*भाजप नगरसेवकाचा प्रताप!** सार्वजनिक शौचालयातून वीज व पाणी चोरी; फौजदारी कारवाईची मागणी.. (देवळी तालुका प्रतिनिधी:-(रविंद्र पारीसे) स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात स्वच्छता राखण्याचे आवाहन सातत्याने केले जात असताना, देवळी शहरात लोकप्रतिनिधीच सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. देवळी नगर परिषदेचे भाजप नगरसेवक तथा माजी शिक्षण सभापती बंडू उर्फ विलास जोशी यांनी सार्वजनिक सुलभ शौचालयासाठी असलेल्या पाणी व वीजपुरवठ्याची गेल्या अनेक वर्षांपासून अवैधरित्या चोरी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. देवळी शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील काळा पूल परिसरात नगर परिषदेच्या वतीने सार्वजनिक सुलभ शौचालय उभारण्यात आले आहे. या शौचालयाची नियमित स्वच्छता व पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी नगर परिषदेने स्वतंत्र बोअरवेल व स्वतंत्र वीज जोडणीची व्यवस्था केलेली आहे. मात्र, संबंधित नगरसेवक विलास उर्फ बंडू जोशी यांनी या सार्वजनिक बोअरवेलमधून सुमारे ५० मीटर लांबीची पाइपलाइन थेट आपल्या खासगी निवासस्थानी टाकून पाण्याचा वापर केल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, या बोअरवेलसाठी लागणारे वीज बिल देवळी नगर परिषद भरत होती, तर त्या वीज व पाण्याचा वैयक्तिक वापर नगरसेवक स्वतःच्या घरासाठी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक सुलभ शौचालयाचा पाणीपुरवठा पूर्णतः खंडित झाला होता. परिणामी, शौचालयाची नियमित स्वच्छता न झाल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. याचा थेट त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत होता. या गंभीर प्रकाराबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर अखेर नगर परिषद प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली. देवळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नेहा आकोडे यांनी कर्मचाऱ्यांसह प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी व चौकशी केली. यावेळी सार्वजनिक बोअरवेलमधून नगरसेवकाच्या घराकडे गेलेली सुमारे ५० मीटर लांबीची पाइपलाइन व अवैध जोडणी स्पष्टपणे आढळून आली. सरकारी मालमत्तेची चोरी, सार्वजनिक सुविधांचा गैरवापर तसेच लोकप्रतिनिधी पदाचा गैरफायदा घेतल्याप्रकरणी संबंधित नगरसेवकावर कठोर कायदेशीर कारवाई करून तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी जोरदार मागणी देवळीतील नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणात नगर परिषद प्रशासन व मुख्याधिकारी पुढे कोणती ठोस पावले उचलतात, याकडे आता संपूर्ण देवळी शहराचे लक्ष लागले आहे. भाजप नगरसेवकाचा प्रताप!** सार्वजनिक शौचालयातून वीज व पाणी चोरी; फौजदारी क… byमीडीया पोलीस टाईम -January 13, 2026
