*मुख्याधिकाऱ्यांच्या सुस्त कारभाराने पाणीपुरवठा व स्वच्छतेचे नियोजन कोलमडले*. (जलील शेख :तालुका प्रतिनिधी,) पाथरी 'अपना काम बनता भाड मे जाये जनता' या उक्तीप्रमाणे पाथरी नगरपालिकेचा कारभार हाकणारे अकार्यक्षम व सुस्त मुख्याधिकारी तुकाराम कदम यांच्यामुळे दुष्काळाच्या मोठ्या झळा सहन करणाऱ्या सामान्य पाथरीकरासाठी पाणी पुरवठ्याची मोठी गैरसोय व अस्वच्छतेचे पाथरी शहर हे सध्या माहेरघर बनले आहे. तुंबलेल्या नाल्या, सगळीकडे अस्वच्छतेचा दुर्गंधीयुक्त कहर या प्रमुख समस्येमुळे लोकांना नाकाला रुमाल लावून विविध प्रभागातील आपल्या घरी जावे लागत आहे.याची दखल मुख्याधिकाऱ्यांनी घ्यावी नसता निर्लज्जम सदा सुखी याप्रमाणे पुढे आपला प्रशासकीय कारभार चालवावा.अशा संतप्त प्रतिक्रिया या निमित्ताने सर्वसामान्यातून उमटत आहेत.उन्हाळ्याच्या दिवसातील अखंडित पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या बाबतीत नूतन प्रभारी मुख्याधिकारी यांनी पदभार संभाळला तेव्हापासून पाथरी नगरपालिकेतील नियोजनाचा कारभार ढेपाळल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.परंतु वातानुकूलित कार्यालयात बसून नगरपालिकेचा प्रशासकीय कारभार बघणारे मुख्याधिकारी तुकाराम कदम हे आपल्याच धुंदीत असल्याचे लोकांमधून बोलल्या जात आहे. स्वच्छतेच्या बाबतीत अनेक पुरस्कार प्राप्त झालेली पाथरी नगरपालिका यामुळे पाळ रसातळाला जाऊन बदनाम होताना यामुळे दिसत आहे.या दोन्ही गैरसोयीसाठी अनेक वेळा शिवसेना पक्ष व पाथरीतील जबाबदार नागरिकांच्या वतीने आवाज बुलंद करूनही अकार्यक्षम मुख्याधिकारी यांच्यात कोणताही बदल होताना दिसत नाही.परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी याकडे विशेष लक्ष देऊन पाथरी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना आपल्या कर्तव्याची जाण करून द्यावी,अशी मागणी आता जोर धरत आहे.

Previous Post Next Post