मराठवाडा पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार राजेंद्र शिंदे शिंपाळकरांना मतदारांचा वाढता पाठिंबा
मारोती एडकेवार
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
नांदेड :मराठवाडा पदवीधर मतदार संघातील विधानपरिषदेचे अपक्ष उमेदवार राजेंद्र लक्ष्मणराव शिंदे शिंपाळकर यांचे समाजसेवेचे कार्य व मतदारसंघातील दांडगा जनसंपर्क व समाज माध्यमातुन मिळत आसलेला मतदारांचा वाढता प्रतिसाद पहाता ते प्रचारात आघाडीवर आसल्याचे दिसुन येत आहे.
मराठवाडा पदवीधर मतदार संघातील मतदान येत्या २३ आक्टोबर रोजी पार पडणार आसुन या निवडणुकीत ४१ उमेदवार रिंगणात उतरले आसुन आता हि निवणुक प्रचाराचा दुसऱ्या टप्पा गाठ आसताना या निवडणुकीतील बिलोलीचे जेष्ठ पञकार सामाजिक कार्यकर्ते अपक्ष उमेदवार राजेंद्र लक्ष्मणराव शिदे - शिंपाळकर अनु. क्र. ३७ यांचे गत अनेक दशका पासून पञकारीते सोबतच सामाजिक कार्याच्या चळवळीच्या माध्यमातून शिक्षक, पदवीधर, सुशिक्षितांच्या प्रश्ना सोबतच शेतकऱ्यांचे व विविध वंचित घटकांचे प्रश्न प्रभाविपणे मांडुन त्याना न्याय मिळवुन देण्याचा यशस्वी प्रयत्न केले. या त्यांच्या एंकदरीत विविध क्षेञातील यशस्वी सामाजिक कार्यामुळे नांदेड जिल्हा्यासह मराठवाड्यात विविध क्षेञाच्या माध्यमातून त्यांच मतदाराशी आसलेल मोठ संघटन जाळ्याच या निवडणुकीत त्याना मतदान रुपी मोठ बळ मिळणार आहे. सध्या प्रचार फेरीचा दुसरा टप्पा गाठलेल्या प्रचार फेरीत राजेंद्र उर्फ राजु पाटील शिंपाळकरांनी प्रत्यक्ष गाठी भेटी,सोशल मिडीयासह वेगवेगळ्या माध्यमातून प्रचारात मोठी आघाडी घेतल्याची नांदेड जिल्ह्यात व मतदार संघात एकदरीत जोरदार चर्चा आहे.

