शिंदी येथे २००५ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न!
शिंदी येथे इयत्ता दहावीच्या २००५ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
बोदवड तालुका / अजय तायडे
अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रांनी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळेतील गंमती-जमती, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि बालपणीच्या आठवणींना उजाळा देत सर्वांनी आनंदाचे क्षण अनुभवले.
या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यासाठी विजय तायडे यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक वर्षांपासून एकमेकांपासून दूर असलेले मित्र पुन्हा एकत्र येऊ शकले.
यावेळी ज्ञानेश्वर, पुंडलिक, संजय, ज्ञानेश्वर, ललित, अमोल, महावीर, निलेश, रामदास आणि ओमप्रकाश हे माजी विद्यार्थी उपस्थित होते.
या स्नेहमेळाव्यामुळे जुन्या मैत्रीला पुन्हा उजाळा मिळाला. भविष्यातही असे स्नेहमेळावे आयोजित करण्याचा संकल्प सर्व मित्रांनी व्यक्त केला.