दिनांक : १३ जानेवारी २०२६ स्थळ : नगरपरिषद सभागृह, हिंगणघाट जिला वर्धा आज हिंगणघाट नगर परिषद सभागृहात नवनिर्वाचन नगराध्यक्षा डॉ नयना उमेश तुडसकर मुख्याधिकारी मा. श्री. प्रशांत उरकुडे जी आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका यांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची अधिकृत नियुक्ती पार पडली. हा महत्त्वपूर्ण प्रसंग नगरपरिषदेच्या सक्षम, पारदर्शक व लोकाभिमुख कारभारासाठी एक नवा अध्याय ठरणारा आहे.या वेळी भारतीय जनता पार्टी श्री. निलेश बाबाराव ठोंबरे जी यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली, तसेच श्री. किशोरभाऊ मनोहर दिघे जी, श्री.अंकुशभाऊ बिरबलसिंह गौतम (ठाकुर) जी आणि सौ. शारदाताई भरतलाल पटेल जी, ऍड सुधीर कोठारी जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पक्ष यांची स्वीकृत सदस्य नियुक्तियां करण्यात (नगरसेवक) म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या अनुभव, कार्यक्षमता आणि सेवाभावामुळे हिंगणघाट शहराच्या विकासाला निश्चितच गती मिळेल.नवनियुक्त उपाध्यक्ष तसेच स्वीकृत सदस्यांचेहिंगणघाटच्या नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरेल असे सक्षम प्रशासन, पारदर्शक निर्णयप्रक्रिया आणि सर्वसमावेशक विकास घडवून आणण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे कटिबद्ध राहू. जनतेच्या सहकार्याच्या बळावर हिंगणघाटला एक आदर्श, प्रगत आणि सुशासित शहर म्हणून घडविण्याचा आपला निर्धार अधिक दृढ होईल..मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक byमीडीया पोलीस टाईम -January 13, 2026
माहिती अधिकार कार्यकर्त्याला जीवे ठार मारण्याची धमकी.... दि 13 माहिती अधिकार कार्यकर्ता नितीन सुरेश रंधे याला काही एक कारण नसताना जीवेठार मारण्याची धमकी दिल्याने जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अंदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला याबाबत सविस्तर माहिती अशी की नितीन सुरेश रंधे यांनी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद देली की रविवार दि 11 जानेवारी रोजी दुपारी एक वाजता वाघ नगर मध्ये आंबेडकर चौकात जितेंद्र सुरेश बिराडे व त्याचा साथीदार त्याचे नाव गाव माहित नाही यांनी काही एक कारण नसताना जीवे ठाण मारण्याची धमकी दिल्याने पोलीस स्टेशनला अदखल पात्र गु न 23 20 26 नोंद करण्यात आला आहे माहिती अधिकार कार्यकर्त्याला जीवे ठार मारण्याची धमकी....… byमीडीया पोलीस टाईम -January 13, 2026
शहादा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी माधवी पाटील यांच्यासह तीनही स्वीकृत सदस्य बिनविरोध... (प्रा. डी. सी. पाटील, नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक)शहाद, दि. 13 : शहादा नगरपालिका उपनगराध्यक्ष व स्विकृत सदस्य निवडीसाठी झालेल्या पहिल्या सभेत नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सौ. माधवी मकरंद पाटील यांची बिनविरोध निवड झाली. तसेच स्विकृत सदस्य पदासाठी भाजपाकडून कल्पेश रमणलाल पटेल व यशवंत विजय पाटील तर जनता विकास आघाडीकडून जितेंद्र भिमराव जमदाडे यांची निवड झाली.शहादा नगरपालिका उपनगराध्यक्ष व स्विकृत सदस्य निवडीसाठी मंगळवारी विशेष सभा झाली. आज दुपारी 12 वाजता भारतीय जनता पक्षाकडून सौ. माधवी मकरंद पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.सकाळी 11 वाजेपासून नगरपालिका प्रशासनाने निवडणुकी संदर्भात जय्यत तयारी केली होती. पालिकेत सत्ताधारी शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांच्यासह 9 नगरसेवक तर विरोधी भाजपकडे 20 नगरसेवकांचे संख्या बळ आहे. त्यामुळे उपनगराध्यक्षपदासह स्वीकृत नगरसेवकांच्या दोन जागा भाजपला व एक जागा शहर विकास आघाडीला मिळेल हे निश्चित होते. त्यामुळेशपथग्रहण समारंभासाठी भारतीय जनता पक्षाचे वतीने आवारात बैठक व्यवस्था करण्यात आली होती.भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात खरेदी विक्री संघ कार्यालयापासून मिरवणूक काढण्यात येऊन नगरपालिका कार्यालयात पोहोचली.मिरवणुकीत आ.राजेश पाडवी, परिसराचे नेते दीपकभाई पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील, माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती सौ.जयश्रीबेन पाटील, शेतकरी संघटनेचे नेते घनःश्यामभाई चौधरी, डॉ.कांतीलाल टाटिया आदिंसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.दुपारी २ वाजता नगरपालिका सभागृहात आयोजित विशेष सभेत पिठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष अभिजीत पाटील उपस्थित होते.सभेला दुपारी दोनच्या सुमारास प्रारंभ झाला.तीन वाजेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उपनगराध्यक्षपदी निवड झालेल्या माधवी पाटील यांचे स्वागत मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी केले.पदभार स्वीकारल्यानंतर उपनगराध्यक्ष माधवी पाटील यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. शहरातील विविध भागातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले.या निवडणुकीसाठी मुख्याधिकारी साजिद पिंजारी व पालिका कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.या निवडणुकीसाठी पोलीसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ताजी पवार व पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहादा पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी माधवी पाटील यांच्यासह तीनही … byमीडीया पोलीस टाईम -January 13, 2026
.१४ जानेवारी रोजी गटसाधन केंद्रात महत्वाच्या बैठकीस उपस्थित रहा !गटशिक्षणाधिकारी )> मंगेश नरवाडे. (मानवत / प्रतिनिधी.)————————————मानवत येथे प्रजासत्ताक गणराज्य दिना निमित्त विद्यार्थ्यासांठी देशभक्तिपर कवायती साठी महत्वपूर्ण मार्गदर्शन शिक्षण विभाग, पंचायत समिती मानवत यांच्या कडून दिनांक १४ जानेवारी रोजी गटसाधन केंद्राच्या सभागृहामध्ये गटशिक्षणाधिकारी मा.श्री.मंगेश नरवाडे (पदवी शिक्षण अधिकारी) शिक्षण विभाग, पंचायत समिती मानवत हे करणार असून आदेशीत केलेल्या शाळेतील मुख्याध्यापक यांनी वेळेवर महत्व पूर्ण बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन मानवत गटसाधन केंद्राच्या वतीने करण्यात आले.सविस्तर वृत्त असे की मानवत गटसाधन केंद्राच्या वतीने दिनांक १४ जानेवारी मानवत पंचायत समीतीचे गट शिक्षणाधिकारी यांच्या महत्वपूर्ण मार्गदर्शनाखाले बैठकीचे आयोजन करण्यात आले असून सर्व आदेशीत मुख्याध्यापक प्राचार्य, के.के.एम. के.एम.व्ही. मानवत, 02. प्राचार्य, राजश्री शाहू के.एम.व्ही. मानवत, 03. मुख्याध्यापक, नेताजी सुभाष मा. वि. मानवत, 04. मुख्याध्यापक, के.जी.बी.व्ही. मानवत. 05. मुख्याध्यापक, पी.एम.श्री. के.पी.एस. मानवत., 06. मुख्याध्यापक, श्रीमती शकुंतलाबाई कांचनराव कब्रुवार वि. मानवत, 07. मुख्याध्यापक, श्रीमती रामकंवर द्वारकादास लड्ड वि. मानवत, 08. मुख्याध्यापक, खान अब्दुल गफार खान उर्दू वि. मानवत09. मुख्याध्यापक, श्रीमती सरस्वतीबाई भाले पाटील वि. मानवत, 10. मुख्याध्यापक, इकरा उर्दू प्रा. स्कूल मानवत यांनी दिनांक 26 जानेवारी 2026 या देशाच्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी देश भक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम घेण्यासाठीच्या नियोजन बैठकीस उपस्थित राहावे असे आदेश मा.