बहुजन समाज पार्टीचे नांदगाव तहसीलदार यांना निवेदन सादर

बहुजन समाज पार्टीचे नांदगाव तहसीलदार यांना निवेदन सादर 

 नाशिक जिल्हा प्रतिनिधी सतीश परदेशी 

 वैजापूर तालुक्यातील रोहित पठारे हत्याकांड विरोधात बसपा आक्रमक शुक्रवार दि. 13/11/2026 रोजी नांदगाव विधानसभा तथा मनमाड शहर युनिट च्या वतीने मा. तहसीलदार यांना मनमाड मंडल अधिकारी यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले वैजापूर शहरातील रोहित अनिल पठारे हत्याकांडा बाबत बहुजन समाज पार्टी नांदगाव विधानसभेच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष रोहित पठारे यांचे घरी मंगळवार दि. 11/11/2026 रोजी जाऊन भेट घेतली व सत्य परिस्थितीचा आढावा घेतला आणि सदर परिवारास आर्थिक मदत मिळावी म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला व्हिडिओ द्वारे आव्हान देखील केले आहे आज दिनांक 13/11/2026 रोजी देण्यात आलेल्या निवेदनात रोहित अनिल पठारे या बौद्ध तरुणांस भाजपच्या जातीवादी मानसिकतेने त्रासलेल्या गुंडांनी राहत्या घरातुन उचलून नेऊन अज्ञात ठिकाणी त्याचे व 50 ते 60 स्वर्ण राजपूत समाजातील गुंडांनी अनन्वित अमानुषपणे क्रूरतेने रोहित पठारे याचे हातपाय तोडून स्क्रूड्रायव्हरने हातात व अंगात भोसकले तसेच रोहितच्या हातापायाची नखे उपटून अत्याचाराचा कळस गाठला सदर घटना ही मानव जातीला काळीमा फासणारी आहे व या घटनेमुळे आजही दलितांवरील अन्याय व अत्याचार कमी झाले नाही म्हणून रोहित ला न्याय मिळावा व संबंधित केस जलद गती न्यायालयात चालविण्यात यावी रोहित पठारे यांच्या परिवारातील दोन सदस्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे व संबंधित आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठ्यावण्यात यावी संभाजीनगर जिल्हा अनुसूचित जाती जमाती विरोधी जिल्हा म्हणून घोषित करण्यात यावे या विविध मागण्या सदर निवेदनात तरतूद करून शासनापर्यंत पोहोचविण्यात याव्या म्हणून मा. तहसीलदार सो यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदन सादर करताना. प्रवीण डी पगारे नांदगाव विधानसभा अध्यक्ष,दीपक गायकवाड नांदगाव विधानसभा उपाध्यक्ष, शालिग्राम निकम नांदगाव विधानसभा महासचिव, गौतम गायकवाड मनमाड शहर अध्यक्ष,राजाभाऊ ठेंगे मनमाड शहर उपाध्यक्ष, गौरव अहिरे मनमाड शहर उपाध्यक्ष,एजाज भाई शेख कोषाध्यक्ष,सागर बोरगे चांदवड विधानसभा उपाध्यक्ष, राजेंद्र जगताप पेंटर, ऋषभ अहिरे,कुणाल अंकुश, प्रवीण मोरे, सागर त्रिभुवन,विशाल पाटील, बाळा साळवे,करण पाटील, बाबा घुसळे,सोमनाथ लहिरे,कैलास गायकवाड,बाळू खरे,किशोर भाटे,विनोद पटाईत, संतोष गायकवाड,प्रशांत शिंदे,रामभाऊ पाटील, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते
Previous Post Next Post