प्रभाग १२ मध्ये नाजू शकील शेख यांची OBC महिला गटातून उमेदवारी – समाजसेवक शकील अहमद यांच्या कार्याला जनतेचा आशीर्वाद... हिंगणघाट :- डॉ. मुजुमदार वार्ड / राम मंदिर वार्ड (प्रभाग क्र. 12) येथे स्थानिक समाजसेवक शकील अहमद यांनी आपल्या पत्नी नाजू शकील शेख यांना OBC महिला गटातून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असून, या उमेदवारीला प्रभागातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आशीर्वाद लाभत आहे.शकील अहमद हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध उपक्रमांद्वारे नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. गंगा माता मंदिर परिसरात समाजभवन उभारणे, दर्ग्याह परिसरात हप्सी सुविधा उपलब्ध करणे, गरजूंसाठी ब्लँकेट वाटप, तसेच ‘साई मित्रपरिवार’ या संस्थेमार्फत सतत सामाजिक कार्य राबविणे ही त्यांच्या कार्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत.स्व. शामरावजी वगारे (काकाजी) यांच्या सहकार्याने भागवत सप्ताहात सक्रिय सहभाग, तसेच सर्वधर्मसमभाव जोपासण्यासाठी कव्वालीचे कार्यक्रम आयोजित करून समाजात ऐक्य व बंधुतेचा संदेश दिला आहे.स्थानिक समस्यांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी झोपडपट्टी धारकांना घरकुल व स्थायी पट्टे मिळावेत यासाठी एस.डी.ओ. कार्यालयात मोर्चे काढले आहेत.नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक असून, प्रभागातील नागरिकांकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. तसेच शकील अहमद हे शिवसेना (उबाठा ) गटाचे सक्रिय कार्यकर्ते आहे

प्रभाग १२ मध्ये नाजू शकील शेख यांची OBC महिला गटातून उमेदवारी – समाजसेवक शकील अहमद या…

अवैध देशी दारू वाहतुकीवर पोलिसांचा कारवाईचा छाप 46,000 किमतीचा मुद्देमाल जप्त! (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती :-दिनांक 24 ऑक्टोबर रोजी मांजरी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मटण मार्केट, मांजरी येथे छापा टाकून अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्या एका आरोपीस अटक केली. मुखबीरच्या खबरेवरून पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी वैभव कुशाब साव, रा. मांजरी याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून देशी दारूच्या 400 बॉटल्स किंमत 16,000 रुपये व मोटरसायकल किंमत 30,000 रुपये असा एकूण 46,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत आरोपी साव यांनी हा माल विलास भोंगळे, रा. वरोरा यांचा असल्याचे सांगितले. तसेच सदर देशी दारूचा साठा “भोंगळे अँड सन्स” देशी दारूच्या भट्टीमध्ये घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने आरोपी विलास भोंगळे, रा. वरोरा याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन मांजरी येथे कलम 65(अ) व 83 महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, मा. अपर पोलीस अधीक्षक, मा.संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी ठाणेदार पोलिस स्टेशन मांजरी सहाय्यक पोलिस निरीक्षक धोंगडे, ग्रेट पो. उ.प.नि. मनोहर दडमल, पो.अ. अनिस शेख, प्रमोद मिळमिले व रवी कन्नाके यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास स. फौ. रमेश तुरानकर करीत आहेत.

अवैध देशी दारू वाहतुकीवर पोलिसांचा कारवाईचा छाप 46,000 किमतीचा मुद्देमाल जप्त!�������������������…

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा ‘सोने’सारखा शेतमाल ओला – हिंगणघाट बाजार समितीत दुर्दैवी चित्र. हिंगणघाट –आज दिनांक २४ ऑक्टोबर रोजी हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात एक हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. शेतकरी आपला कष्टाचा शेतमाल — सोयाबीनसह इतर धान्य — दोन पैसे मिळावेत या आशेने बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन आले होते. मात्र, अवकाळी पावसाने या सर्वांची आशा अक्षरशः पाण्यात गेली.पावसाच्या जोरदार सरींनी बाजार समितीच्या खुल्या आवारात ठेवलेला शेतमाल पूर्णपणे ओला झाला. शेतकऱ्यांनी डोळ्यांत अश्रू घेऊन आपला माल वाचविण्याचा प्रयत्न केला, पण पावसाच्या धारांमध्ये त्यांचा कष्टाचा घाम आणि अश्रू दोन्ही वाहून गेले.बाजार समितीकडून कोणतीही योग्य सुविधा किंवा तात्पुरती संरक्षणाची सोय उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. नावाजलेल्या हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणे ही शासन आणि प्रशासन दोघांसाठीच चिंतेची बाब ठरत आहे.शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की, “आमचा माल ओला झाला, मेहनत वाया गेली – आता नुकसान भरपाई कोण देणार?”सरकार आणि प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा ‘सोने’सारखा शेतमाल ओला – हिंगणघाट बाजार समितीत दुर्दैवी चित्र.��������…

