शेख हसनैन कलीम यांची 'आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी' निवड, महाविद्यालयात आनंदाचे वातावरण
(रावेर / शेख शरीफ)
स्थानिक इकरा एज्युकेशन सोसायटी संचलित एच. जे. थिम कॉलेज, जळगाव येथील एम.ए. उर्दू द्वितीय वर्षाचा होतकरू विद्यार्थी शेख हसनैन कलीम याने क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याची प्रतिष्ठित अशा 'आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी' निवड करण्यात आली आहे.
शेख हसनैन हा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (KBCNMU) अधिकृत फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करत अमरावती विद्यापीठात आयोजित होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना होत आहे.
त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सलार, सर्व संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वकार शेख तसेच समस्त प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्याचे हार्दिक अभिनंदन करून त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्यार्थ्याच्या या यशात महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक (डायक्रेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन) डॉ. चांद खान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. शेख हसनैनच्या या यशाबद्दल संपूर्ण महाविद्यालय परिसर आणि सहकारी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.

