तक्रारदार तथा माहिती अधिकार कार्यकर्ता व सामाजिक कार्यकर्ता गुलाबराव जगन्नाथ पाटील पाटील सुमारे 50 महिन्यांची लढाई यशस्वी; --

तक्रारदार तथा माहिती अधिकार कार्यकर्ता व सामाजिक कार्यकर्ता
 गुलाबराव जगन्नाथ पाटील पाटील सुमारे 50 महिन्यांची  लढाई यशस्वी; --

जळगाव प्रतिनिधी भगवान चौधरी 

जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील पिंपरी मोंढाळे येथील सरकारी गायरान जमीन बनावट कागदपत्रे तयार करून सरपंच व ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक व उपसरपंच व शिपाई यांनी संगनमताने शासनाच्या मालकीची जमीनचे एकुण 22  सुची व दस्तावेज  खरेदी विक्री परस्परांना विक्री गैरव्यवहार  महा घोटाळा उघडकीस...

   या प्रकरणात जळगाव जिल्हाधिकारी व दंडाधिकारी आदरणीय महोदय 
रोहन घुगे साहेब 
आणि जळगाव  महसूल प्रशासनाची कडक कारवाई तसेच फोजदारी    गुन्हे दाखल करण्याचे आदेश!*


जळगाव,   प्रतिनिधी – 
पारोळा तालुक्यातील मौजे पिंप्री प्र.उ. येथील गायरान जमिनींवरील बनावट कागदपत्रे व सहि शिकके तयार करून सरकारी जमीन गैरव्यवहार अखेर उघडकीस आला असून,
 या प्रकरणात सातत्याने पाठपुरावा करणारे तक्रारदार सामाजिक कार्यकर्ता गुलाबराव जगन्नाथ पाटील यांच्या संघर्षाला मोठे यश मिळाले आहे.

तक्रारदार यांच्या विरुद्ध खोटा विनयभंग व अनुसुचित जाती व जमाती कायदा अंतर्गत सरपंच ग्रामसेवक व ग्रामरोजगार व शिपाई यांनी खोटे ४  गुन्ह्यांमध्ये अडकण्याचे कारस्थान रचले तरी तक्रारदाराने जिद्द चिकाटी सोडली नाही 

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार झालेल्या चौकशीत गंभीर अनियमितता समोर आल्याने संबंधितांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून गायरान/गुरचर जमिनींची बेकायदेशीर खरेदी-विक्री, अतिक्रमण आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यवहार होत असल्याचा मुद्दा गुलाबराव जगन्नाथ  पाटील यांनी सातत्याने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यांच्या सततच्या    पाठपुराव्यामुळेच उपविभागीय अधिकारी एरंडोल यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली.
समितीच्या तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या असून, पिंपरी मोंढाळे येथील तात्कालीन 
ग्रामसेवक 
१) डि.बी.पाटील

२) महेंद्र भानुदास सोनवणे 

३)एन.आर.चंंदरै

४) कै.दिलिप काशिराम पाटील 

५) राजेंद्र विनायक सोनवणे 

६) हरिभाऊ मारवडकर 

७) जगदीश बावीस्कर 

तसेच तात्कालीन सरपंच 

१)  राजेंद्र भिमराव पाटील 

२) कैलास राघो पाटील 

३)मिराबाई कैलास पाटील 

 ४) गंभीर  नत्थु पाटील 

५) लताबाई राजेंद्र पाटील 

६) राजेंद्र भगवान पाटील 

७) विजय भावराव पाटील 

८)गोकुळ ओंकार विसावे 
गा.पं.शिपाई
९) युवराज नारायण विसावे 
पाणीपुरवठा कर्मचारी 

१०) राजेंद्र आनंदा विसावे 
रोजगार सेवक पिंपरी मोंढाळे 

११) प्रभारी सरपंच 
.पुष्पा रामकृष्ण पाटील 
तसेच तात्कालीन उपसरपंच व सदस्यांनी आणि ३० ते ४० भुमाफियांनी 

मोजे पिंपरी मोंढाळे येथील सर्व क्रमांक 84 आणि गट क्रमांक १४०  हया सरकारी जमिनी ८ अ. चार बनावट   उतारा तयार करून स्वतःच्या नावावर दाखवून  दुय्यम निबंधक कार्यालय पारोळा येथील कार्यालयात खरेदी विक्री व्यवहार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
 तसेच सरकारी गायरान जमीन वर अनाधिकृत बांधकामे व शेततळे व पोल्ट्री फार्म उभारण्यात आलेल्या आहेत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून जमिनींचा बेकायदेशीर वापर झाल्याचेही आढळून आले आहे. 
या पार्श्वभूमीवर सर्व सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व सदस्य आणि भुमाफिया व साक्षीदार सह सर्व संबंधितांविरुद्ध 
शासन निर्णय व कायदा कलमां. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद जळगाव आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय पारोळा यांना फोजदारी कारवाई व प्रशासकीय कारवाई व दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे साहेब यांनी आदेश दिले आहेत तसेच 
पोलीस तक्रारी दाखल करण्याचे तसेच महसूल नोंदींची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय, काही प्रकरणांमध्ये भारतीय दंड संहितेनुसार गुन्हे नोंदविण्यात आले असून उर्वरित प्रकरणांमध्ये तहसीलदारांना स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
 गरज भासल्यास संबंधित जमिनी पुन्हा सरकारी ताब्यात घेण्याची प्रक्रिया तातडीने राबविण्यात येणार आहे.

दरम्यान, एका सामान्य नागरिकाच्या चिकाटीमुळे एवढा मोठा सरकारी गायरान जमीन खरेदी विक्री ग गैरप्रकार उघडकीस आल्याने स्थानिक पातळीवर समाधान व्यक्त होत आहे. 

प्रशासनानेही या प्रकरणात शून्य सहनशीलतेची भूमिका घेत भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्याचा इशारा दिला आहे.
Previous Post Next Post