📰 *घर घर संविधान — लोकशाहीचा प्राणवायू**भगवान चौधरी | माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते*. *२६ नोव्हेंबर हा भारताच्या लोकशाही प्रवासातील एक ऐतिहासिक दिवस.**याच दिवशी, १९४९ साली भारताने आपले संविधान स्वीकृत करून लोकशाहीचा पाया दृढ केला. आणि २६ जानेवारी १९५० रोजी त्या संविधानाची अंमलबजावणी करून देशाने जगातील सर्वात मोठ्या लोकशाहींच्या यादीत आपले नाव अमर केले*.*भारतीय संविधान हे केवळ एक कायदेशीर ग्रंथ नाही, तर ते आपल्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनाचे मार्गदर्शन करणारे जिवंत दस्तऐवज आहे. या संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचे ध्येय ठरवले गेले. नागरिकांना विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासनेचे स्वातंत्र्य तसेच दर्जा व संधींची समानता देण्याची हमी यात दिली आहे.**आज, "घर घर संविधान" या उपक्रमाद्वारे संविधानातील आदर्श व मूल्ये जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत आहे. संविधान निर्मात्यांनी घालून दिलेल्या तत्त्वांचे पालन करूनच देशाची एकता, अखंडता आणि बंधुता टिकून राहील, हे अधोरेखित करणे ही काळाची गरज आहे.**संविधान दिवस म्हणजे केवळ स्मरणाचा क्षण नाही, तर कर्तव्यांची जाणीव करून देणारा दिवस आहे. नागरिक म्हणून आपल्यावर असलेली जबाबदारी, अधिकारांसह कर्तव्यांचे पालन, आणि लोकशाही मूल्यांची जपणूक — हाच खरा संविधानाचा सन्मान होय.**यंदा भारतीय संविधानाला ७६ वर्षे पूर्ण होत असताना,**आपण सर्वांनी "घर घर संविधान" ही संकल्पना आचरणात* *आणण्याचा निश्चय करावा,**हीच भारतीय लोकशाहीला खरी मानवंदना ठरेल.*📖

📰 *घर घर संविधान — लोकशाहीचा प्राणवायू**भगवान चौधरी | माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते*.������…

चारंगबाबा दूध संकलन केंद्र गुंजाळवाडी(बेल्हे) मार्फत लाभांश व दीपावली भेटवस्तू वाटप.. प्रतिनिधी - सुदर्शन मंडलेबेल्हे दि. २४ - चारंग बाबा दूध संकलन केंद्र गुंजाळवाडी मार्फत संस्थेचे संस्थापक लहूशेठ गुंजाळ व समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके सर यांच्या हस्ते गवळी बांधवांना लाभांश व दीपावली भेटवस्तू वाटप करण्यात आले.यावेळी संस्थेत सन २०२४-२५ या कालावधीमध्ये सर्वात जास्त दूध पुरवठा करणारे दूध उत्पादक यांचाही सत्कार करण्यात आला.सुभाष शिवाजी बोरचटे यांनी या आर्थिक वर्षात ४४,४०४ लिटर, बाळू एकनाथ गुंजाळ यांनी ३२,७४९, निखिल तानाजी बांगर यांनी ३२,६४२, मनोज गणपत बोरचटे यांनी २४,०२२,विशाल विलास बोरचटे यांनी २०,०८९ लिटर इतका दूध पुरवठा एका आर्थिक वर्षात केला आहे.सर्व दूध पुरवठा करणारे दूध उत्पादक व गवळी यांना दीपावलीनिमित्त मिठाई,साड्यांचे वाटप करून सर्व दूध उत्पादकांची दिवाळी गोड केली.यावेळी समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके सर यांनी सर्व गवळ्यांना जास्तीत जास्त दूध पुरवठा करावा.शेती व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते.उच्च व चांगल्या दर्जेचे दूध संस्थेमध्ये येत असल्यामुळे दुधाचा प्रतिलिटर भाव हा इतर संस्थेपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर दिला जातो.जनावरांचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे,त्यांचे लसीकरण वेळोवेळी करून घ्यावे याबद्दलची माहिती देण्यात आली.या कार्यक्रमानिमित्त सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके,संस्थेचे संस्थापक लहूशेठ गुंजाळ,वरिष्ठ दूध संकलन अधिकारी प्रवीण औटी,उद्योजक सुरेश शेठ गुंजाळ,साईकृपा पतसंस्थेचे संचालक दत्तूशेठ गुंजाळ,मा.तंटामुक्ती अध्यक्ष रामदास शेठ गुंजाळ,राजुरी येथील गणेश दूध संस्थेचे संचालक निलेश हाडवळे, पत्रकार राजेश कणसे, शामराव गुंजाळ, केरभाऊ गुंजाळ,सामाजिक कार्यकर्ते भाऊशेठ बोरचटे आदी मान्यवर उपस्थित होते.

