भद्रावती पोलिसांची गौतम नगरात कारवाई; १ लाख ७२ हजार ८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त.प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा व खर्रा तयार करताना तिघे आढळले; घरमालक अतुल कोल्हे याचा शोध सुरू.

भद्रावती पोलिसांची गौतम नगरात कारवाई; १ लाख ७२ हजार ८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त.

प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा व खर्रा तयार करताना तिघे आढळले; घरमालक अतुल कोल्हे याचा शोध सुरू.



महेश निमसटकर 
ज़िल्हा प्रतिनिधी चंद्रपूर 


भद्रावती 18 :-भद्रावती शहरातील गौतम नगर परिसरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा करून खर्रा तयार केला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर भद्रावती पोलिसांनी १८ ऑक्टोबर २०२६ रोजी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत एकूण १ लाख ७२ हजार ८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
      पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, गौतम नगर येथील अतुल कोल्हे याच्या घरी पंचांच्या उपस्थितीत झडती घेण्यात आली. यावेळी अनिकेत विनोद डोंगरे (वय २३, रा. हनुमान नगर, पांडव वार्ड, भद्रावती), दीपक सुनील कुसनाके (वय २५, रा. पिपरबोडी, ता. भद्रावती) आणि यश मारोती दुपारे (वय १९, रा. चंडिका वार्ड, भद्रावती) हे सुगंधित तंबाखू, चुना व सुपारी मिसळून खर्रा तयार करताना आढळले.
      पोलिसांनी घटनास्थळावरून अंदाजे १ लाख ५३ हजार ६०० रुपयांची सुगंधित तंबाखू, १२ हजार रुपयांची ४० किलो खर्रा सुपारी, २ हजार ४२० रुपयांचे व्ही-१ किंग पॅक तंबाखू, ३ हजार ३६६ रुपयांचा विमल पानमसाला, ५०० रुपयांचा चुना आणि २०० रुपयांच्या प्लास्टिक 

पिशव्या असा एकूण १ लाख ७२ हजार ८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त साहित्याचे नमुने पंचांच्या सह्यांनी सीलबंद करून रासायनिक विश्लेषणासाठी राखून ठेवण्यात आले.
      या प्रकरणातील घरमालक अतुल कोल्हे हा कारवाईच्या वेळी घटनास्थळी आढळून आला नाही. तो फरार असल्याची माहिती असून, त्याचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू आहे. प्रतिबंधित तंबाखूच्या साठ्याबाबत तसेच संबंधित व्यवसायातील संभाव्य सहभागाबाबत पुढील तपास करण्यात येत आहे.
       या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७५, ४९, ३(५) तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ मधील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
      ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक पेतरस सिडाम यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खाडे, पोलीस हवालदार विजय तलांडे, 
भारत पुसांडे, प्रेमकुमार बावनकर, 
शंकर घुगे, किरण चांदणे, महिला पोलीस शिपाई रागिनी रायपुरे आणि अदिबा यांनी केली.
      भद्रावती शहर व परिसरात प्रतिबंधित तंबाखूची विक्री, खर्रा तयार करणे किंवा अन्य अवैध धंदे सुरू असल्याची माहिती नागरिकांना मिळाल्यास त्यांनी पोलिसांना कळवावे. तातडीच्या पोलीस मदतीसाठी डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
Previous Post Next Post