मीडिया पोलिस टाइम (वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील लोहारा ते कुसुंबा ह्या मार्गावरील २ किमी चा रस्त्याची अतिशय दयनीय अवसस्था झाली असून हे रस्ते आपघातांना कारणीभूत ठरत आहेत. याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील लोहारा ते कुसुंबा मार्गावरील २ किमी लांबीच्या रस्त्याने खड्डे पडल्याने प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. हा रस्ता गेल्या १५ ते २० वर्षांपासून शेवटची खटका मोजत आहे. या रस्त्याला जीवनदान कोण देईल याकडे मात्र आदिवासी गावातील जनतेचे लक्ष लागले आहे .. त्याचबरोबर मुंजळवाडी ते रावेर हा रस्ता देखील ते ५ वर्षापासून जीर्ण झाला आहे ,या रसत्यांनी प्रवास करीत असतांना वाहन धारक ,प्रवासी यांना तारेवरची कसरत करून प्रवास करावा लागत आहे. या रस्ताने प्रवास करीत असतांना अनेकांची डोकी फुटली आहेत . आशा ह्या घटनांना जबाबदार कोण?बेजबाबदार अधिकारी पदाधिकारी की लोकप्रतिनिधी असा सवाल परिसरातील जनतेकडून उपस्थित झाला आहे. या ररस्तानकडे तात्काळ लक्ष देऊन डंबरीकरण करण्याची मागणी परिसरातील जनतेकडून करण्यात आली आहे .. रास्ता तात्काळ डंबरीकरण न झाल्यास परिसरातील जनतेकडून रस्ता रोको चा इशारा संबंधितांना या वृत्तपत्रकाद्वारे देण्यात येत आहे ...