चारंगबाबा दूध संकलन केंद्र गुंजाळवाडी(बेल्हे) मार्फत लाभांश व दीपावली भेटवस्तू वाटप..������������…

पत्रकार संदीप शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाचा वर्षाव* (जुन्नर तालुका प्रतिनिधी संदीप शितोळे बेल्हे )- जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील पत्रकार संदीप शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य पत्रकार बंधू आणि जय मल्हार क्रांती संघटनेचे विविध गावातील कार्यकर्ते यांनी त्यांना फोन करून व वैयक्तिक भेटून शुभेच्छा दिल्या. त्यांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातुन अनेक शुभेच्छा प्राप्त झाल्या. त्यात चक्रेश्वर वार्ता चे संपादक लहू लांडे,महाराष्ट्र न्यूज लाईव्ह २४चे संपादक मनोहर गोरगल्ले, मीडिया पोलीस टाइम चे मुख्य संपादक हमीद तडवी (जळगाव ), सह्याद्री वाहिनी, आयबीएन लोकमत चे पत्रकार रायचंद शिंदे, शिवनेरी एक्सप्रेस चे संपादक व पुण्यनगरी आणि प्रभात पत्रकार रामदास सांगळे, एबी न्यूज चे सुरेश आण्णा भुजबळ, समर्थ भारत बेल्हा प्रतिनिधी सुधाकर सैद, शरद झावरे, गणेश जागदाळे, गणेश चोरे, अर्जुन शिंदे, सकाळ पत्रकार राजु कणसे, गोपीनाथ शिंदे, हिंदवी न्यूज चे सहदेव पाडेकर, अजित पानसरे, सुदर्शन मंडले, राहुल कडलक, फय्याज इनामदार, विठ्ठल शितोळे, सतिष शिंदे आदी पत्रकार मित्र आणि समाज बांधवानी शुभेच्छा दिल्या.

पत्रकार संदीप शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाचा वर्षाव*����������������������…

उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाची रेती माफिया विरुद्ध केलेली कारवाई* दि 24-10-2025 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकातील पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे , पोलीस हवालदार चेतन पिसे , पोलीस हवालदार राहुल साठे, पोलीस हवालदार उमेश लडके, पोलीस हवालदार सतीश घवघवे पोलीस नाईक रविन्द्र घाटुर्ले, यांना मुखबीर कडुन खाञीशीर खबर मिळाली की आरोपी क्रं 1 प्रवीण प्रोफेश्वर मरापे,रा. मौजा पिंपळगाव, ता. हिंगणघाट हा ट्रॅक्टर मालक योगेश देवराव सातपुते रा. पिंपळगाव रोड ,संत तुकडोजी वॉर्ड , ता. हिंगणघाट याचे सांगणे वरून त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर क्रमांक MH 32 P 545 लाल रंगाच्या सरपंच महिंद्रा कंपनी चा ट्रॅक्टर मध्ये लाडकी नदीच्या पात्राचे रेती घाटातून काळी रेती चोरून मौजा बुरकोणी कडे वाहतूक करीत आहे. अश्या मुखबीरचे खबरे वरुन पंच व पो.स्टॉप चे मदतीने यातील नमुद आरोपी च्या ताब्यातील ट्रॅक्टर यास थांबवून चेक केले असता 1 ब्रास काडी रेती (गौण खनिज) बिना रॉयल्टी वाहतूक करताना रंगेहाथ मिळून आल्याने जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून ट्रॅक्टर, ट्रॉली व 1 ब्रास काळी रेती (गौन खनिज ) असा जु कि 8,08,000/- रु चा माल मिळून आल्याने , पो स्टे. हिंगणघाट येथे परत येवुन आरोपीतान विरूध्द गुन्हा नोंद केला ...... सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री अनुराग जैन सा. मा.अपर पोलीस अधिक्षक श्री सदाशिव वाघमारे सा.मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट श्री. सुशीलकुमार नायक सा. यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी सा हिंगणघाट यांचे कार्यालयातील पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे, पोलीस हवालदार चेतन पिसे, पोलीस हवालदार उमेश लडके, पोलीस हवालदार राहुल साठे, पोलीस हवालदार सतीश घवघवे , पोलीस नाईक रवींद्र घाटुर्ले यांनी केली.

उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाची रेती माफिया विरुद्ध केलेली कारवाई*���������������…

**खासदार अमर भाऊ काळे यांना पत्रकार बंधूंच्या दिवाळी शुभेच्छा*. *आर्वी, २४ ऑक्टोबर २०२५: दिवाळीच्या निमित्ताने पत्रकार विपुल पाटील, सुमंत पाटील, अब्दुल कदीर आणि अमोल येसाणकर यांनी खासदार अमर भाऊ काळे यांना भेट देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या."दिवाळीचा आनंद आणि समृद्धी सर्वांना लाभो," असे पत्रकारांनी सांगितले. खासदार काळे म्हणाले, "तुमच्या शुभेच्छांनी मी आनंदित झालो. पत्रकारितेचे योगदान अमूल्य आहे

* खासदार अमर भाऊ काळे यांना पत्रकार बंधूंच्या दिवाळी शुभेच्छा*.����������������������������������…

**मानवत तालूक्यातील हटकरवाडी ते रामपूरी रस्त्याची वाट लागली.**. { मानवत / अनिल चव्हाण }*पाथरी विधान सभा मतदार संघातील मानवत तालूक्यातील ग्रामीण भागातील रस्ते हे जिल्हा परिषदेच्या सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अख्तारीत येत असून पाथरी विधान सभा मतदार संघातील मानवत तालूक्यातील ग्रामीण भागातील रस्ते विकासा पासून कोसो दूर राहिले असल्यामूळे ग्रामिण रस्ते विकास कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्तव्यदक्ष अभियंता यांचे दूर्लक्ष होत असल्या मूळे ग्रामीण भागातील रस्ते अखेरची घटका मोजत आहे. तर रस्त्या वरून वाहन धारकांना वाहने चालवितांना तारेवरची कसरत करण्याची पाळी आली आहे.*जि.प. व पं.स* निवडणूक लागण्या पूर्वीच रस्त्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी संतप्त ग्रामीण भागातील नागरिकातून होत आहे.रस्त्याचा प्रश्न न सूटल्यास याचा परिणाम जि.प. व पं.स. निवडणूकीच्या माध्यमातून व्यक्त केला जाईल अशी चर्चा नागरिकातून ऐकावयास मिळत आहे.*

मानवत तालूक्यातील हटकरवाडी ते रामपूरी रस्त्याची वाट लागली.**.…

**प्रभाग क्रमांक ३ चे युवा नेतृत्व पाडूरंग जाधव विकास कामावर निवडणूक लढविणार*. (मानवत / प्रतिनिधी.अनिल चव्हाण) ———————_मानवत शहरातील प्रतिष्ठित नागरिक तथा सामाजीक कार्यकर्ते पाडूरंग शिवाजीराव जाधव यांनी खंडोबा मित्र मंडळाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षा पासून या भागात विविध सामाजीक, शैक्षणिक, रक्तदान शिबीरे , महिला सक्षमीकरण , सामाजीक सलोखा हिंदू मुस्लिम एकता असे विविध उपक्रम प्रभागात व शहरात राबवून युवका मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.यंदा दिवाळीच्या धामधूमी नंतर निवडणूकीचे बिगूल वाजले असून त्यामुळे मानवत नगर परिषदेच्या प्रभागामध्ये दिवाळी नंतर रणनिती ठरणार आहे. त्यामुळे प्रभाग क्रमाक ३ मध्ये यूवा नेतृत्व पांडूरंग जाधव हे खंडोबा मित्र मंडळ यांच्या माध्यमातून विकासाच्या मूद्यावर निवडणूक लढविणार असून शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये यूवकांचा पाठिंबा मिळत आहे.*

प्रभाग क्रमांक ३ चे युवा नेतृत्व पाडूरंग जाधव विकास कामावर निवडणूक लढविणार*.���������������������…

हिंगणघाट पोलीस गुन्हे प्रकटीकरणाची कारवाई . पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की, निखील पाटील रा. बुरकोणी हा निळा-काळया रंगाचे स्प्लेन्डर प्लस मोटार सायकलने दारूचा माल घेवून नागरी वरून लाडकी मार्गे बुरकोणी कडे वाहतुक करीत येत आहे, अशी खात्रीषीर माहिती मिळाल्याने सदर माहीती मा. अनिल राऊत पोलीस निरीक्षक सा. यांना देवून त्याचे आदेशाने लाडकी बसस्टाँप येथे पोस्टाँप सह रवाना होवून तेथे नाकाबंदी केली असता काही वेळाने प्राप्त खबरेप्रमाने निळया-काळया रंगाचे स्प्लेन्डर प्लस गाडी येतांना दिसल्याने सदर वाहनाला पंचासमक्ष थांबवुन व थांबिवण्याचा उददेष सांगुन नांव गाव पत्ता विचारला असता, त्याने त्याचे नाव निखील संजय पाटील वय 30 वर्ष रा. बुरकोणी ता. हिंगणघाट जि. वर्धा असे सांगितले त्याचे वाहनांची पाहणी केली असता सदर वाहनाचे टंकीवर असलेल्या एका चुंगडीमध्ये राँकेट कंपनीच्या 90 मिलीच्या देशी दारूच्या सिलबंद 300 शिश्या प्रती शिशी 120 रू प्रमाने 36,000 रू जूने वापरते हिरो कंपनीचे निळया-काळया रंगाचे स्प्लेन्डर प्लस गाडी क्र. एमएच 32 एएफ 2387 किं. 60,000 रू रू असा जू.किं. 96,000 रू चा माल विनापास परवाना वाहतूक करतांना मिळुन आल्याने पंचासमक्ष मौक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आला. ही संपूर्ण कारवाई मा.पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक सा. व मा. अनिल राऊत पोलीस निरीक्षक सा. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि पद्ममाकर मुंडे सा. यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना राजेश शेंडे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. मंगेश वाघमारे, पोशी रोहीत साठे यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहे.

