डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र स्थळी जमला जनसमुदायसुमेध दामधर (ग्रामीण प्रतिनिधी संग्रामपूरसोनाळा) :- संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावाला इतिहास लाभला आहे. या पातुर्डा गावी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह तुकडोजी महाराज, महात्मा फुले यांचे पदस्पर्श लाभून हे गाव पावन झाले आहे. पातुर्डा गाव संग्रामपूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. या गावात शाळा, बाजार सह अनेक मंदिर आहेत. तसेच इतिहासकाली अनेक स्थळे सुद्धा आपली साक्ष देत उभी आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांसाठी खुली करून दिलेली विहीर आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ तरसलेलं होते. गावात प्रवेश केल्यानंतर बाजारात एका ठिकाणी आपल्याला विहीर बघावास मिळते. त्याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही विहीर २९ मे १९२९ रोजी अस्पृश्यांसाठी खुली केली होती. व स्वतः त्या विहिरीचे पाणी काढून अस्पृश्यांना पाजले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संग्रामपूर तालुक्यातील पातूर्डा या पवित्र स्थळी अभिवादन करण्यासाठी दरवर्षी मोठया संख्येने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी व बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने येत असतात. आज सकाळी बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश महासचिव सुजित बांगर व जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहिले. पातूर्डा या गावी विविध कार्यक्रमाचे आयोजन आयोजकांनी केले होते. यावेळी पूज्य.भंते ज्ञानज्योती महास्थविर यांनी उपस्थित जन समूदायास धम्म देसना दिली. पुज्यनिय भिक्खू संघासह समता सैनिक दलाच्या उपस्थितीत व खेड्यापाड्यातून अभिवादन करण्यासाठी आलेला जन समूदाय देखिल मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Previous Post Next Post