शिक्षण संचालक, प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र परोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, उपरोक्त संदर्भान्वये दिनांक 26 जानेवारी 2026 या देशाच्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम घेणे बाबत सुचित करण्यात आलेले आहे. त्यानुषंगाने सुधारीत सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.संदर्भीय पत्रात दिलेल्या सुचनानूसार मानवत तालुक्यात दिनांक 26 जानेवारी 2026 या देशाच्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम घेण्यासाठी नियोजन बैठकीचे आयोजन दिनांक 14/01/2026 रोजी गटसाधन केंद्र मानवत येथे दुपारी 12-30 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. तालुक्याचा सामूहिक कवायत कार्यक्रम उत्तमोत्तम होण्यासाठी सदरील बैठकीस आपण व आपले अधिनस्त क्रिडा शिक्षक तसेच सांस्कृतीक विभाग प्रमुख यांचेसह अगदी वेळेवर उपस्थित राहावे. विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे आवाहन गटशिक्षणाधिकारी मंगेशजी नरवाडे पंचायत समिती मानवत यांनी केले आहे.. १४ जानेवारी रोजी गटसाधन केंद्रात महत्वाच्या बैठकीस उपस्थित रहा !गटशिक्षणाधिकारी )> मंगेश नरवाड… byमीडीया पोलीस टाईम -January 13, 2026
वडगाव प्रभागात सोनल देवतळेंचा दबदबा; भाजपला नागरिकांचा विश्वास..! (महेश निमसटकर जिल्हा विभागीय संपादक भद्रावती ) चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक २०२६ अंतर्गत वडगाव प्रभाग क्रमांक ८ (अ) मधील प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ. सोनल प्रकाश देवतळे यांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक कार्यातून राजकारणात पदार्पण केलेल्या सोनल देवतळे यांनी महिलांचे प्रश्न, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि रस्ते यासारख्या मूलभूत नागरी सुविधांवर प्रचारात ठाम भर दिला आहे. प्रसंगी सोनल देवतळे यांचा प्रचार फक्त भाषणांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर घराघरांत भेटी देऊन नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकण्याची त्यांची पद्धत मतदारांना खूप भावली आहे. वडगाव प्रभागात *पाणीटंचाई, स्वच्छतेची मोठी समस्या, शालेय सुविधांची कमतरता आणि अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट आणि व्यवहार्य उपाय सुचवले आहेत. उदाहरणार्थ, पाणीपुरवठ्यासाठी नवीन पाइपलाइन विस्तार आणि टँकर व्यवस्था मजबूत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, तर स्वच्छतेसाठी दरवाजात दरवाजा मोहिमेची योजना मांडली आहे. यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्याविषयीचा विश्वास वाढत आहे आणि ते चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक मध्ये महिलांच्या प्रश्नांवर केंद्रित उमेदवार म्हणून विशेष चर्चेत आहेत. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात वडगाव प्रभागात निवडणूक वातावरण तापले असून, भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. महिलांचा आणि तरुणांचा सहभाग लक्षणीय वाढला असून, सोनल देवतळे यांच्या कार्यपद्धतीला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. प्रभागातील अनेक तरुण मतदारांनी त्यांच्या शिक्षण आणि आरोग्य सुविधांबाबतच्या ठोस भूमिकेचे कौतुक केले आहे. शालेय इमारतींचे सुदृढीकरण, आरोग्य केंद्रांची सुसज्जता आणि रस्त्यांची डांपिंग ही त्यांची प्रमुख उद्घोषणे आहेत. यामुळे वडगाव प्रभाग क्रमांक ८ (अ) मध्ये भाजपची आघाडी भक्कम दिसत आहे. चंद्रपूर हे ताडोबा आणि अंधारी व्याघ्रप्रकल्प साठी पर्यटनाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. या शहरात स्थानिक राजकारणाला विशेष महत्त्व आहे, कारण नागरी सुविधा पर्यटन विकासाशी निगडित आहेत. वडगाव प्रभागातील ही निवडणूक अधिक रंगतदार ठरली असून, निकालाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रभागात सुनीता लोढिया (अपक्ष) यांच्यासारख्या स्पर्धकांविरुद्ध सौ. सोनल प्रकाश देवतळे यांची लोकप्रियता वाढत असल्याचे कार्यकर्ते सांगतात भाजपने वडगाव प्रभाग क्रमांक ०८ मध्ये भव्य प्रचार सभा आयोजित केल्या असून, दिग्गज नेत्यांची उपस्थिती यशस्वी झाली आहे. दरम्यान चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत एकूण १६ प्रभागांत 'बिग फाइट' अपेक्षित असून, आजी-माजी नगरसेवक आणि अपक्ष उमेदवारांमुळे स्पर्धा तीव्र झाली आहे. वडगावसारख्या प्रभागांत पक्षांतरित नेते आणि स्थानिक मुद्दे ठराविक ठरत आहेत. सोनल देवतळे यांच्या प्रचाराने महिलांचे आणि तरुणांचे प्रश्न केंद्रस्थानी आणले असून, हे चंद्रपूरच्या स्थानिक राजकारणात नवे वळण दर्शविते. निकालानंतर प्रभागाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा आहे. वडगाव प्रभागात सोनल देवतळेंचा दबदबा; भाजपला नागरिकांचा विश्वास..!… byमीडीया पोलीस टाईम -January 13, 2026
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोशन कोमरेड्डीवार यांची डोलारा वार्डातील नाल्या साफ सफाई करण्याची मागणी.. भद्रावती नगरपरिषद ला निवेदन देण्यात आले. (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती भद्रावती ) दि.१३:- शहरातील प्रभाग क्रमांक ५ असलेल्या डोलारा वार्डातील सुरज पान सेंटर ते ठाकुर यांच्या घरपरीसरादरम्यान केरकचऱ्यामुळे नाल्या तुंबल्याने नाल्यांमधील घाण पाणी ओसंडून ते रस्त्यावरुन वाहात आहे.यामुळे परीसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असुन याचा विपरीत परिणाम परीसरातील नागरीकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हि गंभीर समस्या लक्षात घेऊन या परीसरातील नाल्यांची सफाई करुन येथे नेहमी स्वच्छता राहिल याची काळजी घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोशन कोमरेड्डीवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे नगरपरीषद कार्यालयात सादर करण्यात आलेल्या एका निवेदनातून करण्यात आली आहे. केरकचऱ्यामुळे येथील नाल्या तुंबल्याने घाण पाणी रस्त्यावर येऊन परीसरात दुर्गंधी पसरली आहे.घाण पाणी रस्त्यावर साचुन असल्याने येथील नागरीकांना व शाळेकरी मुलांना या घाण पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. याचा त्रास येथील नागरीकांना सोसावा लागत आहे.या घाणीमुळे हा परीसरही बकाल झाला आहे. या दुर्गंधीमुळे नागरीकांच्या आरोग्यावर विपरीत परीणाम होण्याची शक्यता आहे.त्यामुळे या भागातील नाल्यांची त्वरीत साफसफाई करुन येथील नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोशन कोमरेड्डीवार,सुरज मेश्रम, शुभम गजभिये, एजाज पठाण, वैभव गजभिये, साफिन पठाण, आदी उपस्थीत होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोशन कोमरेड्डीवार यांची डोलारा वार्डातील नाल्या साफ सफाई… byमीडीया पोलीस टाईम -January 13, 2026
