डॉ. अण्णा भाऊ साठे वाचनालयात लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती उत्साहात साजरी
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड : बिलोली तालुक्यातील हिप्परगा थडी, येथे डॉ. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे अभ्यासिका वाचनालयात, क्रांतिकारी लहूजी वस्ताद साळवे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी,उपस्थित हिप्परगा थडी चे भूमिपुत्र व परभणी चे समाज कल्याण अधिकारी अनिल राजाबाई सायबू अंजनीकर,यांच्या हस्ते पुष्पहार महामानवाच्या प्रतिमेला अर्पण करून अभिवादन करण्यात आले, व यावेळी उपस्थित उच्चशिक्षित युवा तरुण सचिन गरबडे शिंपाळकर, गरबडे मित्र मंडळ, किरण सोनकांबळे, वाचनालयाचे अध्यक्ष पत्रकार मारोती एडकेवार, वाचनालयाचे ग्रंथपाल राजू पिराजी अंजनीकर, सामाजिक युवा तरुण ईश्वर एडकेवार, विजय अंजनीकर, अर्जुन एडकेवार, संतोष अंजनीकर, व वाचनालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते वाचनालयातील, विद्यार्थ्यांनी लहुजी वस्ताद साळवे व महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ अण्णा भाऊ साठे, महामानवा विषयी थोडक्यात भाषणे केली जयंती सोहळा मोठा साजरा झाला.