हिंगणघाट पोलीस गुन्हे प्रकटीकरणाची कारवाई

शेतकरी बापाचं अस्तित्व टिकवण्यासाठी,शेतकरी पुत्रांनो एक व्हा...समाजिक कार्यकर्ते आशिष जाचक, (वर्धा जिल्हा प्रतिनिधी(अब्दुल कदीर) वर्धा जिल्हा,तथा विदर्भातील सर्व शेतकरी,शेतमजूर,शेतकरी पुत्रांना. समाजिक कार्यकर्ते आशिष जाचक, समाजातील प्रत्येक घाटकाच्या न्याय हक्कासाठी,खम्बिर पणे उभे राहणारे,समश्या जिथे तिथे निवारण .,हेच आमचे ध्येय हेच आमचे धोरण म्हणारे ,वर्धा जिल्ह्यातील कुरझडी जामठा येथील रहिवाशी आशिष जाचक यांनी हे आव्हाहन केले आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी गेल्या एक वर्षा पासून हा लढा चालू आहे. आजही ह्या लढ्याला पूर्ण यश मिळाले नाही. ह्या विधमान महायुती भाजप सरकारने इलेक्शन मध्ये शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण पोकळ ठरली,शेतकरी,शेतमजूर,युवां वर्ग,लाडक्या बहिणीचे २१ शे रु देऊ सर्व जनतेला आशा दाखून,आश्वासने देऊन .गोरगरीब जनतेचे मत गुंडाळून सत्ता स्थापन करून आता ,बेधुंद सत्तेचा आनंद घेत आहे. शेतकऱ्याचा सातबारा करूया कोरा,कोरा,कोरा, अजूनही सातबारा कोरा झाला नाही.यांना ओला दुष्काळ अजूनही दिसला नाही.शेतकऱ्याच्या फाशीचा दोर यांना कळला नाही. तूट पुंजी जाहीर केलेली नुकसान भरपाई दिवाळी अगोदर देऊ कागदोपत्रीच आहे. शेतकऱ्याची दिवाळी गोड करणार सरकार शेतकऱ्याची दिवाळी काळी करून मोकळ झाल.महाराष्ट्राचे मुख्मंत्री साहेब स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका साठी साखर घेऊन फिरत आहे.आणी इकडे रोज शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकरी बापाचं अस्तित्व टिकवण्यासाठी भरपूर आंदोलने झाली ,मोर्चे उपोषणे झाली ,लाखो शेतकऱ्यांचे कर्ज माफीचे अर्ज भरून झाले.आता मात्र लढाई अंतिम टप्यात. आपल्या शेतकऱ्याची लढाई लढणार महाराष्ट्रात आता एकच नेतृत्व ते म्हणजे बच्चू भाऊ कडू शेतकरी मित्रानो,शेतकरी पुत्रानो आता आपल्या साठी लढाई लढणाऱ्या माणसाला ,मावळ्याला आपण साथ देण्याची गरज आहे. ते लढाई त्यांची नसून आपल्या हक्कासाठी लढत आहे. तेव्हा पक्ष्याचे झेंडे बाजूला ठेवा आणी आपल्या शेतकरी बापाच्या अस्तित्वासाठी लढाईत सहभागी व्हा आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय आणी मार्ग नाही.ह्या बेधुंद सरकारचं नाक दाबल्या शिवाय तोंड खुलणार नाही. बाळ रडल्या शिवाय माय दुध पाजत नाही याची जाणीव असू द्या येणाऱ्या २८आक्टोम्बर ला शेतकरी नेते ,बच्चू भाऊ कडू यांच्या बुट्टीबोरी ,नागपूर येथे होणाऱ्या आंदोलनात लाखोच्या संखेने सामील व्हा.आमच ठरलं आहे.आपणही या .उठ शेतकरी पुत्रा जागा हो !बापाच्या लढाईचा धागा हो! असे सर्व विदर्भातील ,शेतकरी,शेतमजूर,युवां वर्गास समाजिक कार्यकर्ते आशिष जाचक यांनी आव्हान ,विनंती केली .

