विनापरवाना लोखंडी तलवार बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध भद्रावती पोलिसांची कारवाई
महेश निमसटकर
ज़िल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
भद्रावती दी.15/10/2026 रोजी पोलीस स्टेशन भद्रावती येथील पोलीस पथक गस्तीवर असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मुन्ना मारोती मरसकोल्हे, वय 57 वर्षे, रा. भंगाराम वॉर्ड, भद्रावती, जि. चंद्रपूर याच्या घरात लोखंडी धारदार तलवार असून तो सदर तलवारीचा वापर परिसरातील नागरिकांना धाक दाखविण्यासाठी करीत आहे.
सदर माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन त्यांच्या परवानगीने पोलीस पथक आवश्यक साहित्यासह घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर संबंधित इसमाच्या घराची माहिती घेऊन पंचांसमक्ष घराची झडती घेण्यात आली. त्यावेळी घराच्या आत असलेल्या एका खोलीत प्लास्टिकच्या ड्रमची पाहणी केली असता, त्यामध्ये लोखंडी तलवार आढळून आली. सदर तलवारीची पाहणी केली असता तिचे पाते लोखंडी असून तलवारीची एकूण लांबी 52.5 सेंटीमीटर असल्याचे दिसून आले.
सदर तलवार बाळगण्याबाबत आरोपीकडे परवाना आहे किंवा कसे, याबाबत विचारणा केली असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले. त्यामुळे पंचांसमक्ष सदर लोखंडी तलवार जप्त करून तिचे योग्य प्रकारे सीलबंद करण्यात आले. याप्रकरणी आरोपी मुन्ना मारोती मरसकोल्हे याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा, 1959 च्या कलम 4 व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन खेत्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली API संजय मिश्रा, पोलीस हवालदार धर्मराज मुंडे, पोलीस अंमलदार प्रशांत शेंडेरे, अनुप अस्टणकर, देवानंद दुकरे, प्रेमकुमार बावनकर, शंकर घुगे, संतोष राठोड व महिला पोलीस अंमलदार रागिणी रायपुरे यांनी केली.

