पाण्यासाठी देसवंडी गावातील महिलांचा ग्रामपंचायती वर हंडा मोर्चा..
(राहुरी तालुका प्रतिनिधी - ( प्रविण पाळंदे )
ऐन दुष्काळामध्ये बारागाव नांदूर मधील 14 गावाची पाण्याची योजना ही ग्रामपंचायती कडे असणाऱ्या थकीत बिलामुळे बंद करण्यात आली असून सदर त्यामुळे तब्बल 15 ते 16 गावांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद झाला असून तब्बल साठ हजाराहून अधिक नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे .
राहुरी तालुक्यातील देसवंडी गावाच्या संतप्त महिलांनी ग्रामपंचायत हंडा मोर्चा आणला देसवंडी गावामध्ये गेल्या पाच ते सहा दिवसापासून पाणी नसल्याने सदर गावच्या महिलांनी आपला रोष ग्राम पंचायतीसमोर व्यक्त केला असून देसवंडी येथील महिलांनी सांगितले की आमचे पाण्याचे खूप हाल चालू असून आम्हाला इकडून तिकडून किंवा राहुरी येथून पाणी आणावे लागत आहे यावेळी महिला म्हणाल्या की आम्ही आमच्या नळपट्ट्या भरलेल्या असून आम्ही थकबाकीत नसतानाही आमचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे हे काम सरपंचाचे असल्याने सरपंचांनी आमच्या पिण्याच्या पाण्याची सोय करून द्यावी जर आम्ही महिला भगिनी रानामध्ये कामधंदा करून घरी आल्यावर तांभर पाणी पिण्याची इच्छा झाली तरी ग्लासमध्ये पाणी घेऊन तहान भागवावी लागते .
यावेळी देसवंडी गावचे सरपंच हे म्हणाले की तसे पहिले गेले तर महिलेचा रोष हा योग्य आहे महाराष्ट्र मध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने महाराष्ट्र सरकारने दुष्काळ जाहीर केला असून तसेच नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री .राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहुरी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केला आहे पाणीपुरवठा योजनेने बंद केलेला पाणीपुरवठा व सक्तीने वसूल करणे हे अयोग्य आहे योजनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांना माझे एकच सांगणे आहे की सक्तीने वसुली करणे व पाणीपुरवठा बंद करणे ही वेळ नसून सदर पाणीपुरवठा योजनेवर 47 सदस्य असून या सदस्यांमधील एक दोन सदस्य असे आहेत की ते स्वतःलाच पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष समजतात बाकीच्या सदस्यांची मते विचार ते जाणून घेत नाहीत पुढे सरपंच म्हणाले की पाणीपुरवठा योजनेने गावाचा पाणीपुरवठा बंद करण्यासंदर्भात आधी ग्रामपंचायत तिला एक दोन नोटीसा देणे गरजेचे होते मुळा धरण हे आमच्या अगदी जवळ असून आज मी तिला आमच्या माता भगिनींना ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्याची वेळ येत आहे हे फक्त पाणीपुरवठा योजनेमध्ये मनमानी स्वयंघोषित अध्यक्ष उपाध्यक्ष व काही संचालक बॉडी मध्ये जे नेते आहेत त्यांच्यामुळे ही वेळ आली आहे 14 गाव पाणीपुरवठा योजना आहे त्यामध्ये मी स्वतः संचालक मंडळात असून मी सुद्धा पाणीपुरवठा योजनेचा सदस्य असून हे जर असेच चालू राहिल्यास मी माझ्या पाणीपुरवठा योजनेच्या संचालक पदाचा राजीनामा याआधीच दिलेला असून सदर पाणीपुरवठा योजनेच्या बॉडीने तो स्वीकारला नसल्याने व हे जर असेच चालू राहिल्यास त्यावेळेस मी स्वतः पाणीपुरवठा योजनेची मीटिंग चालू असताना मी सदर मीटिंग हॉलला कुलूप लावल्याशिवाय गप्प बसणार नाही व होईल तेवढे प्रयत्न करून लवकरात लवकर देसवंडी गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यास मी दिवस-रात्र एकत्र करून गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवेल असेही सरपंचांनी सर्व हंडा मोर्चा घेऊन आलेल्या महिलेसमोर सांगितले .