शेतकरी बापाचं अस्तित्व टिकवण्यासाठी,शेतकरी पुत्रांनो एक व्हा...समाजिक कार्यकर्ते आशिष जाचक,������…

आज दिनांक 24/10/2025 ला असोला ग्रामपंचायत अंतर्गत करूळ एकबूर्जे या गावाला देश स्वातंत्र्य झाला तेव्हा पासून बस सेवा उपलब्ध नाही त्यामुळे विद्यार्थी तसेच नागरिकांना पायदळ शेगाव गोटाळे 3 किलोमीटर पर्यंत यावे लागते त्याकरिता तात्काळ बस फेरी चालू करण्यात यावी या करिता सदर निवेदन देण्यात आले निवेदन देते वेळीसौ लक्ष्मीताई रवींद्रजी मुंगले सरपंच असोला प्रवीण रामदासजी जायदे सरपंच ग्रामपंचायत कवठा भैयाजी हाडके गजाननराव जांभुळे धनराजजी जांभुळे रवींद्रजी मुंगले सचिन गजभिये दिलीपजी मिटकर प्रवीण चौधरी यांनी पुढाकार घेऊन बस फेरी चालू करण्यात यावी या करिता निवेदन देण्यात आले

आज दिनांक 24/10/2025 ला असोला ग्रामपंचायत अंतर्गत करूळ एकबूर्जे या गावाला देश स्वातंत्र्य झाला ते…

अल्पसंख्यांक प्रमाणपत्रा चा वाटपाचा कार्यक्रम आयोजित ,,, (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती) भद्रावती दि.23:- महाराष्ट्र शासन अल्पसंख्यांक विकास विभाग मंत्रालय मुंबई तथा अल्पसंख्याक विकास विभाग चंद्रपूर वतीने , महाराष्ट्र शासन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहु, फुले, आंबेडकर पुरस्कार प्राप्त साईबाबा बहुउद्देशीय संस्था पिटीगुडा नं1 ता जिवती जि चंद्रपूर व्दारा संचालीत श्री दिगांबर नाईक निवासी पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर येथे दिनांक 18/10/25 रोजी 12ः00 वाजे स्थळ डी एन जे अभ्यासिका तुकुम चंद्रपूर येथे करण्यात आले आहे प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय मा श्री किसनराव जी नवघरे राखीव पोलीस निरीक्षक साहेब प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय मा श्री आनंद जी आंगलवार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय विमुक्त जाती घुमतू वेल्फेअर असोसिएशन दिल्ली पाहुणे म्हणून मा श्री शरद शेवाळे साहेब पी एस आय प्रमुख पाहुणे मा श्री माधव रेड्डी, निखिल धोडरे,महोदय तसेच सर्व शिक्षक वृंद प्रशिक्षणार्थी बांधव उपस्थित होते सर्व प्रशिक्षणार्थींना किट वाटप, साहित्य वाटप करण्यात आले सूत्रसंचालन मा श्री प्रवीण जी सलामे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा श्री गोविंद जी पवार कोच यांनी केले आहे वंदे मातरम् जय हिंद

अल्पसंख्यांक प्रमाणपत्रा चा वाटपाचा   कार्यक्रम आयोजित ,,,���������������������������…

२५ विधवा महिला व निराधार महिलांना भाऊबीज निमित्ताने साडी चोळी भेट -- आदर्श ग्रामपंचायत अधिकारी श्री सुरेश गांवडे _____________________________. मंगरूळनाथ--दगडात देव पाहत नाही आम्ही, माणसांची करतो आरती, रंजल्या गांजल्यांच्या सेवेस कर आमुचे सरसावती**सदा मानव सेवेला देह झिजू दे, घडू दे हरी आता हेचि घडू दे*विधवा आणि भाऊबीज यांचा संबंध भावनिक आणि सामाजिक स्तरावर महत्त्वाचा आहे, जिथे काही संस्था आणि गट विधवा महिलांना सन्मान आणि आदर देण्यासाठी भावनिक बंध तयार करतात. काही ठिकाणी विधवा महिलांना भाऊबीज सणात सहभागी करून, त्यांना सन्मानित आणि समाजात समावेशित करण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून त्यांचे एकटेपण कमी होईल. हीच सामाजिक बांधिलकी जपत आज *ग्रामपंचायत साखरडोह* चे *ग्रामपंचायत अधिकारी श्री सुरेश पाटील गावंडे* व त्यांच्या *पत्नी सौ अर्चनाताई सुरेश गावंडे* यांनी आजच्या भाऊबीज निमित्त गावातील *२५* विधवा व निराश्रित महिलाना माहेरची साडी चोळी व फराळ देऊन भाऊबीज साजरी केली. आपल्या उत्पन्नातील *१०%हिस्सा* दरवर्षी सामाजिक व धार्मिक कार्यावर खर्च करणारे शेजारच्या *चिखलागड* या गावातील रहिवाशी असलेले व राज्य शासना चा *सन२०१९/२०* या वर्षीचा *आदर्श ग्रामसेवक* पुरस्कार प्राप्त *श्री सुरेश पाटील गावंडे* व दाम्पत्य दरवर्षी गावाप्रती असलेल्या सामाजिक भावनेतून सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. अशा कार्यक्रमातून विधवाना एक सुरक्षित व प्रेमळ वातावरण मिळुन एकटेपण कमी होण्यास मदत होते. त्यांना सन्मानित केल्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर केला जातो. यावेळी त्यांचे सुपुत्र स्वराज व सुकन्या सायली सह सामाजिक कार्यकर्ते गणेश भोयर, जनार्दन आगुलदरे, ग्रामपंचायत कर्मचारी उमेश चव्हाण, संजीव भगत, विजय भगत, केंद्र चालक सौ. रेखा मिलिंद पखाले व विशाल भारसाखळे उपस्थित होते. निराश्रीता सोबत भाऊबीज साजरी झाल्यामुळे त्या महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