विवेकानंद सोसाइटी ने बाल सदन एवं वृद्ध आश्रम में मनाया स्वामी जी का जन्मदिन*. (अभिनव शर्मा कालका) ता.13-01-2026विवेकानंद मानव सेवा सोसायटी, कालका पिंजौर द्वारा स्वामी विवेकानंद जी के 163वें जन्म दिवस को पंचकूला स्थित अनाथ आश्रम बाल सदन एवं वृद्ध आश्रम में जाकर बेसहारा लोगों के साथ मिठाई बांटकर मनाया। गौरतलब है कि स्वामी विवेकानंद जी के जन्मदिवस को राष्ट्रीय युवा दिवस के रूप में मनाया जाता है । पंचकूला स्थित बाल भवन कार्यक्रम का शुभारंभ में विभिन्न क्रियाकलापों के द्वारा हुआ। जिसमें सोसाइटी के सदस्यों द्वारा स्वामी विवेकानंद जी के सुविचार एवं उनकी उनके जीवन से संबंधित घटनाओं का श्रवण किया। सोसाइटी के जॉइंट सेक्रेटरी शशि गुप्ता तथा प्रवक्ता एवं सचिव आचार्य सुनील दत्त गौतम एवं द्वारा स्वामी विवेकानंद के जीवन तथा सोसायटी के उद्देश्यों पर विस्तारपूर्वक प्रकाश डाला गया। तत्पश्चात बच्चों के साथ मिलकर केक काटा तथा मिठाइयां वितरित की। विवेकानंद मानव सेवा सोसायटी द्वारा मानवता की सेवा के अनेक कार्य किए जाते हैं उन्हीं कार्यों के अंतर्गत प्रत्येक वर्ष स्वामी विवेकानंद जी के जन्मदिवस को निर्धनों की सेवा में समर्पित किया जाता है। इस वर्ष भी विवेकानंद मानव सेवा सोसायटी के सदस्यों ने अनाथ आश्रम एवं वृद्ध आश्रम मिठाइयां बांटकर जन्मदिवस उन्हें समर्पित किया। इस अवसर पर सोसायटी के प्रधान नरेंद्र गुप्ता, मुख्य सलाहकार हिमांशु खोंसला,उप प्रधान परमजीत शर्मा, दलजीत मेहरा, जसकरण जीत सिंह ,धर्मेंद्र शर्मा, मुख्य खजांची राजकमल शर्मा, सेक्रेटरी एवम् प्रवक्ता आचार्य सुनील दत्त गौतम एवं सदस्य मोनिका खोंसला, निशि सिंह ,रेणु एवं राजकुमार अग्निहोत्री आदि उपस्थित रहे। विवेकानंद सोसाइटी ने बाल सदन एवं वृद्ध आश्रम में मनाया स्वामी जी का जन्मदिन*.… byमीडीया पोलीस टाईम -January 13, 2026
राजकीय 'मैत्री' की 'गद्दारी'? फैजपूर पालिकेत काँग्रेसच्या आशीर्वादाने भाजपाचे 'पतीराज' स्वीकृत! (मयूर मेढे | फैजपूर | मो. 8806010700फैजपूर | ) प्रतिनिधी, राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, ही म्हण फैजपूर नगर परिषदेच्या विशेष सभेत काँग्रेसच्या नगरसेवकांनी तंतोतंत खरी करून दाखवली आहे. निमित्त होते उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य निवडीचे, पण चर्चा रंगली ती काँग्रेस आणि भाजपाच्या अभद्र युतीची! ज्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात आणि केंद्रात काँग्रेस जीव तोडून लढते, त्याच काँग्रेसने फैजपुरात चक्क भाजपाच्या नगराध्यक्षांच्या पतीला पालिकेत एन्ट्री देण्यासाठी रेड कार्पेट अंथरल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.काँग्रेसचे कमळ प्रेम उफाळून आले!