*'ऑपरेशन प्रहार' अंतर्गत शहर वाहतूक शाखेची मोठी कारवाई; अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई करून लाखोंचा मुद्देमाल जप्त*
(अकोला जिला विभागीय संपादक इमरान खान )
अकोला / दिनांक: ६ ऑक्टोबर २०२६ जिल्ह्यात अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्ध पोलीस पोलीस अधीक्षकाची चांडक साहेब , अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील साहेब यांनी सुरू केलेल्या 'ऑपरेशन प्रहार' (Operation Prahar) अंतर्गत शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी एक अत्यंत मोठी व धडक कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे वाहतूक पोलिसांनी सापळा रचून अवैधरित्या प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडले असून, या कारवाईत लाखों रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अर्चित चांडक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली , अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या संपूर्ण जिल्ह्यात 'ऑपरेशन प्रहार' अत्यंत प्रभावीपणे राबवले जात आहे. यादरम्यान, शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाला एका वाहनातून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित आणि मानवी आरोग्याला घातक असणाऱ्या गुटख्याची अवैध वाहतूक केली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीवरून वाहतूक शाखेच्या पथकाने डाबकी रोड रेल्वे ओवर ब्रिज गायगांव रोड येथे तातडीने नाकाबंदी करून संशयास्पद वाहन क्रमांक MH 30 BC 0342 याची कसून तपासणी केली. या तपासणी दरम्यान वाहनामध्ये दोन इसम १) यश दिनेश शर्मा , वय २२ , रा डबकी रोड , अकोला २) शेख समिर शेख आमिर , वय २८ , रा अकोट फैल , अकोला मोठ्या प्रमाणात गोण्यांमध्ये लपवून ठेवलेला वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित सुपारी जसे की विमल , वाह , राज निवास , V 1 , W आढळून आला. पोलिसांनी गुटखा साठ्यासह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन असा एकूण ३,२६,००० रु चा लाखोंचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला आहे.
पुढील कायदेशीर कारवाई:
या प्रकरणी संबंधित आरोपींना डबकी रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, प्रतिबंधित अन्नपदार्थांची अवैध वाहतूक आणि विक्री केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि स्थानिक पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलीस प्रशासनाचा इशारा:
'ऑपरेशन प्रहार' अंतर्गत अवैध दारू, जुगार, अंमली पदार्थ आणि प्रतिबंधित गुटखा विक्री/वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा अवैध व्यवसाय खपवून घेतला जाणार नाही आणि अशा समाजकंटकांवर यापुढेही अशीच कडक व धडक कारवाई सुरू राहील, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
*सदर कारवाही माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक साहेब , बी चंद्रकांत रेड्डी साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील साहेब , यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील साहेब जिल्हा व शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला , GPSI ठाकूर , पोलीस हवलदार कदिर गवळी , पोलीस हवालदार संतोष गावंडे , पोलीस कॉन्स्टेबल अच्युत वानखडे , कबीर अन्सारी , दिलीप पवार , योगेश चौधरी , महेश पाचपिल्ले , चालक अरविंद खोडे , रिषभ शर्मा , ट्रॅफिक वॉर्डन उमेश वाघमारे यांनी केली*