२५  विधवा महिला व निराधार महिलांना भाऊबीज निमित्ताने साडी चोळी भेट -- आदर्श ग्रामपंचायत अधिकारी श…

चोपडा (संजीव शिरसाठ ) यावल तालुक्यातिल किंनगाव येथील रहिवासी ग्राम पंचायतचे माजी सदस्य आप्पासाहेब जनार्दन राजधर कोळी यांचे आज दि.23 गुरुवार रोजी नुकतंच ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.24 शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता किनगाव येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.ते जिल्हा परिषदेचे माजी सद्स्य सुशीलाताई कोळी यांचे पती व यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बबलूभाऊ कोळी यांचे वडील होते.

चोपडा (संजीव शिरसाठ ) यावल तालुक्यातिल किंनगाव येथील रहिवासी ग्राम पंचायतचे माजी सदस्य आप्पासाहेब…

*युवा राष्ट्रवादी काँग्रेस(श.प.)शहर अध्यक्ष समुद्रपूर अतुलभाऊ चौधरी यांची मुलगी अर्णवी हिचा संत छावरा आश्रम जांब येथे पहिला वाढदिवस साजरा*. युवा राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष समुद्रपूर येथील अतुलभाऊ चौधरी यांनी संत छावरा आश्रम जाम येथे मुलगी *अर्णवी* हिचा पहिला वाढदिवस साजरा केला यानिमित्ताने व दिवाळी उत्सवानिमित्त संत छावरा आश्रम आपलाच परिवार समजून केक कापून दिवाळी साजरी करण्यात आली व दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा तसेच अल्पहार देऊन छोटीशी भेट वस्तू देऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला कार्यक्रम साजरा करते वेळेस अर्नवीचे बाबा अतुल चौधरी,आई रुक्मिणीताई,आप्पाजी सुधाकरजी चौधरी,आजी शोभाबाई व काका अनिल चौधरी आणि मोठ्या प्रमाणात सर्व मित्रमंडळी उपस्थित होते. अर्णविला सर्वांकडून वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.

युवा राष्ट्रवादी काँग्रेस(श.प.)शहर अध्यक्ष समुद्रपूर अतुलभाऊ चौधरी यांची मुलगी अर्णवी हिचा संत छा…

पाडळसे सरपंच चषक २०२५: 'किंगमेकर' ठरले विजेते; 'रोनक ११' उपविजेते तसेच या मालिकेत 1. सुरज कोळी (उत्कृष्ट फलंदाज) 2.प्रमोद सर(उत्कृष्ट गोलंदाज)*. (*पाडळसे (ता. यावल):** पाडळसे गावात नुकत्याच पार पडलेल्या **'सरपंच चषक २०२५'** क्रिकेट स्पर्धेचा थरार अत्यंत चुरशीच्या वातावरणात संपन्न झाला. या स्पर्धेत **'किंगमेकर' (Kingmaker) संघाने प्रमोद सर तायडे यांच्या नेतृत्वा खाली उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर **'रोनक ११' (Ronak 11) संघाला** उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.ग्रामस्थांमध्ये एकता आणि खेळाची भावना वाढीस लागावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण स्पर्धेत अनेक संघांनी आपला सहभाग नोंदवला, परंतु किंगमेकर आणि रोनक ११ या दोन संघात अंतिम सामना रंगला.अंतिम सामन्यात किंगमेकर संघाने रोनक ११ संघावर मात करत सरपंच चषकावर आपले नाव कोरले. विजेता ठरलेल्या 'किंगमेकर' संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे. उपविजेते ठरलेल्या 'रोनक ११' संघानेही आपल्या दमदार खेळाने उपस्थितांची मने जिंकली.सरपंच चषकाच्या समारोप समारंभात विजेत्या आणि उपविजेत्या संघांना सरपंच , पोलीस पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक आणि बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. या सरपंच चषक साठी श्री विजय कोळी सर कुंदन कोळी खेमचंद कोळी यांनी पंचांची भूमिका बजावली तसेच योग्य नियोजन करून यशस्वी आयोजनामुळे पाडळसे गावातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळाले आहे.-

