यावल येथील मनुदेवी आदिवासी शिक्षण संस्था आणि तत्कालीन यावल न.प.बांधकाम विभाग प्रमुखावर फौजदारी दंडात्मक कारवाईची मागणी.

यावल येथील मनुदेवी आदिवासी शिक्षण संस्था आणि तत्कालीन यावल न.प.बांधकाम विभाग प्रमुखावर फौजदारी दंडात्मक कारवाईची मागणी.

यावल दि.१९(सुरेश पाटील)

यावल येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक यांच्याकडील दि.१७ नोव्हेंबर २०२४ चे पत्र यावल भूमी अभिलेख उपअधीक्षक यांच्या कार्यालयात आढळून येत नाही.तसेच कार्यालयातून निर्गमित झालेले दिसून येत नाही असे भूमी अभिलेख उप अधीक्षक कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक यांनी लेखी स्वरूपात माहिती पत्र दिल्याने.संबंधितांवर दंडात्मक आणि फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी तक्रारदार यांनी केली. 

यावल येथील दिनकर गोविंदा इंगळे यांनी यावल तहसीलदार व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दि.१० ऑक्टोबर २०२६ रोजी रजिस्टर स्पीड पोस्टाने केलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की,यावल येथील मनुदेवी आदिवासी शिक्षण संस्थेने यावल नगर परिषद मालकीची गट नंबर ७५६ मधील 'ओपन स्पेस' जागा अक्वावायर करण्यासाठी दिलेले पत्र हे उपअधीक्षक भूमी अभिलेख यावल यांनी दिलेले नाही.आणि तसे यावल येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक तथा जन माहिती अधिकारी रवींद्र खरे यांनी दि.८ जून २०२६ रोजी लेखी स्वरुपात दिनकर गोविंदा इंगळे यांना कळविले आहे. 
या पत्रानुसार श्री मनुदेवी शिक्षण संस्थेने नगरपालिकेला खोटे पत्र दिले व गट नंबर ७५६ चे ओपन स्पेस जागेवर अतिक्रमण करून लोखंडी पत्राचे कंपाउंड करून ओपन स्पेस जागा ताब्यात घेतली आहे व त्यावर संस्थेची अतिक्रमित संस्थेच्या इमारतीचे प्रथम दर्शनी दरवाजा गेट,जिना, शौचालय,मुतारी बांधलेली असल्याने संस्था चालकावर आणि यावल नगरपरिषद बांधकाम विभागातील संबंधित अधिकारी कर्मचारी किंवा ठराव करणाऱ्या सदस्या विरुद्ध फौजदारी व दंडात्मक कारवाई करावी अशी तक्रार यावल तहसीलदार व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिनकर इंगळे यांनी केल्याने या यावल नगरपरिषदेतील सत्ताधारी व विरोधी सदस्यांचे लक्ष लागून आहे. 

यावल येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडील दिनांक १७ नोव्हेंबर २०२६ रोजीचे खोटे पत्र ( भूमी अभिलेख कार्यालयातून पत्र न गेलेले ) प्रत्यक्ष बघितले असता सदर जागा देण्याबाबतचे कागदपत्र पत्रव्यवहार तसेच गट नंबर ७५६ आजूबाजूचे लगतदारक यांची नावे व बनावट स्वाक्षरीचे पत्र इकडील कार्यालयास सादर केलेले आहे. हे पत्र तयार करताना संस्थेच्या बाजूच्या एका प्रतिनिधीने संस्थाचालकास आर्थिक माध्यमातून विश्वासात घेऊन मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्याने संस्थाचालक वाढदिवसानिमित्त त्या परिसरात सतत येत जात असतात अशी यावल शहरात चर्चा आहे.
Previous Post Next Post