग्य शिबिर संपन्न.

 नवरात्र दुर्गा महोत्सव मंडळाचा, उपक्रम आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा.

मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

नांदेड : बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे,नवरात्र दुर्गा महोत्सव मंडळाच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे, दिनांक 17/10/2026 रोजी आयोजन करण्यात आले होते, आरोग्य सेवा हीच खरी ईश्वरसेवा,हे ध्येय मनाशी बाळगून नवरात्र दुर्गा महोत्सव मंडळांनी या शिबिराचे आयोजन केले.या शिबिरास मार्गदर्शक डॉ. संदीप तुकडे डॉ.साईबाबा अंकुशकर, डॉ. माधवराव कटके,डॉ. अजय कटके,यांच्यासह अशोक पाटील,संजय पाटील चिलनोड,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन,आणि नवरात्र दुर्गा मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते,मोठ्या संख्येने उपस्थित होते.आरोग्य हीच खरी संपत्ती या भावनेतून राबवलेल्या,या उपक्रमाबद्दल नवरात्र दुर्गा महोत्सव मंडळाचे, गावकरी व आजूबाजूच्या गावातील नागरिक,मंडळाचे अभिनंदन करण्यात आले, या शिबिरास रक्तदाब, साखर तपासणी, डोळे तपासणी,आणि मोफत औषध वाटप करण्यात आले, शिबिरात आरोग्य विषय जनजागृती,करण्यावर भर देण्यात आला. डॉ. संदीप तुकडे,यांनी आरोग्य राखण्याच्या उपायाबद्दल मार्गदर्शन केले, तर डॉक्टर साईबाबा अंकुशकर यांनी आरोग्याबद्दल,टिपा पटवून दिले. व डॉ. माधव कटके यांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी ही माहिती दिली,यावेळी गावातील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते, व राजकीय नेते आपल्या, मनोगतातून नवरात्र दुर्गा महोत्सव मंडळाचे अभिनंदन करण्यात आले यावेळी, मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक व गावातील नागरिक या मोफत आरोग्य शिबिरांचा लाभ घेण्यात आला.
Previous Post Next Post