नगराध्यक्षा दामिनी पवन सराफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत घडलेला प्रकार निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरला आहे. स्वीकृत सदस्य पदासाठी काँग्रेसकडे सक्षम कार्यकर्ते किंवा अल्पसंख्यक चेहऱ्यांची वानवा होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, काँग्रेसच्या गटातून चक्क भाजपा नगराध्यक्षांचे पती पवन सराफ यांचा प्रस्ताव दाखल केला जातो आणि तो मंजूरही होतो, हे मॅच फिक्सिंग नाही तर काय?डॉ. दानिश शेख यांचा प्रस्ताव दाखल करणे आणि तो तांत्रिक मुद्द्यांवरून अपात्र ठरवणे, हा केवळ एक 'दीखावा' होता का? अशी शंका आता उपस्थित होत आहे. जर काँग्रेसला खरोखरच डॉ. शेख यांना संधी द्यायची होती, तर पवन सराफ यांचा पर्यायी प्रस्ताव का दिला? आणि तोच प्रस्ताव मंजूर झाल्यावर काँग्रेस गटनेते आता जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेण्याची भाषा करत आहेत, हे म्हणजे वरातीमागून घोडे दामटण्याचा प्रकार असल्याची बोचरी टीका होत आहे.गद्दारांचा बाजार आणि निष्ठेचा बळीया राजकीय साठमारीत काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि मित्रपक्ष उघड्यावर पडले आहेत. माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान यांनी नगरपरिषदे समोर "गद्दार... गद्दार..." अशा घोषणा देत केलेला संताप हा केवळ त्यांचा एकट्याचा नसून, तो प्रत्येक फसवल्या गेलेल्या कार्यकर्त्याचा आवाज होता. शहर विकास आघाडीचे नगरसेवक केतन किरंगे यांनी मांडलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मित्रपक्षांना विश्वासात न घेता, परस्पर भाजपाशी सोयरीक साधून काँग्रेसने नेमकं काय साध्य केलं? अंबरनाथ आणि अकोट नंतर आता फैजपुरातही काँग्रेस नगरसेवकांनी गद्दारीचा पॅटर्न राबवला आहे, असा थेट आरोप होत आहे. पक्षादेश धुडकावून आणि शहराध्यक्षांना अंधारात ठेवून घेतलेला हा निर्णय काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाचे वस्त्रहरण करणारा आहे.उपनगराध्यक्ष पदी निकिता कोळी, पण चर्चा सराफ फॅक्टरचीचदुसरीकडे, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या निकिता कोळी यांनी १३ मते मिळवून बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) सफुराबी शेख यांना (९ मते) यांचा पराभव केला. निकिता कोळी या सर्वात कमी वयाच्या उपनगराध्यक्षा ठरल्या, ही जमेची बाजू असली तरी, या निवडीपेक्षा जास्त चर्चा पवन सराफ यांच्या 'बॅकडोअर एन्ट्री'चीच रंगली आहे. एमआयएमचे युनूस मोमीन यांनी तटस्थ राहून आपली वेगळी भूमिका जपली, पण काँग्रेसच्या या भूमिकेने भाजपाला मात्र आयते बळ मिळाले आहे.राहुल गांधी संविधान वाचवा म्हणत देश पिंजून काढत असताना, फैजपुरातील त्यांचेच शिलेदार स्थानिक फायद्यासाठी संविधानात्मक मूल्यांना हरताळ फासून भाजपाशी हातमिळवणी करत आहेत. राहुल गुजराथी यांची भाजपाकडून आणि पवन सराफ यांची काँग्रेसच्या पाठिंब्यावर झालेली निवड, हे फैजपूरच्या राजकारणातील सोयीच्या राजकारणाचे उत्तम उदाहरण आहे. आता काँग्रेस शहराध्यक्ष शेख रियाज कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे सांगत असले, तरी झालेले नुकसान भरून निघणार का? की ही केवळ मलमपट्टी ठरणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. जनतेने ज्यांना विरोधात बसण्यासाठी कौल दिला, त्यांनीच सत्तेतील नेत्यांच्या पतीला खुर्ची दिली, याला लोकशाहीचा विजय म्हणायचे की मतदारांची थट्टा? राजकीय 'मैत्री' की 'गद्दारी'? फैजपूर पालिकेत काँग्रेसच्या आशीर्वादाने भाजपाचे … byमीडीया पोलीस टाईम -January 13, 2026