क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस’ भव्य सोहळ्याच्या आयोजनाची

क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस’ भव्य सोहळ्याच्या आयोजनाची

यावल (प्रतिनिधी) सुरेश खैरनार 

महाराष्ट्र शासना च्या आदिवासी विकास विभागा अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल (जि. जळगाव) यांच्या वतीने
रविवार ,दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,जळगाव येथे संपन्न होणार आहे.
आदिवासी समाजाला स्वाभिमान, अस्मिता आणि हक्कांची जाणीव करून देणारे महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

प्रमुख उपस्थिती:अध्यक्षस्थान: राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. गुलाबराव पाटील,प्रमुख अतिथी: मा.ना. श्रीमती रक्षाताई खडसे (केंद्रीय राज्यमंत्री, क्रीडा व युवक कल्याण विभाग),मा.ना. गिरीश महाजन (मंत्री, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य),मा. ना. संजय सावकारे (मंत्री, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य)
याशिवाय जिल्ह्यातील सर्व सन्माननीय खासदार, विधानसभा व विधानपरिषद सदस्य तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांकडून आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास,शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, शैक्षणिक प्रगती तसेच आदिवासी बांधवांच्या सामाजिक व आर्थिक उन्नती संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाची सुरुवात रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण (जी.एस. ग्राऊंड), जळगाव येथून जिल्हाधिकारी कार्यालय, जळगावपर्यंत काढण्यात येणाऱ्या भव्य प्रभातफेरीने होणार आहे. या प्रभातफेरीत पारंपरिक आदिवासी वाद्यांचा गजर आणि विविध घोषणांच्या निनादातून आदिवासी संस्कृती,परंपरा तसेच क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या गौरवशाली कार्याचा जनजागृतीपर संदेश दिला जाणार आहे.
याच सोहळ्यात शासनाच्या विविध वैयक्तिक व सामूहिक कल्याणकारी योजनांमधील पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व आर्थिक सहाय्याचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेसह विविध योजनांच्या लाभांचे वितरण करून आदिवासी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास,समृद्ध संस्कृती, पारंपरिक कला, सामाजिक अस्मिता आणि विकासाचा जागर करणारा हा सोहळा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरणार आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा आणि संघर्षाचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासह आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीला चालना देण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधव,भगिनी, विद्यार्थी, युवक-युवती तसेच नागरिकांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन प्रकल्प अधिकारी अरुण पवार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि. जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Previous Post Next Post