स्वतंत्र भारतात संविधानापेक्षा कोणीही मोठे नाही.आपण सर्वांनी संविधानाचे महत्त्व लक्षात ठेवून त्याचा सन्मान केला पाहिजे." तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील.

"स्वतंत्र भारतात संविधानापेक्षा कोणीही मोठे नाही.आपण सर्वांनी संविधानाचे महत्त्व लक्षात ठेवून त्याचा सन्मान केला पाहिजे." तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील.

 
यावल दि.१६(सुरेश पाटील) दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता अत्यंत साध्या पद्धतीने काँग्रेस कमिटीचे यावल तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त यावल येथील काँग्रेस कार्यालयात शुभेच्छा देण्यात आल्या. शुभेच्छा देताना प्रशांत पाटील म्हणाले की "स्वतंत्र भारतात संविधानापेक्षा कोणीही मोठे नाही.आपण सर्वांनी संविधानाचे महत्त्व लक्षात ठेवून त्याचा सन्मान केला पाहिजे."

राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने सामाजिक परिस्थितीचे भान ठेवून वाढदिवस कोणताही मोठा गाजावाजा न करता साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
 
यावेळी यावल काँग्रेस कार्यालयात काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी प्रशांत दादा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले यावल शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हकीम भाई,अमोल भिरुड,नगरसेवक करीम मनियार,काँग्रेसचे कट्टर एकनिष्ठ कार्यकर्ते अशफाक शाह, अफजल तडवी,माजी नगरसेवक अस्लम शेख,नगर सेवक रुबाब आप्पा तडवी,डॉ तुषार सोनवणे, बोदले नाना,नगर सेवक पराग सराफ,जगदीश भाऊ,तेनु सोनार,नईम भाई,फिरोज मनियार,दीपक कोळी,शरद दादा यांच्यासह इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
यावेळी तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "स्वतंत्र भारतात संविधानापेक्षा कोणीही मोठे नाही.आपण सर्वांनी संविधानाचे महत्त्व लक्षात ठेवून त्याचा सन्मान केला पाहिजे."
 
तसेच आगामी काळात काँग्रेस पक्षाची सत्ता निश्चितपणे येईल, असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,सरपंच व सदस्यांनी एकजुटीने कामाला लागावे,असे आवाहन त्यांनी केले.
 
आगामी निवडणुकांमध्ये सर्वांनी एकत्र येऊन संघटन मजबूत करावे,गावागावात जनसंपर्क वाढवावा आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रामाणिकपणे मेहनत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
 
यावेळी वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित सर्वांनी प्रशांत दादा पाटील यांना शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Previous Post Next Post