सेलू तहसील येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी). सेलू : सेलू तहसील कार्यालय मध्ये स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची जयंती दिनांक 28 मे रोजि साजरी करण्यात आली. यानिमित्त सेलू चे तहसीलदार दिनेश झांपले यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अव्वल कारकून हरीश टाक, रवी बंदुके, प्रदीप मुनेश्वर, डॉक्टर वसीम अक्रम, व संतोष वाघमारे आदी उपस्थित कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले.

Previous Post Next Post