पाडळसे सरपंच चषक २०२५: 'किंगमेकर' ठरले विजेते; 'रोनक ११' उपविजेते तसेच या मालिकेत…

आई तुळजा भवानी महालक्ष्मी (सुपारी माता) ट्रस्ट बोरगाव( मेघे ) व अतुल शेंदरे मित्र परिवार आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत व इतरांना धान्य किराणा किट वाटप. (वर्धा ग्रामीण प्रतिनिधी विपुल पाटील.) वायफड.. येते गेल्या एक ते दिड महिन्या आधी वायफड येथील शेतकरी स्व हनुमान खडसे यांनी पडलेला ओला दुष्काळ व डोक्यावर झालेले लाखोचे कर्जला कंटाळून आत्महत्या केली. त्यांचे सात्वन करण्याकरिता बरीच स्थानिक व बाहेरील नेते मंडळी गेली बरेच मोठे मोठे आश्वासन दिले. बरेच दिवस लोटून गेले दिवाळी सारखा सण जवळ आला परंतु अजूनही शासनाकडून व इतर कोणतीच मदत खडसे कुटूंबियांना मिळाली नाही.म्हूणन आपल्या कडून खडसे कुटूंबाला काही सहकार्य व्हावे. या उद्देशानी आई तुळजा भवानी . ट्रस्ट बोरगाव ( मेघे ) व अतुल शेंदरे मित्र परिवाराच्या वतीने वायफड जाऊन कुटुंबाची भेट घेतली व त्या अन्न धान्य किराणा सामान व आणि अर्थ साह्य म्हणून दहा हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला. मुलीच्या शिक्षणा करिता पुन्हा जमेल ति मदत करू व शासनाकडून मदत मिळून देण्यास सहकार्य करू असे सांगण्यात आहे इतर आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा गरजूना किराणा सामान किट चे वाटप करण्यात आले. यावेळीस आई तूळजा भवानी महालक्ष्मी ट्रस्ट बोरगाव चे अध्यक्ष दिनेश (माऊली ) विशस्त, अतुल शेंदरे, राजेश गांधी लालू भाऊ मिश्रा दर्शन सराफ, नितीन डफळे, अश्विन परमार मनोज सातव, नितीन शिंदे, अनुराग गोयलका गौतम टिबडेवाल योगेश तापडिया पवन फटिंग चेतन सोनुले चेतन वाघमारे अमित उईके चेतन चाफले अमोल ठाकरे गजानन रोहणकर, अशोक राऊत, किसनाजी वांदीले, विजू कोटागले, रुपाली चौधरी मीनल नवले, वनिता वैद्य, प्रिया शिनपुरे वंदना ठोंबरे, विजया वंदिले, शारदा ठाकूर व आधी गावकऱ्यानी उपस्थित राहून सहकार्य केले.

आई तुळजा भवानी महालक्ष्मी  (सुपारी माता) ट्रस्ट बोरगाव( मेघे )  व अतुल शेंदरे मित्र प…

आदिवासी पाड्यावर दीपावलीचा आनंद – अंतर्नाद प्रतिष्ठानचा उपक्रम* भुसावळ : अंतर्नाद प्रतिष्ठान गेल्या दहा वर्षांपासून दीपावलीच्या निमित्ताने वंचित कुटुंबांपर्यंत आनंद पोहोचवण्याचे कार्य सातत्याने करीत आहे. या वर्षी “वाटीभर फराळ द्या आणि वंचितांचे तोंड गोड करा” या संकल्पनेतून संस्थेने फराळ, नवीन कपडे, शालेय साहित्य व किराणा वाटपाचा कार्यक्रम यावल तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाडा “माथन” येथे आयोजित केला.हा उपक्रम 20 ऑक्टोबर रोजी आदिवासी लोकांच्या सहभागाने उत्साहात पार पडला. प्रकल्पप्रमुख जीवन महाजन, समन्वयक योगेश इंगळे, प्रसन्ना बोरोले आणि समाधान महाजन यांनी संपूर्ण नियोजनाची जबाबदारी सांभाळली.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्ञानेश्वर घुले, ललित महाजन, अमितकुमार पाटील, कुंदन वायकोळे, राहुल भारंबे, विक्रांत चौधरी, हितेंद्र नेमाडे, अमित चौधरी, देव सरकटे, राजू वारके, चंद्रकांत सूर्यवंशी, शिरीष कोल्हे, कपिल धांडे, केतन महाराज, प्रमोद पाटील, हरीश भट, निवृत्ती पाटील, सचिन पाटील, जीवन सपकाळे आणि मंगेश भावे यांनी परिश्रम घेतले.अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमामुळे माथन पाड्यावर आदिवासी कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंदाचे सोनेरी क्षण अनुभवता आले.

आदिवासी पाड्यावर दीपावलीचा आनंद – अंत…

Load More
That is All